' "व्हॉट्सॲपला" परफेक्ट पर्याय "सिग्नल" आहे का? जाणून घ्या सिग्नलची वैशिष्ट्ये!

“व्हॉट्सॲपला” परफेक्ट पर्याय “सिग्नल” आहे का? जाणून घ्या सिग्नलची वैशिष्ट्ये!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आज आपण प्रचंड वेगाच्या जगात जगत आहोत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्येक गोष्टीचा वेग वाढविण्याचा आपण प्रयत्न करत आहोत.

माणसाचा प्रवास, अंतराळयानाचा प्रवास, माणसाची वाढ, वनस्पतींची वाढ इतकचं काय तर कोरोनाच्या माध्यमातून नव्या जीवाणूविरुद्ध लढण्याची क्षमता असलेली प्रतिबंधक लसही आपण वेगाने तयार केली.

म्हणजे वैद्यकीय क्षेत्रातही आता वेग ही महत्वाचा ठरत आहे. माहितीच्या देवाण – घेवाणीतही आपण आता वेग वाढवला आहे. साध्या सोप्या भाषेत सांगायचं तर एकेकाळी दोन ओळींचा संदेश (तार) पाठवायला कमीत कमी काही तास तरी वाट बघावी लागायची.

मात्र, आता काही क्षणात आपण शेकडो ओळींचा संदेश जगाच्या एका कोपऱ्यापासून दुसऱ्या कोपऱ्यात पाठवू शकत आहोत.

व्हॉट्सॲपनं या वेगाची आपल्याला सवय लावली. व्हॉट्सॲपची वाढती लोकप्रियता पाहून फेसबुकने फेब्रुवारी २०१४ मध्ये १९०० कोटी डॉलर्स देऊन व्हॉट्सॲप खरेदी केलं.

 

Whatsapp users 2 inmarathi

 

आज आपण व्हॉट्सॲपद्वारे पूर्वीप्रमाणे संदेशासोबतच आपले फोटोज, व्हिडिओज पाठवू शकतो. आता तर अगदी पैसेही व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पाठविणे सहज शक्य होत आहे. ते ही काही क्षणांत.

मात्र, ही सगळी सुविधा देण्यासाठी व्हॉट्सॲपला प्रचंड गुंतवणूक, श्रम आणि सतत संशोधन करावे लागत असते. त्यासाठी मोठ्या प्रमाणात खर्चही होतो.

शिवाय, व्हॉट्सॲपकडे जाहिरात किंवा अन्य कोणत्याही स्वरुपात थेट किंवा प्रत्यक्ष उत्पन्नाचे मार्ग नाहीत. अर्थातच युजरचा डेटा शेअरिंगच्या माध्यमातून अप्रत्यक्ष उत्पन्नाचे काही छुपे मार्ग फेसबुकने अवलंबिले असतील, यात वाद नाही.

पण तरीही १९०० कोटी डॉलर्सची गुंतवणूक आणि तब्बल पाच वर्षांहून अधिक काळ ॲप चालविणे याचा खर्च फेसबुकने पुरेपूर वसूल करणार, हे सरळ स्पष्टच होते.

या सर्व पार्श्वभूमीवर व्हॉट्सॲपने नुकतच आपल्या सर्व युजर्सना व्हॉट्सॲपचा डेटा फेसबुकसाबेत शेअर करण्याचं जाहीर केलं आहे. ही अट मान्य असेल तरच तुम्ही यापुढे (८ फेब्रुवारीनंतर) व्हॉट्सॲप वापरू शकणार नाहीत.

 

whastapp privacy policy inmarathi

 

ही अट अमान्य करणाऱ्यांना पुढे व्हॉट्सॲप वापरताच येणार नाही. या पार्श्वभूमीवर जगभरातील युजर्सना आपल्या माहितीच्या सुरक्षिततेची चिंता वाटू लागली आहे. त्यामुळे युजर्स व्हॉट्सॲप काय पर्याय आहे, ते शोधत आहेत.

प्रायव्हसीला घाला घालणारी ही सेटिंग मान्य करावी की नाही?

या संभ्रमात आता अजून भर पडली जेव्हा सिग्नल हे एक मेसेजिंग ॲप हे नाव समोर आलं आहे. काय आहेत सिग्नल ॲपची वैशिष्ट्ये :

१) पैसा कमावणे हा उद्देश नाही :

‘सिग्नल’ हे एक प्रायव्हेट मेसेंजर ॲप आहे. सिग्नल फाऊंडेशनने हे ॲप तयार केलं आहे. तसेच या ॲपचा उद्देश हा पैसा कमावणे म्हणजे व्यवसाय हा नाही.

वेगवेगळ्या फाऊंडेशन्सनी आणि गुंतवणुकदारांनी दिलेल्या डोनेशन्सवर हे ॲप उभं आहे. म्हणजेच ‘स्वयंसेवी संस्था’ या तत्वावर चालणारं हे ॲप आहे.

२) सुरक्षितता :

या ॲपद्वारे युजर्सचा डेटा ज्याने पाठवला आहे आणि ज्याला पाठवला आहे, त्या व्यतिरिक्त कोणीही वाचू शकत नाही, अर्थात End-to-End encrypted असल्याचा दावा हे ‘सिग्नल’चं वैशिष्ट्यं आहे. अर्थातच व्हॉट्सॲपमध्येही ही सुविधा आहे.

 

signal inmarathi

३) जाहिरात, ट्रॅकिंग किंवा गंमतीपासून मुक्तता :

सिग्नल ॲपवर जाहिरात नाही. शिवाय त्यामध्ये युजरचा डेटा कोणत्याही पद्धतीने ट्रॅक केला जात नाही आणि विशेष म्हणजे युजर्सची किंवा त्यांच्या माहितीची कोणत्याही स्वरुपाची गंमत केली जात नाही.

४) वेग :

सिग्नलद्वारे मेसेजस अधिक वेगाने पाठविता येतात, हे ॲपचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.

५) फोटोज एडिज करण्याची सुविधा :

‘सिग्नल’मध्ये फोटोजना एडिट करण्याची इन-बिल्ड सुविधा उपलब्ध आहे.

गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असलेलं हे ॲप आतापर्यंत एक कोटीहून अधिक युजर्सनी डाऊनलोड केले आहे. तर ६ लाखांहून अधिक जणांनी त्यावर आपला अभिप्राय नोंदवला आहे आणि या संख्येत वेगाने वाढ होत आहे.

टेस्ला या टेक्नो कार बनवणाऱ्या कंपनीच्या CEO ने जेव्हा ट्विट करून “सिग्नल वापरा” हे सांगितलं तेव्हा त्याचे डाउनलोड वेगाने वाढले आहेत.

 

encryption inmarathi

 

हे दोन्ही ॲप अमेरिकेचेच आहेत. फेब्रुवारी २०१८ मध्ये मॅक्सी मर्लिनस्पाईक यांनी तयार केलेल्या या ॲपला आता सुगीचे दिवस आले आहेत असं म्हणता येईल.

ब्रायन ऍक्शन यांचा Whatsapp निर्मिती मध्ये मोठा वाटा होता. जेव्हा Whatsapp हे फेसबुकने विकत घेतलं त्यावेळी ब्रायन यांनी मॅक्सी मर्लिनस्पाईक यांच्यासोबत मिळून सिग्नल फाउंडेशनची स्थापना केली.

Whatsapp चा वैयक्तिक माहितीवर असलेला डोळा हे त्यांच्या बाहेर पडण्याचं एक कारण मानलं जातं. सिग्नल हे Whatsapp पेक्षा सुरक्षित आहे का? होय असं सर्व तज्ञ सध्या सांगत आहेत.

याचं प्रमुख कारण म्हणजे स्क्रीन सेक्युरीटी हे फिचर. या फिचर मुळे तुम्ही कोणाशी केलेला वैयक्तिक संवाद याचा कोणी स्क्रीनशॉट काढू शकणार नाही.

मागील पाच वर्षात तयार झालेला Whatsapp चा वणवा सिग्नलच्या येण्याने शांत होईल का? हे येणारा काळच सांगेल. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलोन मस्क जेव्हा ट्विट करून सिग्नलची बाजू घेतो तेव्हा त्यात काही तरी तथ्य असणार हे नक्की.

 

elon musk inmarathi

 

मागच्या दोन दिवसात सिग्नल हे app दिवसाला १ लाख डाउनलोड या गतीने आपले ग्राहक वाढवत आहे. त्याच वेळी Whatsapp चे डाउनलोड मात्र ११% ने कमी झाले आहेत असं आकडे सांगत आहेत.

सिग्नल या ॲप वरून कॉल करणे सुद्धा उपलब्ध आहे आणि ते सुद्धा एनक्रिप्ट करून मगच समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचतं हे सांगण्यात आलं आहे. म्हणजे तुमच्या संभाषणाचा कोणताही अंश सिग्नलकडे राहत नाही.

सिग्नल किंवा Whatsapp ह्या स्पर्धेत कोण बाजी मारेल? हे काही दिवसात समोर येईल. पण, तोपर्यंत ही चर्चा सोशल मीडिया वर सुरू राहणार हे नक्की.

सिग्नल सारखं एखादं ॲप आपल्या भारतात सुद्धा तयार व्हावं आणि या उपयुक्त अप्लिकेशन तयार करणाऱ्या देशांच्या स्पर्धेत भारताचं नाव सुद्धा दिसावं अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?