' हसवलं नाही म्हणून, एकेकाळी हाकलून दिलेला तरुण झाला लोकप्रिय कॉमेडियन! – InMarathi

हसवलं नाही म्हणून, एकेकाळी हाकलून दिलेला तरुण झाला लोकप्रिय कॉमेडियन!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

पहिले स्टँडअप कॉमेडीयन कोण असं विचारलं तर पटकन कुणालाच याचं उत्तर देता येणार नाही. पण पू.ल, व.पू, शिरीष केणेकर, जॉनी लिव्हर अशा काही महारथींमुळे आपल्याला स्टँडअप कॉमेडीची खरी ओळख झाली!

पण सध्या स्टँडअप कॉमेडी हे नाव ऐकलं, की बऱ्याच लोकांच्या भुवया उंचावतात. यामागे कारणंदेखील तशीच आहेत. विनोदाचा घसरलेला दर्जा आणि त्यात येणारा राजकरणाचा संदर्भ यामुळे स्टँडअप कोमेडियन्सला खूप लोकांच्या रोषाला सामोरं जायला लागतं!

पण या सगळ्या लोकांच्या गर्दीत काही असेही कॉमेडीयन्स आहेत जे सचोटीने स्वतःच्या कंटेंट वर फोकस करून लोकांना दर्जेदार विनोद ऐकवून हसवत आहेत.   

असं म्हणतात की सुरुवातीच्या आलेल्या अपयशातून जर एखाद्या व्यक्तीने धडा घेतला, त्यातील चुका सुधारल्या तर यशस्वी होण्यापासून तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही.

असंच काहीसं झाकीर खान या स्टँड अप कॉमेडीयन सोबत देखील घडलं.

अगदी पहिल्याच कार्यक्रमात या स्टँड अप कॉमेडीयनला नव्वद सेकंदांमध्ये स्टेजवरून उतरण्याची सूचना देखील देण्यात आली, परंतु त्या प्रसंगामुळे खचून न जाता त्याने स्वतःमध्ये बदल केले, प्रचंड मेहनत घेतली आणि आज झाकीर खान एक प्रसिद्ध स्टैंड अप कॉमेडीयन आहे.

 

zakir khan inmarathi

 

कसा होता त्याचा हा प्रवास जाणून घेऊयात! स्टँड अप कॉमेडी ही एक कला आहे प्रत्येकालाच या क्षेत्रात करिअर करता येईल असं नक्की नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये स्टँडअप कॉमेडीला चांगले दिवस आले आहेत, आजकाल तर तुम्हाला स्टँडअप कॉमेडीचे ऑनलाइन शो अगदी सहजपणे उपलब्ध आहेत.

कमी काळात चांगली प्रसिद्धी देणारं मनोरंजनाचे माध्यम म्हणजे स्टँडअप कॉमेडी होय आणि झाकीर खान याने तर अगदीच कमी वयात स्टँड अप कॉमेडी मध्ये प्रचंड ख्याती कमावली आहे.

झाकीरचा जन्म मध्यप्रदेशातील इंदोर या ठिकाणी झाला. त्याचे आजोबा संगीतकार होते त्यामुळे कलेबाबत त्याला प्रचंड आवड होती. बीकॉम अर्धवट सोडून तो रेडिओ प्रोड्युसर बनण्यासाठी दिल्लीत आला.

दिल्लीत त्याने अनेक ठिकाणी रेडीओ प्रोड्युसर साठी प्रयत्न केले परंतु झाकीरला कोणीही संधी दिली नाही शेवटी एका इंटर्नशिप साठी त्याने जयपुर मध्ये देखील काम केलं.

बीकॉम सारखं करिअर सोडून रेडीओ प्रोड्युसर बनणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती. या काळात त्याने घरून पैसे घेणे देखील थांबवलं. पण नोकरी करत आहे असं घरच्यांना खोटं सांगितलं.

या काळात अनेक चांगल्या वाईट प्रसंगातून पुढे आल्याचे झाकीर एका मुलाखतीत सांगतो. अगदी खडतर परिस्थितीतून झाकीर कसाबसा दिल्लीत परत पोहोचला.

झाकीरचा सितार मध्ये डिप्लोमा पूर्ण झालेला होता त्यामुळे दिल्लीत परत आल्यानंतर या सितारच्या कौशल्यावर झाकीर काही पैसे कमवत असे परंतु याच काळात त्याने स्वतःला जाणून घेण्याचा देखील प्रयत्न केला.

 

zakir khan with sitar inmarathi

 

दिल्लीमध्ये आल्यानंतर लहान-मोठ्या कामांसोबतच झाकीर HT रेडिओ साठी देखील काम करु लागला. या कामात त्याने नाव कमावले लोकांना त्याचा रेडिओवरील शो आवडू लागला.

त्याच्या या शोमुळे अनेक इतर रेडिओ त्याला स्वतःहून नोकरी देऊ करत,अनेक तर असे रेडिओ होते ज्यांनी सुरुवातीला झाकीरला नोकरी नाकारली होती. त्याने यापैकी एकाही रेडिओ मध्ये काम करण्यास ठाम नकार दिला.

पुढे रूम पार्टनर ने प्रोत्साहन दिल्यामुळे कधीकधी तो दिल्लीत कॉमेडी ओपन माईकवर देखील जाऊन प्रयत्न करत असे. या मित्राच्या प्रोत्साहनामुळे झाकीरचा स्टँडअप कॉमेडियन म्हणून खरा प्रवास सुरू झाला.

ओपन माईक मध्ये त्याने प्रचंड नाव कमावलं दिल्लीत कुठेही ओपन माईक असलं आणि झाकीरने परफॉर्म केलं की लोक त्याचं प्रचंड कौतुक करत!

सुरूवातीला त्याला अपयश देखील प्रचंड आलं अगदी नव्वदाव्या सेकंदाला त्याला, “तू फालतू कॉमेडी करत आहेस स्टेजवरून खाली ये” म्हणत स्टेजवरून खालीदेखील उतरवण्यात आलं.

झाकीरच्या प्रसिद्धीमुळे त्याला मुंबईच्या एआयबी या यूट्यूब चैनल कडून on air with AIB ह्या कार्यक्रमासाठी लिहिण्यास बोलवण्यात आलं.

 

aib zakir khan inmarathi

 

पुढे २०१२  मध्ये त्याने “इंडियाज बेस्ट कॉमेडियन कॉम्पिटिशन” ही स्पर्धा देखील जिंकली आणि तिथुन झाकीरचा ऑनलाईन चाहतावर्ग देखील मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागला.

त्यानंतर मात्र त्याने अनेक स्टँडअप शो केले अनेक ठिकाणी तर त्याला सेलिब्रिटी म्हणून देखील बोलण्यात येऊ लागले!

त्यांनंतर झाकीरने मागे वळून पाहिलंच नाही. त्याच्या कॉमेडी स्किटची जादू प्रेक्षकांना भुरळ घालू लागली. झाकीरच्या स्टँडअप स्किट मधला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे त्याचं सादरीकरण!

त्याच्या स्किटचं सादरीकरण कधीच भडक किंवा प्रक्षोभक नसतं, त्याच्या कंटेंट नुसार त्याच्या स्किटमध्येसुद्धा काही शिव्या असतात पण त्यामुळे प्रेक्षक कधीच निराश होत नाहीत.

याबरोबरच त्याच्या विनोदात एक हलकासा जिव्हाळ्याचा, मायेचा ओलावा सुद्धा जाणवतो. आई वडील, मित्र मैत्रीण प्रेम या नात्यांवर झाकीर एका वेगळ्याच पद्धतीने भाष्य करून प्रेक्षकांना भाऊक करतो!

फक्त स्टँडअप कॉमेडीयनच  नव्हे तर झाकीर हा उत्तम कवि आणि अभिनेता सुद्धा आहे. त्याच्या कित्येक कविता युट्यूबवर तुम्हाला सापडतील! एमेझॉन प्राइम सारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर त्याचे २ स्टँडअप शो आणि एक वेब सिरिज सुद्धा उपलब्ध आहे!

 

chacha vidhayak hai inmarathi

 

सुरुवातीला ज्याला स्टेजवरून खाली उतरवण्यात आलं आज त्याच झाकीरला बोलावून स्टँडअप कॉमेडीचे शो केले जातात एवढा तो यशस्वी झाला आहे.

झाकीर त्याच्या प्रत्येक मुलाखतीत सांगतो की त्याच्या या यशात अनेक व्यक्तींचे योगदान आहे आणि ही जाणीव त्याला नेहमी जमिनीवर राहण्यास मदत करते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?