' हृदयरोग ते केसगळती यावर गुणकारी अशा शेंगदाण्याचे १० फायदे नक्की वाचा!

हृदयरोग ते केसगळती यावर गुणकारी अशा शेंगदाण्याचे १० फायदे नक्की वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

हिवाळ्याचा कहर आपण यावर्षी सगळेच अनुभवत आहोत. सर्वांना आवडणाऱ्या या ऋतूमध्ये आपण नेहमीच खाण्यासाठी आणि झोपण्यासाठी तयार असतो. पचन होण्यासाठी आणि भूक लागण्यासाठी सर्वोत्तम असणारा हिवाळा हा व्यायाम करण्यासाठी सुद्धा खूप फलदायी काळ आहे.

नवीन वर्ष सुरू झाल्यावर बऱ्याच जणांनी बरेच संकल्प केले असतील. हे सर्व संकल्प वर्षभर आमलात येत राहण्यासाठी त्यासोबत काही तरी अगदी आवडणाऱ्या गोष्टी सुद्धा करायला पाहिजेत.

आपल्या आवडीच्या गोष्टी सुद्धा आरोग्यदायी असतात हे आपल्याला माहीत नसतं. अश्याच एका सवयीबद्दल या लेखातून सांगत आहोत.

‘कोवळे शेंगदाणे खाणे’ हा एकेकाळी आपला आवडता छंद होता. रेल्वेच्या प्रवासात किंवा घरात गप्पा मारताना मध्यभागी एक शेंगांची पिशवी ठेवली जायची.

==

हे ही वाचा : कोलेस्ट्रॉल आणि हृदयरोग यापासून दूर राहण्यासाठी या १२ टिप्स नक्की वाचा!

==

peanuts inmarathi

 

ती पिशवी कधी रिकामी व्हायची हे आपल्याला कळायचं सुद्धा नाही. आपल्या हातात मोबाईल आल्यापासून हा प्रकार बराच कमी झाला आहे. पण, निदान हिवाळ्यात तरी हे शेंगदाणे खायला पाहिजे असे आहारतज्ञ सांगतात. त्यामागचे हे फायदे आहेत :

 

१. प्रथिने / प्रोटीन :

 

proteins inmarathi

 

शेंगदाणे खाल्ल्याने प्रोटीन चा पुरवठा आपल्या शरीराला होत असतो. १०० ग्रॅम शेंगदाणे हे आपल्याला २५.८ ग्रॅम प्रोटीन मिळवून देत असते. प्रथिने हे शरीरासाठी खूप उपयुक्त असतात.

हिवाळ्यात योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन केल्याने शरीराला प्रथिने मिळत असतात आणि शेंगदाणे हा सर्वात चांगला सोर्स आहे.

 

२. वजन कमी करण्यासाठी :

 

weight loss inmarathi

 

==

हे ही वाचा :  स्त्रियांनो, पन्नाशीनंतरही हाडे मजबूत राहण्यासाठी या ६ मार्गांनी घेता येईल काळजी…

==

शेंगदाणे खाल्ल्याने चरबी वाढते हे आपण ऐकून आहोत. पण, शेंगदाणे हे वजन कमी करण्यासाठी सुद्धा उपयुक्त आहेत हे कदाचित आपल्याला माहीत नसावं.

शेंगदाण्यामुळे तुमचं पोट भरलेलं असल्याची भावना येईल. त्यामुळे तुम्ही कमी खातात आणि त्यामुळे कॅलरी कमी वाढतात. शेंगदाण्यामधून फायबर चा सुद्धा पुरवठा होत असल्याने वजन कमी होण्यास मदत होत असते.

 

३. हृदयाची काळजी :

 

heart-attack-inmarathi

 

शेंगदाणे हे हृदयाची काळजी घेण्यास मदत करत असतात. शरीरात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी ठेवण्यास शेंगदाणे मदत करत असतात.

कोलेस्ट्रॉल योग्य प्रमाणात असल्याने हृदयविकार होण्याचा धोका कमी होत असतो. हृदयाची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने शेंगदाणे खाल्ले पाहिजेत असे तज्ञ सांगतात.

 

४. रक्तातील साखरेचं प्रमाण :

 

diabetes-inmarathi02

 

रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी शेंगदाणे आपल्या आहारात असावेत. शेंगदाण्यामध्ये ग्लिसमिकचं प्रमाण कमी असतं. ‘ग्लिसमिक इंडेक्स’ हा आपण खाल्लेल्या अन्नामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणात किती घट किंवा वाढ झाली आहे हे दर्शवत असतो.

ज्या व्यक्तींना डायबेटिस झाला आहे अश्या व्यक्तींनी सुद्धा योग्य प्रमाणात शेंगदाणे सेवन केल्यास त्यांना रक्तातील साखरेचं प्रमाण योग्य राखण्यास मदत होत असते.

 

५. जीवनसत्व आणि खनिजे :

 

peanuts 2 inmarathi

 

व्हिटॅमिन आणि मिनरल्स यांनी परिपूर्ण असलेले शेंगदाणे हे शरीराला पाचकद्रव्यांचा पुरवठा करतात आणि शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत करत असतात.

ओमेगा-३, ओमेगा-६, व्हिटॅमिन E, मॅग्नेशियम चं प्रमाण असल्याने फक्त शेंगदाण्यातून इटाक्या जीवनसत्वांचा एकत्रित पुरवठा होत असतो.

 

६. कॅन्सर ची शक्यता कमी होते :

 

cancer inmarathi

 

शेंगदाण्यामध्ये फिटोस्टेरोल चं प्रमाण असल्याने कॅन्सर ट्युमर ची वाढ थांबवली जाते. ट्युमर न वाढल्याने कॅन्सर सोबतचा लढा जिंकणं सहज शक्य होतं.

 

७. स्ट्रोकचा त्रास कमी होतो :

 

Asian woman in hot summer - heat stroke concept

 

अँटीऑक्सिडंट्स आणि मिनरल्सचं प्रमाण शेंगदाण्यामध्ये भरपूर असल्याने अचानक येणाऱ्या ब्रेन स्ट्रोक किंवा हृदयविकाराच्या झटक्यापासून सुटका मिळू शकते.

टिपटोफॅन चं प्रमाण हे शेंगदाण्यात असल्याने आपलं मानसिक स्वास्थ्य सुद्धा चांगलं राहू शकतं. एक मूठ शेंगदाणे जरी रोज खाल्ले तरीही त्याचे फायदे आपल्याला मिळत असतात.

==

हे ही वाचा :  प्रमाणाबाहेर बदाम खाल्लेत तर होऊ शकतात गंभीर आजार 

==

८. फॉलीक ऍसिड :

 

pregnancy-inmarathi

 

गरोदर स्त्रियांना ज्या फॉलीक ऍसिडच्या गोळ्या नियमित घ्याव्या लागतात त्याचं भरपूर प्रमाण हे शेंगदाण्यात असतं. गरोदर स्त्रियांनी शेंगदाणे खाण्याचं प्रमाण हे होणाऱ्या बाळाच्या तंदुरुस्त तब्येतीसाठी वाढवलं पाहिजे.

 

९. केस दाट येण्यासाठी उपयुक्त :

 

healthy-hair-inmarathi

 

शेंगदाणे हे केसांसाठी औषध म्हणून सांगितलं जातं. हिवाळ्यात होणाऱ्या केसगळती, केसांची वाढ न होणे अश्या समस्यांसाठी शेंगदाणे उपयुक्त मानले जातात.

१०. त्वचेची काळजी :

 

dry skin inmarathi

 

आपल्या सर्वांच्या आवडीचा विषय. शेंगदाणे योग्य प्रमाणात सेवन केल्याने चेहऱ्याची त्वचा ही तजेलदार होत असते. रिसवेट्रोलचं प्रमाण शेंगदाण्यात असल्याने त्वचा पाणीदार राहण्यास मदत होत असते.

शेंगदाणे सेवन केल्याने आपण अधिक सुंदर दिसणार असल्यास आपण हा शेंगदाणे चा उपयोग सर्वांनीच करायला पाहिजे.

शेंगदाण्यामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण वाढत असल्याने आणि त्यामुळे प्रत्येकाच्या प्रकृती नुसार वजन वाढू शकतं. ही बाब प्रत्येकाने लक्षात घ्यायला हवी आणि त्यानुसार योग्य प्रमाणात शेंगदाणे खायला पाहिजे.

शेंगदाणे हे पित्तकारक असतात तसेच शेंगदाण्याची बऱ्याच लोकांना अलर्जी असते त्यामुळे ज्यांना अशा समस्या आहेत त्यांनी शक्यतो शेंगदाण्याचे सेवन योग्य प्रमाणातच करावे!

इतके फायदे असणारे शेंगदाणे रोज योग्य प्रमाणात खाण्याची सवय आपण सुद्धा लावली पाहिजे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?