' घरातलं तुळशीचं रोप सारखं मरतंय? रोप वाढवण्याच्या या टिप्स जाणून घ्या – InMarathi

घरातलं तुळशीचं रोप सारखं मरतंय? रोप वाढवण्याच्या या टिप्स जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

तुळस – एक अत्यंत महत्वाची आणि उपयुक्त औषधी वनस्पती. हिंदू धर्मात तुळशीचं एक वेगळंच स्थान आहे. आणि ते का आहे हे आता आपल्याला नक्कीच कळलं असेल. कारण आता तुळस एक ट्रेंडिंग वनस्पती बनली आहे. सगळेच डायटीशीयन, प्रसिद्ध शेफ, सेलेब्रिटी फूड कौन्सेलर सगळेच तुळशीचा आपल्या प्रत्येक डिशमध्ये, नवीन इन्व्हेन्शनमध्ये तुळशीचा वापर करताना दिसतात.

आपल्या आरोग्यासाठी तुळस किती महत्त्वाची आहे हे आता पाश्चात्य लोक सुद्धा मान्य करतायत. पूर्वीच्या काळी स्त्रियांनी तुळशीला जल अर्पण करून, तिची पूजा करून, प्रदक्षिणा घालण्याची प्रथा होती. यामागील कारण हे की तुळस इतर झाडांपेक्षा अधिक प्रमाणात प्राण वायू देते.

 

basil1-inmarathi

 

तुळशीभोवती गोल फेऱ्या मारल्याने स्त्रियांचा सकाळी व्यायाम होत असे. पुरुष मंडळी बाहेर जाऊन, वडाच्या झाडाखाली असलेल्या ओट्यावर बसायची त्यामुळे त्यांना तुळशीभोवती फेऱ्या घालण्याची गरज नव्हती.

 

 

सर्दी खोकला यावरचं एक गुणकारी औषध, त्वचेसाठी उपयुक्त, ऑक्सिजन जास्त प्रमाणात देणारं हे रोप आपण अगदी हौसेने लावतो, पण ते रोप फार जगत नाही किंवा त्याची पाने काळी किंवा जांभळी पडतात आणि झाड मारून जातं. यामागे कुठलीही अंधश्रद्धा नाही, त्यामुळे आपल्या घरावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव झाला असेल का हा विचार मनातून अगदी काढून टाका.

मग काय आहेत तुळस सतत वाळण्यामागची कारणं आणि उपाय हे आपण आज पाहूया: 

रोप वाळण्यामागची काही कारणं व उपाय –

 

१) कुंडी/वृंदावन –

 

basil plant inmarathi1

 

तुळशीच्या झाडाची इतर झाडांप्रमाणे किंवा त्याहून जरा जास्तं काळजी घ्यायला लागते. म्हणूनच आपण वृंदावन किंवा तुळस  लावणार आहोत ती कुंडी कशी आहे, तिची क्वालिटी कशी आहे यावरही रोपाचं आयुष्य अवलंबून असतं.कुंडी किंवा तुळशी वृंदावन जर प्लास्टिक किंवा सिमेंटचं असेल तर तुळस त्यात फार काळ टिकणार नाही. त्यामुळे तुळस लावण्यासाठी शक्यतो मातीच्या कुंडीचा आणि वृंदावनाचा वापर करावा.

हे ही वाचा – छोट्याशा घरातून सुरु झाली भारतातील सर्वात जुनी आणि मोठी आयुर्वेदिक औषध कंपनी!

२) बीज –

तुळशीचं बीज कसं आहे त्यावर सुद्धा तुळशीचं आयुष्य निर्भर करतं. त्यामुळे बीज विकत घेताना योग्य ती काळजी घेऊन बीज घ्या. ऑनलाइन बीज विकत घेणार असाल तर आधी संपूर्ण माहिती काढून घ्या. फसवा फसवीचे प्रकार घडण्याची शक्यता आहे.

३) माती –

 

basil plant inmarathi4

 

तुळशीला पोषकतत्वे अधिक असलेली व जास्त पाणी शोषून न घेणारी माती लागते. त्यामुळे आपल्या जवळच्या नर्सरीत जाऊन योग्य ती माती घेऊन या. आपल्या घराच्या आसपास जिथे तुळशीची रोपं आपोआप वाढलेली दिसतील तिथली माती सुद्धा तुम्ही घेऊ शकता.

 

४) पाणी –

तुळशीला जास्त पाण्याची गरज नसते. त्या रोपाला अर्धा पेला पाणी घातले गेले पाहिजे. अतिरिक्त पाण्याने तुळशी मरते किंवा पाने जांभळी पडतात.

हे ही वाचा – अनेक व्याधींवर उपयुक्त असणाऱ्या तुळशीचे हे फायदे तुम्हाला बहुतेक माहीत नसतील!

५) सूर्यप्रकाश –

 

basil plant inmarathi3

 

कोणत्याही झाडाला आपले अन्न तयार कारण्यासाठी आणि योग्य वाढीसाठी सूर्यप्रकाश लागतोच. शक्यतो सकाळचे कोवळे ऊन आणि तिन्ही सांजेचे उतरते ऊनच ज्या ठिकाणी पडते तिथे तुळशी लावावी.

तुळशीला अतिरिक्त सूर्यप्रकाशाची सुद्धा आवश्यकता नसते. त्यामुळे आपली तुळशी सतत वाळत असेल, तर ती दिवस भर रणरणत्या उन्हात असते का ते बघा आणि जागा बदला.

महत्वाची काळजी  ही घ्या, की जर तुम्ही रोप खिडकी जवळ लावणार असाल तर सूर्यप्रकाश आणि तुळशीमध्ये काच यायला नको. याने उन्हाची तीव्रता वाढेल व रोप कोमेजून जाईल. याच प्रमाणे हिवाळ्यात सुद्धा काच जास्त गार होते, त्यामुळे तुळशीच्या रोपाला जास्त गारवा मिळून रोप मरते.

 

तुळशीचे झाड लावण्याची योग्य पद्धत आणि टिप्स –

 

basil plant inmarathi

 

 

१) आपल्या कुंडीत अर्ध्याहून थोडी अधिक माती घालून सामान लेव्हल करून घ्या. माती जास्त किंवा कमी व्हायला नको. ती नेहमी कुंडीच्या आकाराच्या अर्ध्याहून १-१.५ इंच जास्त असावी.

२) माती घालण्यापूर्वी कुंडी किंवा तुळशी वृंदावत हलकेसे पाणी शिंपडून घ्या आणि मग माती घाला. याने कुंडीमध्ये मॉइश्चर साठून राहील.

३) तुळशीचे बीज घेऊन मातीत पसरवून टाका.  एका कुंडीत ७ – ८ बीज च असावीत. कारण सगळी वाढायला लागल्यास मातीतील पोषक तत्व कमी पडून वाढीस त्रास होईल.

४) तुळशीची बीजं टाकल्यावर त्यावर मातीची दाट परत चढवू नये. एक विरळ परत घाला. अगदी थोडीच माती वरून घाला.

५) आता थोड्याश्या पाण्याचा शिपका घाला. यासाठी स्प्रे करण्याची बॉटल वापरणे योग्य ठरेल. पाणी स्प्रे केले की जास्त न पडता हलके हलके पाणी पडेल व मातीची परत निघून जाणार नाही.

 

basil plant inmarathi5

 

६) आता कुंडीला उन्हात ठेवा. घरात तुळशी लावणार असाल तर रोज ५-६ तास सकाळ संध्याकाळी कुंडी उन्हात ठेवावी. यापेक्षा जास्त वेळ ठेवण्याची आवश्यकता नाही.

७) पाणी घालताना तुळशीला एक दिवसाआड पाणी घालणे योग्य असते आणि पाणी घालताना पानांवर कधीच टाकू नये. याने तुळशीच्या खोडाला इजा होते. त्यामुळे पाणी मातीत घालावे आणि हळू हळू घालावे. जेणेकरून नाजूक मुळांना त्रास होणार नाही.

८) तुळस घरात लावणार असाल, तर रोज १-२ तास टेबल फॅनने तुळशीला हवा घालणे आवश्यक आहे. झाडांना सुद्धा वातावरण कळते त्यामुळे घराबाहेर जशी हवा असते तशी मिळाली नाही तर झाडं कोमेजतात. म्हणून रोज फॅनचा स्पीड कमीत कमी ठेऊन १-२ तास वारं घाला. याने झाड अधिक छान वाढेल.

 

अत्यंत महत्वाची टीप –

 

basil plant inmarathi2

 

तुळस वाढायला लागली, की तिच्या खोडाला सगळ्यात वरती बेलाच्या पानाप्रमाणे  गुच्छे येतात. तुळशीची वाढ भरपूर व्हायला तुळस थोडीशी वाढली, की हे वरचे गुच्छे कापणे सुरु करा.

२ आठवड्यातून एकदा हे कापले गेले पाहिजे. तुळशीचे झाड बहरून दाट होण्यासाठी दर आठवड्याला तुळशीची ३-४ पाने तोडणे सुरु करा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

       

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?