' ३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आयुष्याशी लढणाऱ्या आधुनिक ‘झाशीच्या राणी’ची गोष्ट! – InMarathi

३ वर्षाच्या मुलाला सोबत घेऊन आयुष्याशी लढणाऱ्या आधुनिक ‘झाशीच्या राणी’ची गोष्ट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आजच्या प्रगत काळात शिक्षक, वैज्ञानिक, टेलर, गृहिणी, डॉक्टर, इंजिनियर या पारंपरिक प्रोफेशन्सपासून विमान चालक, टॅक्सी चालक यांसारख्या नव्या आणि जोखमीच्या क्षेत्रांत सुद्धा स्त्रिया भरारी घेत आहेत. पुरुष प्रधान क्षेत्रात स्त्रियांची ही कर्तबगारी अगदी वाखाणण्याजोगी आहे.

 

lady-pilot-inmarathi

हे ही वाचा – अशी कर्तबगार पहिली महिला राणी जिला उलथवण्यासाठी भावांनी कट केला होता!

गोष्ट आहे कथुआ जिल्ह्यातील. काही दिवसांपूर्वी जम्मू काश्मीर येथील कथुआत घडलेल्या दुष्कर्माची वार्ता पूर्ण भारतात आणि बाहेरील देशात पसरली. ज्यामुळे आपल्या देशाची बरीच बदनामी झाली होती.

पण आज त्याच कथुआतून महिला सबलीकरणाचं एक उदाहरण जगाला मिळतंय ते पूजा देवीच्या या गोष्टीतून.

२४ डिसेंबर २०२० रोजी, जम्मू काश्मीर येथील जम्मू ते कथुआपर्यंत चालणाऱ्या प्रायव्हेट बसला, एक तीन मुलांची आई असलेली एक महिला ड्रायव्हर मिळाल्याची बातमी व्हायरल झाली.

भरपूर लोकांनी बातमी शेअर करत, पूजा देवींचे कौतुक केले, शुभाशीर्वादांचा वर्षाव केला आणि भरपूर प्रेम व्यक्त केले.

 

pooja-devi-inmarathi

 

पण आपण फक्त शेवटी आपल्याला दिसत असलेलं यश आणि निकाल एवढंच बघतो. त्यामागे त्या व्यक्तीने किती मेहनत घेतलेली असते, किती खाच-खळग्यांतून त्याने हा मार्ग शोधलेला असतो, किती वेळा धडपडून पुन्हा उठून प्रयत्नांचा कस लावलेला असतो, हे आपण बघतच नाही. चमचमणाऱ्या यशाच्या मागे किती कठोर परिश्रम असतात याचीच एक गोष्ट आज जाणून घेऊया.

पूजा देवी एका अत्यंत गरीब कुटुंबात वाढल्याने शिक्षणास मुकल्या. अर्थातच, याची त्यांना खंत वाटते. पण लहान पणापासूनच जड, मोठी, आणि पुरुष चालवत असलेली वाहनं जसे ट्रक, बस, ट्रॅक्टर, इत्यादी वाहनं त्यांना आवडायची आणि एखाद दिवशी आपणही हे वाहन चालवू हे त्यांचं स्वप्न होतं.

दुर्दैवाने, सासरी सुद्धा परिस्थिती फारशी काही चांगली नव्हती म्हणून त्यांनी वेगवेगळ्या नोकऱ्या करण्याचा प्रयत्न केला. जम्मू – कथुआ बस ड्रायव्हर होण्याआधी पूजा देवींनी वेगवेगळी कामं करून बघितली. त्यांनी आधी पॅसेंजर कार आणि टॅक्सी सुद्धा चालवली. त्यानंतर त्या, ड्रायव्हिंग प्रशिक्षक म्हणून एका द्रायव्हिंग स्कुलमध्ये नोकरी करू लागल्या.

 

driving-school-inmarathi

 

मात्र त्यांना कारसारख्या छोट्या वाहनांमध्ये अजिबात रस नव्हता. त्यामुळे त्यांनी ट्रक चालवायला शिकायचं ठरवलं. माहेरची मंडळी, सासू-सासरे, पती, इतर नातेवाईक यांनी पूजाच्या निर्णयाला अजिबातच पाठिंबा दिला नाही.

महिलांसाठी अशी नोकरी करणं, असं करियर निवडणं अजिबात चांगलं नसतं आणि भरपूर धोक्याचं असतं, असं त्यांना वाटायचं.

म्हणून त्या सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात विरोध केला. पण ते म्हणतात ना “जितकं तगडा विरोधी पक्ष तितके जास्त आपले प्रयत्न आणि तेवढंच मोठं यश” तसंच त्यांच झालं.

त्यांच्या पुढे काही तरी वेगळं करण्यापलीकडे काही उपायही नव्हता. कारण शिक्षणाचा अभाव असल्याने, जास्त पैसे मिळवायचे असतील तर काही तरी हटके करणं त्यांना भाग होतं. आपलं जड वाहन शिकण्याचं स्वप्न हे सुद्धा हटकेच आहे, ह्याची त्यांना खात्रीच पटली.

त्यानंतर मग सुरु झाला प्रवास पूजा देवी ते ड्रायव्हर पूजा देवी बनण्याचा प्रवास!

 

pooja-devi-bus-driver-inmarathi

 

त्यांना ट्रक चालवण्याचे प्रशिक्षण त्यांचे मामा, राजिंदर सिंघजी यांनी दिले. या मदतीसाठी त्या राजिंदरजींच्या खूप आभारी आहेत, असं त्या म्हणतात. पुढे त्यांनी बस चालवण्याच्या तांत्रिक बाबी शिकून घेतल्या. पण आपण महिला असल्याने कोणीही आपल्याला बसची ड्रायव्हर म्हणून नोकरी देणार नाही, अशी भीती त्यांना वाटत होती.

कारण घरच्यांकडूनच इतका विरोध होता, तर बाहेर समाजातही तेच असेल अशी त्यांनी स्वतःची समजूत करून घेतली होती. पण त्यांच्या थोड्या प्रयत्नांनी त्यांना यश मिळवून दिलं. जम्मू – कथुआ बस युनियनने त्यांच्यावर आणि त्यांच्या ड्रायव्हिंगवर विश्वास टाकला आणि त्यांना एक संधी दिली.

 

pooja-devi-driver-inmarathi

 

पूजा देवी याचीच तर आतुरतेने वाट बघत होत्या. त्यांनी त्या संधीचं सोनं केलं. आणि आज त्यांचं यश आपल्या डोळ्यांपुढे आहे.

त्या म्हणतात बस चालवण्यापेक्षा बसमध्ये बसणाऱ्या प्रवाशांकडे दुर्लक्ष करणं कठीण वाटतं. पण मी आज तेही शिकले आहे. प्रवासी बसमध्ये येतात, तेव्हा, वळून वळून माझ्याकडे बघतात. समोर एक लेडी ड्रायव्हर असल्याचं त्यांना आश्चर्य वाटतं.

काहींना ते पसंत पडत नाही हे ही मला जाणवतं, काहींना महिलांच्या ड्रायव्हिंग वर विश्वास नसतो हे ही कळतं. पण मला मात्र माझ्या कलेवर पूर्ण विश्वास आहे. मी जितक्या ही फेऱ्या करते, माझ्या प्रवाशांना सुखरूप त्यांच्या गावी पोहचवते.

पूजा देवीचा लहाना मुलगा अगदी 3-3.5 वर्षांचा आहे. त्याला घरी भावा बहिणींबरोबर राहणं जमत नाही. आईची आठवण येते म्हणून तो पूजा देवीच्या बरोबर, बसमध्ये बसून प्रवास करतो.

 

pooja-devi-with-son-inmarathi

हे ही वाचा – एअर इंडियाच्या महिला कर्मचाऱ्यांनी पुरुषांना ही अशक्य होत ते करून दाखवलं

आपलं स्वप्न आणि काम सांभाळत पूजा, आपल्या कुटुंबाप्रति आपली जबाबदारी सुद्धा तितक्याच चिकाटीने पार पाडतात आहेत. आपल्या बाळाला, आपल्या बरोबर घेऊन येणं हा सुद्धा त्यातलाच भाग आहे ना?

महिला आज फायटर जेट उडवतायत, रेल्वे चालवतायत, गाड्या, ऑफिस, नोकरी, घर दार, सगळं अगदी व्यवस्थित संभाळतायत. त्यांना फक्त थोड्या प्रोत्साहनाची गरज असते.

त्या कमजोर आहेत म्हणून नाही, तर त्या नसताना तुम्ही तुमची स्वतःची किती काळजी घेऊ शकता हे दाखवण्यासाठी.

कारण कितीही झालं तरी “घार आकाशात उंच उडत असली, तरी तिची नजर मात्र आपल्या घरट्या कडे असते”. काही लोकं युक्तिवाद करावा म्हणून म्हणतात “हो निसर्गानेच स्त्रियांना कमजोर बनवलंय, नाजूक बनवलंय मग कशाला हा अट्टाहास?”

तर जुन्या काळी जेव्हा खरंच ताकदीची गरज होती, तेव्हा स्त्रिया घरातच असायच्या. कारण त्यांना घर सांभाळणे आणि एका वेळी अनेक कामे करण्याचे गुण नैसर्गिक रित्याच प्राप्त असतात. पण आता शक्तीची जागा मशीनने घेतली आहे त्यामुळे जिथे बुद्धी आणि कला आहे, तिथे आज स्त्री सुद्धा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?