' कोरोना लस येतीये, त्याचं नियोजन करणारं ॲप कोणतं? ते कसं वापरायचंय? जाणून घ्या – InMarathi

कोरोना लस येतीये, त्याचं नियोजन करणारं ॲप कोणतं? ते कसं वापरायचंय? जाणून घ्या

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना निर्मूलनासाठी पूर्ण जगाने आता कंबर कसली आहे. संपूर्ण जगात त्रासदायक ठरणाऱ्या या वायरसचा समूळ नाश करणे आणि त्यावरील लस देशातील सगळ्या व्यक्तींपर्यंत पोहोचवणे हे आता जगातील सर्व देशांसमोरील मोठं आव्हान असणार आहे.

प्रत्येक देश आपआपल्या परीने उत्तम यंत्रणा उभी करत आहे, हे आपण बघतच आहोत.

 

corona temprature inmarathi

 

कोरोना हे एक असं संकट आहे, जे कोणत्या एका इंडस्ट्रीपुरतं मर्यादित राहिलेलं नाही. काही वर्षांपूर्वी पर्यंत, देशात आलेल्या साथीच्या रोगात, फक्त केंद्रीय आरोग्य मंत्रालय, स्थानिक पातळीवरील आरोग्य कर्मचारी हे त्या साथीच्या रोगाच्या निर्मूलनासाठी एकत्र यायचे.

कोरोनाच्या बाबतीत मात्र तसं नाहीये. आज IT मधील लोकसुद्धा सर्वांपर्यंत योग्य माहिती, कमीत कमी वेळेत पोहोचवण्यासाठी आपलं योगदान देत आहेत.

आरोग्य सेतु हे ॲप जेव्हा लाँच करण्यात आलं, तेव्हा त्यामुळे सर्वांनाच त्याचा फायदा झालेला आपण बघितला. तुमच्या भागातील आरोग्य केंद्र, कोरोना बाधित लोकांची संख्या, बरे झालेल्या रुग्णांची संख्या हे सगळं एका क्लिक वर बघायला मिळणं यामुळे लोकांना खूप फायदा झाला होता.

 

aarogya setu app inmarathi3

 

विविध सेलेब्रिटी मंडळींनी सुद्धा आरोग्य सेतुची केलेली जाहिरात, लोकांना पटवून दिलेलं महत्व यामुळे सरकारला योग्य डेटा आपल्यापर्यंत पोहोचवणं सहज शक्य होत होतं.

आता कोरोनाच्या अंतिम लढ्यात ‘कोविन’ हे एक ॲप आपल्या मदतीसाठी लाँच करण्यात आलं आहे. कोरोना लस लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि तुमच्या भागातील उपलब्ध लसींची संख्या, तुमच्या पुढच्या डोसची तारीख अशी सगळी माहिती एकत्र करण्यासाठी या ॲपची निर्मिती करण्यात आली आहे.

कोरोनाची लस घेण्यासाठी लोकांमध्ये आणि आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये कोणताही मध्यस्थ असू नये, किंवा कुठल्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, हा या ॲपचा मूळ हेतू आहे. आपण अगदी सहजपणे या ॲपवर रजिस्टर करून नाव नोंदणी सहज करू शकतो.

 

co-win-inmarathi

 

सिरम इन्स्टिट्युट आणि ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटी यांनी एकत्र येऊन तयार झालेली ‘कोविशिल्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ या दोन्ही सध्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या उंबरठ्यावर आहेत. मान्यता प्राप्त झाल्यानंतर घ्याव्या लागणाऱ्या प्रत्येक स्टेपचा अभ्यास करण्यात आला आहे आणि त्याचा समावेश ‘कोविन’ या ॲपमध्ये करण्यात आला आहे.

‘कोविन’च्या आधी e VIN च्या माध्यमातून कोरोनाच्या प्रादूर्भावाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत होती. राष्ट्रीय पातळीवर हे एकमेव ॲप भारत सरकारने अधिकृत केलं आहे.

हे ॲप अधिकृत केलेलं असल्याने कोरोना लस घेताना आवश्यक असलेली माहिती आपण या ॲपला देऊ शकतो ही खात्री सरकारने लोकांना दिली आहे.

‘कोविन’ वर रजिस्टर होण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील.

१. गुगल प्ले स्टोअर किंवा अँप स्टोरमध्ये जाऊन ‘Co WIN’ हे अँप सुरू झाल्यावर ते सर्वांनी डाउनलोड करावं अशी विनंती सरकारने लोकांना केली आहे.

२. ‘कोविन’ मध्ये माहिती देताना आपला फोटो, आधार कार्ड हे आपल्याला अपलोड करावं लागणार आहे.

 

aadhar-inmarathi

 

३. आपलं आधार कार्ड अपलोड करणं शक्य नसेल तर आधार नंबर व्हेरिफिकेशन करण्याची सुद्धा सोय ‘कोविन’ मध्ये करून देण्यात आली आहे.

४. एकदा तुमचं नाव रजिस्टर झालं की तुम्हाला लगेच कोरोना लसीकरण करायची तारीख मेसेजवर येणार आहे. त्यासोबतच तुम्हाला लसीकरण करण्यासाठीचे मेसेज पाठवण्यात येणार आहेत.

५. तुम्हाला मिळालेली लसीकरणाची तारीख योग्य नसल्यास तुम्ही ती तारीख लसीकरण केंद्रावर जाऊन बदलू शकता.

लसीकरणाची सुरुवात ही आरोग्य कर्मचारी असलेल्या लोकांपासून होणार आहे. त्यानंतर ५० पेक्षा अधिक वय असलेल्या लोकांना लस देण्यात येणार आहे. ह्या व्यक्तींना कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्यता सर्वात जास्त असते.

 

vaccine inmarathi

 

कोरोना लसीकरणाच्या प्रक्रियेत कोणतीही चूक होऊ नये म्हणून सतत प्रशिक्षण देणं सुरू आहे. सरकारी कर्मचारी असलेल्या व्यक्तींना हे प्रशिक्षण प्रत्यक्ष देण्यात येत आहे. त्यानंतर इतर राज्यातील लोकांना विडिओ कॉन्फरन्सद्वारे देण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे. कोरोना लस ही कोणत्याही व्यक्तीपर्यंत या सर्व प्रशिक्षण आणि रजिस्ट्रेशन नंतरच पोहोचवली जाणार आहे.

कोविनमध्ये रिपोर्ट सेक्शनमध्ये प्रत्येक दिवशी किती लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे याचा रिपोर्ट लगेच उपलब्ध असेल. या ॲपवरून कोल्ड स्टोरेज आणि मेन सर्वरला करंट डेटा पोहोचवला जाणार आहे जेणेकरून कुठेही लसीचा तुटवडा उपलब्ध होणार नाही.

 

covid vaccine inmarathi

 

‘कोविन’ हे ५ मेन सेक्शन्समध्ये विभागण्यात आलं आहे. रजिस्ट्रेशन, व्हॅक्सीनेशन, बेनिफिशरी आणि रिपोर्ट्स हे त्याचे मन हेडर्स म्हणता येतील. प्रत्येक सेक्शन्सवर स्ट्रॉंग बॅक अप टीम तैनात करण्यात आली आहे. आता प्रतीक्षा आहे ती अधिकृत लसीची घोषणा होवो आणि ही तयारी प्रत्यक्षात लोकांच्या सेवेसाठी उपलब्ध होवो याची!

‘कोविन’च्या नावाप्रमाणे आपण ही कोरोना वर लवकरच पूर्णपणे मात केलेली असेल. सर्व क्षेत्र एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हा अपेक्षित फायदा होणार हे नक्की. आपलं कर्तव्य समजून जास्तीत लोकांपर्यंत हा लेख पोहोचवून त्यांना ‘कोविन साक्षर’ करून कोरोना निर्मूलन कार्यात आपला सहभाग सुद्धा नोंदवूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?