'सावधान! ‘आधारकार्ड’ विचारून फसवणूक होऊ शकते! ती टाळून आधारचे फायदे वाचा

सावधान! ‘आधारकार्ड’ विचारून फसवणूक होऊ शकते! ती टाळून आधारचे फायदे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

प्रत्येक नागरिकांना एक वैश्विक ओळख असायला हवी या हेतूने आजपासून तब्बल १० वर्षे आणि ४ महिन्यांपूर्वी भारताने १२ आकडे असलेली आधारकार्ड व्यवस्था अंमलात आणली.

देशातील पहिले आधार कार्ड २९ सप्टेंबर २०१० रोजी नंदूरबारमधील एका नागरिकाला बहाल करण्यात आले. तेव्हापासून फेब्रुवारी २०२० पर्यंत भारतीय लोकसंख्येपैकी ९०% नागरिकांना आधार कार्ड प्रदान करण्यात आले आहे.

दरम्यान वेगवेगळ्या लाभांशिवाय आधारकार्डचा हॅकर्सही मोठ्या प्रमाणात वापर करत असल्याचे दुर्दैव चित्र दिसून येत आहे. त्यामुळेच आधारकार्ड धारकांनी अर्थात भारतीय नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.

प्रशासकीय कामांसाठी बँक, सरकारी कार्यालयांमार्फत कोणत्याही कारणांसाठी कधीही आधारकार्ड, तो जोडलेल्या बँक अकाऊंटची आणि त्यावर आलेल्या ओटीपीची (मोबाईलवर प्राप्त होणारा वन टाईम पासवर्ड) विचारणा केली जात नाही.

त्यामुळे अशा कोणत्याही टेलिफोनिक चौकशीला कोणी, कितीही विश्वासार्ह्यता दाखवून माहिती विचारली तरीही त्यावर विश्वास ठेवू नये.

 

aadhaar inmarathi 2

 

कारण अशापद्धतीने आधारकार्ड आणि त्याला जोडलेला बँक अकाऊंट आणि अगदी ओटीपी किंवा तत्सम कोणतीही माहिती विचारली तर अशा पद्धतीने हॅकर्स तुमच्या बँक अकाऊंटवर सायबर हल्ला करून तुमच्या बँकेतील रक्कम स्वत:च्या खात्यात वळवू शकतात.

ही हॅकर्स मंडळी सतत आपले रूप बदलत असतात. अगदी अलिकडेच कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी नोंदणीच्या बहाण्याने हॅकर्सचा तुम्हाला फोन येऊ शकतो.

मात्र, अशा कोणत्याही प्रलोभनास बळी न पडता अधिकृत व्यक्तींशिवाय आधार क्रमांक आणि ओटीपी किंवा तत्सम माहिती कोणत्याही त्रयस्थाला कोणत्याही परिस्थितीत शेअर करू नका.

आधार कार्ड अशाप्रकारे दुरुपयोग होऊ शकतो. पण आधार कार्डचे खालील चांगले फायदेही आहेत.

१) ओळख पत्र –

 

aadhaar inmarathi

 

आधार असल्यास आपण भारताचे नागरिक आहोत हे सिद्ध होतं. अमेरिकेचं जसं ग्रीन कार्ड तसंच आपलं आधार. आधार कार्डचा नंबर सरकारी यंत्रणेत फीड केलेला असतो, त्यामुळे कुठेही हा नंबर टाकला तर आपलं नागरिकत्व आणि इत्यंभूत माहिती लगेच कळते.

या आधी आपली ओळख पटण्यासाठी वोटर आयडी कार्ड, काही ठिकाणी रेशन कार्ड, काही ठिकाणी लाईट बिल आपल्याला दाखवावे लागत असे. पण आता आधार कार्ड दाखवले कि आपले काम होते.

 

२) सबसिडीज घेण्यास मदत –

 

subsidies inmarathi

 

सगळ्या सबसिडीज, स्कीम्स ह्या फक्त देशातील नागरिकांसाठी असतात. आणि आधारने सबसिडी आणि स्कीमचा योग्य उपयोग करून घेण्याची हि प्रक्रिया आता अत्यंत सोपी केली आहे.

आधार कार्ड आपल्या बँक अकाउंटशी लिंक असते. आणि जी योजना किंवा सबसिडी घ्यायची आहे तिथल्या खात्याशी सुद्धा आपले आधार कार्ड लिंक केले जाते.

ज्याने त्या सबसिडीजची रक्कम थेट आपल्या बँक खात्यात जमा होते. यामुळे पैसे मधल्या मध्ये गहाळ होण्याचा पण काही प्रश्न उरत नाही. एक पारदर्शकता येते.

 

३) बाळगण्यास सोपे असते –

 

e aadhar inmarathi

 

आधार कार्ड जवळ बाळगण्यास अत्यंत सोपे असते. कारण e-adhar हि सुविधा आपल्याला उपलब्ध करून देण्यात आली आहे. ह्या सोयीनुसार आपण आपल्या ऑनलाइन आधार साठी अर्ज केल्यावर आपल्याला सरकारच्या पोर्टल वर आपले e-adhar मिळते.

ज्यामुळे आपण कुठेही आणि कधीही आणि किती वेळाही हे आधार कार्ड डाउनलोड करून त्याचा त्वरित वापर करू शकतो. कार्ड घरी वगैरे विसरण्याची भानगड कायमची संपते.

सरकारी प्रक्रियांमध्ये आधार कार्ड चा उपयोग – 

 

१) पासपोर्ट –

 

passport inmarathi

 

पासपोर्ट काढणे हि एक गुंतागुंतीची आणि जरा लांबलचक प्रोसेस आहे. ह्यात संबंधित अधिकाऱ्यांची अपॉइंटमेंट घेऊन, पासपोर्ट साठी अर्ज करून, पासपोर्ट घरी डिलिव्हर होऊन, पोलीस व्हेरिफिकेशन वगैरे अशा भरपूर गोष्टी असतात.

ह्या सगळ्यांमध्ये भरपूर कागदपत्रे सुद्धा लागतात. पण आता आधार कार्ड सगळी कडे लिंक्ड असल्याने हि किचकट प्रक्रिया सुद्धा काही लरामानात भराभर होऊ लागली आहे.

आता ज्या व्यक्तीला पासपोर्ट काढायचा असेल त्याने फक्त आपले आधार कार्ड त्या अप्लिकेशन सोबत जोडले तर रेसिडेन्स प्रूफ आणि इतर कोणतेही ओळख पत्र जोडण्याची गरज नाही.

 

२) बँक खाते उघडणे –

 

bank accounts inmarathi

 

कोणतेही खाते उघडणे आधी फार किचकट होते. भरमसाठ कागदपत्रे, ओळखपत्र काय काय लागायचं. पण आधार ने सगळ्यांनाच आधार दिला असून ही प्रक्रिया पण सोपी केलेली आहे.

कोणतीही बँक आधार कार्डला एक उत्तम प्रूफ मानते. आधार असले की kyc, आणि पडताळणी कशासाठी अडथळा येत नाही, सगळी प्रक्रिया सोपी होते. त्यामुळे आजकाल कमीतकमी कागदपत्रे जोडून बँक खाते उघडता येणे, फक्त आधार कार्डामुळे शक्य झाले आहे.

 

३) डिजिटल हयातनामा –

पेन्शन धारकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली गेलेली हि एक उत्तम सोय आहे. ह्या स्कीम मुळे, वृद्ध पेन्शन धारकांना पेन्शन काढण्यावेळी बँकेत स्वतः हजार राहण्याची आता काहीही गरज नाही. फक्त आधार कार्ड दाखवले कि त्यांचे काम होते.

कारण आधार कार्ड हे सगळी कडे लिंक्ड असते पेन्शन वितरण खात्याला पेन्शन काढणाऱ्या व्यक्तीची सगळी माहिती एका क्लिक वर मिळते. त्यामुळे घरी बसून आता वृद्धांना पेन्शन काढता येणे शक्य झाले आहे.

४) जन धन योजना –

 

jan dhan yojana inmarathi

 

जन धन योजना मागासलेल्या विभागातील, खेडेगावातील व्यक्तींसाठी, जिथे कोणतीही बँक नाही, कागदपत्रे काढण्याची सोय नाही, त्यांच्यासाठी सुरु करण्यात आली आहे.

ह्या योजने अंतर्गत खाते उघडण्यासाठी फक्त आधार कार्ड हे एकमेव वॅलीड डॉक्युमेंट आहे.

५) प्रॉव्हिडंट फंड –

ज्या व्यक्तींचे आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी लिंक आहे त्यांना pf काढण्यासाठी दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही. आधारकार्डामुळे त्यांच्या खात्यातच pf ची रक्कम जमा केली जाते.

६) गॅस सबसिडी –

 

lpg subsidy inmarathi

 

आपल्या सगळ्यांना LPG सबसिडीचा फायदा करून घेणे फक्त आधारमुळे शक्य झाले आहे.

आपले आधार आपल्या गॅस कनेक्शनशी आणि बँक अकाउंटशी लिंक्ड असल्याने सरळ आपल्या खात्यात सबसिडीजचे पूर्ण पैसे जमा केले जातात. यामुळे ह्या सबसिडीजशी संबंधित सागळ्या प्रकारच्या भ्रष्टाचाराला आळा घालण्यात आला आहे.

आधार कार्डचे इतर उपयोग –

१) मोबाईल कनेक्शन –

 

mobile number inmarathi

 

मोबाईल फोनशी आपले बँक खाते जोडलेले असल्याने, आणि डिजिटल जग होत असल्याने वेगवेगळ्या फसवणुकीच्या घटनांमध्ये सुद्धा भर झालेली आहे.

म्हणूनच आपलं आधार आपल्या मोबाईलच्या सिम कार्डाशीसुद्धा जोडलेले जाते. जेणेकरून आपले व्यवहार सुरक्षित होतील आणि काही विपरीत घडल्यास गुन्हेगाराविरुद्ध कार्यवाही केली जाईल.

२) समानता –

आपल्या जात, धर्म आणि लैंगिक ओळखीला मागे टाकून आधार कार्ड समस्त भारतीयांना नागरिकत्व प्रदान करते. ह्यामुळे कोण मोठं कोण लहान, कोण श्रीमंत कोण गरीब हा भेदभाव उरत नाही.

३) ट्रेन, बस, हॉटेल बुकींग –

 

ticket booking inmarathi

 

ट्रेन तिकीट काढताना, हॉटेल मध्ये किंवा एखाद्या देवस्थानी भक्तनिवासात आपली रूम बुक करण्यासाठी आधार एक महत्त्वाचं ओळखपत्र म्हणून वापरलं जातं.

आधारवर जन्मतारीख, पत्ता, मोबाईल नंबर सगळंच असल्याने आधारलाच सगळी कडे प्राधान्य दिलं जातं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?