' 'वेळच नाहीये' ही तक्रार आहे? ही समस्या सोडवणाऱ्या, यश मिळवून देणाऱ्या भारी टिप्स!

‘वेळच नाहीये’ ही तक्रार आहे? ही समस्या सोडवणाऱ्या, यश मिळवून देणाऱ्या भारी टिप्स!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

वेळ कसा निघून जातो आपल्याला पत्ताच लागत नाही. काम करताना तर वेळ अजूनच पटकन निघून जातो आणि आपलं काम हवं तसं होत नाही. ५ मिनिटं ब्रेक घेण्यासाठी म्हणून आपण कामातून उठतो, तेव्हा ५ काय ५० मिनिटं कशी निघून जातात हे कळतच नाही.

एका सर्व्हेनुसार, ८ तासांच्या ‘वर्क फ्रॉम होम’मध्ये लोक फक्त ३ तास एक चित्त होऊन काम करू शकतात. लागला ना धक्का? पण हा नैसर्गिक नियमच आहे.

माणूस हा २.५ किंवा ३ तासच लक्षपूर्वक काम करू शकतो. इतर वेळी त्याला एकाग्रतेने काम करायला भरपूर त्रास होतो. मन भरकटतं. शिवाय हल्ली मोबाईल आणि इंटरनेटची कृपा आहेच. या सगळ्या सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे आपले दिवसातले ३-४ तास वाऱ्यासारखे कसे उडून जातात याचा पत्ताच लागत नाही.

 

social media inmarathi

 

तुम्हाला ही हा त्रास होतोय का? महत्त्वाचं काम हातात पडलंय, पण आपण टिंगल टवाळक्या करत बसलोय किंवा मोबाईल ब्रेक म्हणून ५ मिनिटे उठलो आणि २-३ तास निघून गेलेत. तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. मन भरकटत असेल तर ते पुन्हा ताळ्यावर कसं आणावं याच्या काही टिप्स:

१) सकारात्मक विचार करा-

 

think positive inmararthi

 

जेव्हा तुम्ही नवीन दिवस सुरु करणार असाल तेव्हा मनात कल्पना करा, की आज मी ठराविक काम पूर्ण करणारच. आजचा दिवस फक्त व्यस्तच नाही, तर त्यातून मला बरंच शिकायला मिळणार आहे.

दिवसाची सुरुवात अशी सकारात्मकतेने केलीत, तर तुमच्यात काम करण्याची नवीन ऊर्जा येईल आणि ठरवलेलं काम करूनच तुम्ही उठाल.

२) to do list –

 

to do list inmarathi

 

आदल्या रात्रीच दुसऱ्या दिवशीची तयारी करून ठेवा. आपल्याला उद्या काय काय कामं करायची आहेत याची एक लिस्ट करा. त्यामुळे दुसऱ्या दिवशी होणारा गोंधळ कमी होईल आणि सगळी काम पूर्ण होतील.

३) ऑफिसला जाण्यासारखी तयारी करा –

 

work from home inmarathi

 

वर्क फ्रॉम होम असलं की आपण हमखास घरचे, सैल, सुटसुटीत कपडे घालतो, पण याने आपल्याला काम करायचंय ही भावना कधी कधी येतच नाही. याउलट सुट्टी असल्यासारखं वाटत राहतं.  घरच्या कपड्यांनी आळस येतो. म्हणून, ऑफिसला जसे जाता, तशीच तयारी करा.

४) एका वेळी एकच काम करा –

तुम्हाला एका वेळी २-३ कामं करता येतात हे समोरच्याला ऐकून फार भारी वाटत असेल, पण प्रत्यक्षात मात्र असं नसतं. शिवाय एकावेळी २ कामं करताना दुप्पट शक्ती लागते व एकही काम पूर्ण न करताच आपला दिवस संपून जातो. म्हणून एका वेळी एकच काम करा.

५) टायमरचा वापर करा –

काम करत असताना एखाद्या कामाला जास्तीत जास्त किती वेळ लागू शकतो याचा अभ्यास करा आणि  त्यानुसार टायमर लावा. ठराविक वेळात ठराविक काम व्हायला हवं असं ठरवून कामाला लागा. तुमचं काम नक्की होईल.

६) एकावेळी एकच यंत्र वापरा –

 

mobile inmarathi

 

आपल्याकडे ipad, स्मार्ट फोन, लॅपटॉप, डेस्कटॉप इतकी विविध यंत्रे आपली कामं सोपी करण्यासाठी आहेत असं वाटतं, पण तसं नाहीये. एकाच वेळी जर तुम्ही २-३ गोष्टी वापरत असाल, तर दुप्पट वेळ वाया जातो व लक्षही लागत नाही.

मोबाईलवर काम करत असताना जगभराचे मेसेज, बातम्या आणि नोटिफिकेशन आपल्याला येतात. त्यामुळे आपलं मन पुन्हा दुसरीकडे धावतं. असं होऊ नये म्हणून एकावेळी एकच गोष्ट वापरा.

७) ब्रेक घ्या –

 

office inmarathi

 

दिवसाचे २-३ तास एकचित्ताने काम करून झाल्यावर काही वेळाने आपली कार्य करण्याची क्षमता कमी होऊ लागते, पण दिवसातून फक्त २-३ काम करून चालणार नसतं. म्हणून दमल्यासारखं वाटत असेल, तर ब्रेक घ्या.

खाऊन या, अंघोळ करून या, हातपाय आणि चेहरा थंड पाण्याने धुवा, चहा घ्या, गाणी ऐका. यापैकी काहीही करून स्वतःला रिसेट करा. कम्प्युटर पूर्णपणे बंद करून १० वेळा लांब श्वास घेऊन पुन्हा काम सुरु करू शकता.

या ट्रिक्स तुम्हाला वेळेत काम पूर्ण करायला मदत करतील.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?