' ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार, फायदे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या...

ड्रायव्हिंग लायसन्सचे प्रकार, फायदे आणि त्यासाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

ड्रायव्हिंग लायसन्स ही कोणत्याही देशात, राज्यात वाहन चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक गोष्ट आहे. आपल्या वॉलेटमध्ये सतत असणाऱ्या या स्मार्ट कार्डचे खूप फायदे आहेत. आपल्या वाहन परवान्याचे काही फारसे प्रचलित नसलेले फायदे या लेखातून आम्ही सांगत आहोत.

 

driving-license-inmarathi

 

पहिली आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही भारतात कुठेही वाहन चालवू शकता. महाराष्ट्र सरकारच्या अखत्यारीत येणारं RTO म्हणजे रोड ट्रान्सपोर्ट ऑफिस यांच्याकडे वाहतूक आणि सुव्यवस्था टिकवून ठेवण्याची जबाबदारी असते.

१२ करोडपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात हे काम करणं फार सोपं नाहीये. सामान्य माणसाला RTO चं नाव घेतलं की समोर येतो तो म्हणजे भ्रष्टाचार, लांबच लांब रांगा, कामाला लागणारा वेळ इतकंच. त्यामुळे कुठेतरी त्यांच्या कार्यक्षमतेबद्दल काही लोक साशंक असतील.

पण, जर का फक्त आपल्या वाहन परवान्याचा जरी विचार केला तरीही आपल्या लक्षात येईल की, त्याद्वारे आपल्याला खूप सेवा मिळू शकतात ज्याबद्दल फार कमी वेळेस भाष्य केलं जातं.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

 

तुमच्या वयाचा आणि तुमच्या राहत्या घराचा पत्ता म्हणून सुद्धा वाहन परवाना हा कोणत्याही ऑफिसमध्ये ग्राह्य धरला जातो. कोणतंही नवीन ड्रायव्हिंग लायसन्स जेव्हा दिलं जातं, तेव्हा त्या वाहनांसाठी उपयुक्त वाहन व्यवस्थेची सोय करणं ही स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटची असते.

त्यांच्या कार्यात आपल्याला कुठेही कमतरता दिसली तर आपण त्यांना आपल्या वाहन परवान्याच्या आधारे ती कमतरता दाखवून देऊ शकतो.

वाहन परवाना देण्यासाठी प्रत्येक राज्याने काही नियमावली ठरवली आहे. तुम्ही वैयक्तिक वापरासाठी वाहन वापरणार आहात की व्यवसायासाठी? यावरून तुमचा वाहन परवाना ट्रान्सपोर्ट की नॉन ट्रान्सपोर्ट हे ठरतं.

 

rto-inmarathi

 

ट्रान्सपोर्ट प्रकारच्या वाहन परवान्यामध्ये वाहनांच्या आकारावरून प्रकार पडतात:

१. लाईट मोटर – जीप, रिक्षा आणि मटेरियल डिलिव्हरीसाठी वापरल्या जाणाऱ्या गाड्यांसाठी हा वाहन परवाना गरजेचा असतो.
२. मिडीयम पॅसेंजर – टेम्पो, मिनीव्हॅनसाठी लागणारा परवाना.
३. मिडीयम गुड्स: टेम्पो, ट्रक, व्हॅन इत्यादी.
४. अवजड वाहने: बस, मिनीबस हे वेगळ्या प्रकारात मोडतात.
५. अति अवजड वाहने: मोठे ट्रक जे फक्त माल वाहतुकीसाठी वापरले जातात.

‘नॉन ट्रान्सपोर्ट’ या प्रकारात आपण वापरतो ते टू व्हीलर – गिअर असलेली आणि गिअर नसलेली या गाड्या आणि त्यांचे वाहन परवाने ग्राह्य धरले जातात. कार या लाईट मोटर गाड्यांच्या प्रकारात मोडतात.

bike-on-road-inmarathi

 

तुम्हाला जर महाराष्ट्रात वाहन परवाना मिळवायचा असेल तर खालील गोष्टींची पूर्तता करणं आवश्यक आहे:
१. लर्निंग म्हणजेच शिकाऊ परवाना हा आधी काढावा लागतो. लर्निंग लायसन्स काढल्यानंतर ३० दिवसांनी आपण पक्क्या म्हणजेच पर्मनंट लायसन्ससाठी अर्ज करू शकतो.
२. दुचाकी साठी १८ वर्ष तर चार चाकी साठी २१ वर्ष ही वयाची अट परवाना मिळवण्यासाठी ठेवण्यात आली आहे.

ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी खालील कागदपत्रांची पूर्तता करावी लागते:

तुमची योग्य जन्मतारीख असलेलं खालीलपैकी कोणतंही एक प्रमाणपत्र सादर करणं अपेक्षित आहे:

१. जन्माचा दाखला
२. निवडणूक ओळखपत्र
३. शाळेची एलसी
४. पॅन कार्ड
५. पासपोर्ट

तुमचा सध्याचा आणि योग्य पत्ता असलेलं खालीलपैकी कोणताही एक पुरावा सादर करावा लागतो:

१. पासपोर्ट
२. लाईफ इन्शुरन्स पॉलिसी
३. रेशन कार्ड
४. लाईट किंवा फोन बिल

 

heavy-vehicle-inmarathi

 

याव्यतिरिक्त पर्मनंट लायसन्स मिळवताना ३ पासपोर्ट आकाराचे फोटो, लर्निंग लायसन्सची मूळ प्रत आणि फॉर्म नंबर ४, जो ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्यावसायिक कामासाठी एखादं वाहन वापरायचं असल्यास वाहन शिकलेल्या संस्थेकडून देण्यात येणारं प्रमाणपत्र हे अपेक्षित असतं. ते उपलब्ध करून ठेवणं आवश्यक आहे.

ड्रायव्हिंग लायसन्सकरिता अर्ज करण्यासाठी खालील पद्धतींपैकी वापर केला जाऊ शकतो:

१. ऑनलाईन:
नवीन परवान्यासाठी ऑनलाईनचा वेबसाईटचा पर्याय उत्तम ठरतो. सारथीच्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म नंबर ४ डाउनलोड करून तो भरावा लागतो.
२. फॉर्म नंबर ४ भरून अपलोड केल्यानंतर आपल्याला एक अर्ज क्रमांक मिळतो. तो क्रमांक घेऊन आपण ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी क्रमांक मिळवू शकतो.
३. ड्रायव्हिंग लायसन्स टेस्टसाठी नंबर मिळवण्याठी सारथी या वेबसाईटवर अपॉइंटमेंट स्लॉट बुकिंग या सेक्शनवर जाऊन आपण आपल्याला योग्य अशी तारीख आणि वेळ निवडू शकतो.
४. आपण निवडलेल्या तारखेला आपले सर्व मूळप्रत असलेले कागदपत्र घेऊन RTO ऑफिसला भेट द्यावी लागते. तिथे आपण टेस्ट पास झालो तर ड्रायव्हिंग लायसन्स हे पोस्टाने आपल्या पत्त्यावर पाठवण्यात येतं.

ऑनलाईन अर्ज भरणे शक्य नसल्यास आपल्याला हीच कामं RTO ऑफिसला प्रत्यक्ष भेटून करावी लागतात.

तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स हरवल्यास किंवा चोरी झाल्यास तुम्हाला ते हरवल्याची एक FIR कॉपी RTO ऑफिसला तुमच्या कागदपत्रांसोबत जमा करावी लागते. तुमचा वाहन परवाना गहाळ होण्याच्या सहा महिन्यांच्या आत तुम्ही डुप्लिकेट ड्रायव्हिंग लायसन्सकरिता अर्ज करणं बंधनकारक आहे. तसं न केल्यास तुमचा अर्ज स्टेट ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटच्या हेडक्वार्टर्समध्ये संमतीसाठी पाठवण्यात येतो.

driving-license1-inmarathi

 

तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सची मर्यादा संपण्याच्या ३० दिवसाच्या आत तुम्ही RTO कार्यालयाला भेट देऊन नवीन लायसन्ससाठी फॉर्म भरणं अपेक्षित आहे. आपण बघतो की कित्येक मंत्री, कलाकार हे या कामासाठी स्वतः रांगेत उभं राहून वाहन परवाना पुढील २० वर्षांसाठी काढून घेत असतात.

वयाची पन्नाशी किंवा पुढील २० वर्षांसाठी ‘यापैकी जे आधी’ त्या मुदतीनुसार ड्रायव्हिंग लायसन्स हे वितरित करण्यात येतं. पाच वर्षांपेक्षा आधी मुदत संपलेला वाहन परवाना हा रिन्यू केला जाऊ शकत नाही.

त्यासाठी तुम्हाला नवीन वाहन परवाना मिळवण्यासाठी अर्ज – फॉर्म नंबर ९ हा भरावा लागतो. त्यासोबतच फॉर्म नंबर १ ज्यामध्ये फिजिकल फिटनेस, फॉर्म १अ- मानसिक स्वास्थ्य प्रमाणपत्र (५० वर्षाच्या वरील लोकांना) हे भरून द्यावं लागतं. ३ पासपोर्ट साईझ फोटो आणि अर्ज भरण्याची फी ही फॉर्मसोबत द्यावी लागते.

आपल्यापैकी ज्या लोकांनी वयाची १८ किंवा २१ वर्ष पूर्ण केली आहेत आणि ड्रायव्हिंग लायसन्स साठी प्रयत्न करत आहात त्यांना ही माहिती नक्कीच उपयुक्त ठरेल. सुरक्षितपणे वाहन चालवा आणि प्रवासाचा आनंद घ्या.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?