जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===

जगातील सर्वात मोठे आणि यशस्वी गुंतवणूकदार म्हणून वॉरेन बफेट यांचा बोलबाला आहे. शेअर मार्केट, इन्व्हेस्टमेंट्स ह्या विषयांत रूची असणाऱ्यांपैकी कुणाला त्यांचे नाव कोणाला माहित नसेल तर नवलच! शेअर मार्केट मधील अफाट ज्ञान, अचूक अंदाज, अनुभव या सर्व गोष्टींनी मिळून वॉरेन बफेट या माणसाला बनवलं आहे.

म्हणूनच फोर्ब्ज मॅगझीन त्यांना “फादर फिगर” म्हणतं!

 

warren-buffett-marathipizza
www.forbes.com

पण तुम्हाला माहित आहे का सध्या या माणसाच्या सर्व कारभाराची सूत्र कोणाच्या हातात आहे? अहो हा एक भारतीय माणूस आहे, ज्याचं नाव आहे – अजित जैन!

अजित जैन यांनी Berkshire Hathaway या कंपनीला २,९७,१३२ करोड (साधारण ३०० अब्ज रूपये!) रुपयांचा फायदा मिळवून दिला आहे. सध्या ही कंपनी वॉरेन बफेट यांच्या हातात आहे. वॉरेन बफेट स्बत: अजित जैन यांच्या हुशारीमुळे प्रभावित आहते. ते नेहमी अजित यांची स्तुती करत असतात. त्यांनी एकदा आपल्या भाषणात कर्मचाऱ्यांना म्हटलं होतं की,

जर मी, कंपनीचे व्हाईस चेअरमन चार्ली मुंगेर आणि अजित जैन – आम्ही तिघे पाण्यात बुडत असू, तर थोडा ही विचार न करता अजित जैन यांना वाचवा, कारण त्यांची बुद्धिमता आणि हुशारी तुम्हाला वाचवेल.

 

ajit-jain-marathipizza
economictimes.indiatimes.com

अश्या अजित जैनबद्दल आपल्याला फार कमी माहिती आहे. चला तर वाचा – ह्या इकॉनॉमिक वंडर बद्दल –

अजित जैन यांचा जन्म १९५१ साली ओडीसा मध्ये झाला. पुढे आयआयटी खड्गपूर मधून मॅकेनिकल इंजिनियरिंग करून १९७३ ते १९७६ या काळात त्यांनी IBM कंपनीसाठी काम केले. १९७६ मध्ये IBM ची साथ सोडून ते अमेरिकेत येऊन दाखल झाले. तेथे त्यांनी प्रसिद्ध Harvard Business School मधून MBA चं शिक्षण घेतलं. MBA झाल्यावर McKinsey & Co या कंपनीमध्ये काही काळ काम केलं.

१९८६ हे वर्ष त्यांच्या जीवनातील महत्त्वाचं वर्ष ठरलं.

या वर्षी त्यांना Berkshire Hathaway कंपनी मध्ये काम करण्यासाठी बोलावणं आलं. त्यांनी ही जास्त आढेवेढे न घेता या संधीचा फायदा घेतला. त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती की हे पाउल त्यांना यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. आज अजित जैन या जगप्रसिद्ध कंपनीच्या रीइन्श्युरन्स ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अर्थात हे सर्व शक्य झाले त्यांनी घेतलेल्या अफाट मेहनतीमुळे.

 

ajit-jain-marathipizza02
http://abcnews.go.com

त्यांनी Berkshire Hathaway कंपनी स्वत:ची मानून त्यात काम केले आणि कंपनीला कधी नव्हे तेवढा फायदा मिळवून दिला. त्यांच्या या कामगिरीमुळे खुद्द वॉरेन बफेटची मर्जी त्यांच्यावर जडली. आपल्या प्रत्येक निर्णयामध्ये ते अजित यांचा सल्ला घेऊ लागले. हळूहळू वॉरेन बफेट यांच्या वाढत्या यशामध्ये अजित जैन यांचे महत्त्वपूर्ण योगदान दिसू लागले. दुसरीकडे Berkshire Hathaway च्या रीइन्श्युरन्स ग्रुपला देखील त्यांनी अतिशय मोठे केले. आज Berkshire Hathaway कंपनीला सर्व जास्त उत्पन्न त्यांच्या रीइन्श्युरन्स ग्रुप मधूनच मिळते आणि याचे सर्व श्रेय जाते अजित जैन यांना!

अजित जैन यांचा बिझनेस कडे पहाण्याचा दृष्टीकोन देखील वेगळा आहे ते म्हणतात –

बिझनेस मध्ये चुकीचे निर्णय अतिशय घातक असतात. एक चुकीचा निर्णय तुमच्या इतर चांगल्या निर्णयांवर वाईट परिणाम करू शकतो. जसं की एक सडका आंबा टोपलीमधल्या इतर आंब्यांना सडवतो. हे त्याच प्रकारचं आहे. म्हणूनच बिझनेस मध्ये त्या एका वाईट निर्णयापासून नेहमी लांब राहिलेलं बरं. तरच यश मिळते.

 

ajit-jain-marathipizza03
businesstoday.in

८६ वर्षीय वॉरेन बफेट यांनी अनेकदा बोलताना ६४ वर्षीय अजित जैन यांना आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले आहे. अजित जैन यांच्या प्रतिभेवर वॉरेन बफेट यांचा प्रचंड विश्वास आहे. आपलं साम्राज्य त्यांच्या हातात सुरक्षित आहे याची जणू त्यांना पूर्ण खात्री आहे.

 

ajit-jain-marathipizza01
www.wsj.com

जगभरात प्रत्येक क्षेत्रामध्ये भारतीय व्यक्तींनी आपल्या कामगिरीने अपली मान गर्वाने उंच केली आहे. अजित जैन हे देखील त्यापैकीच एक!

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “जगातील सर्वात यशस्वी इन्व्हेस्टर वॉरेन बफेट यांच्या यशामागचा भारतीय!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?