'सर्वांसाठी सुरु आहे वर्ष २०२१, पण या देशात अजूनही आहे २०१४, असे का, वाचा!

सर्वांसाठी सुरु आहे वर्ष २०२१, पण या देशात अजूनही आहे २०१४, असे का, वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

३१ डिसेंबर हा दिवस ज्या थाटात संपूर्ण जगात साजरा केला जातो. तोच दिवस म्हणजे या देशासाठी इतर किरकोळ दिवसाप्रमाणे असतो. या देशात ३१ डिसेंबर असो किंवा १ जानेवारी कसलंच सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळणार नाही!

असं का बरं असावं? ज्या नवीन वर्षाचे स्वागत जगभरात वाजत गाजत केले जाते त्याच नवीन वर्षाचं या देशाला काहीच सोयर सूतक नसतं.

हा देश नेमका आहे तरी कोणता आणि असं करण्यामागची नेमकी कारणं तरी काय हे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत!

नवीन वर्षाचं स्वागत आपण सर्वांनी जल्लोषात केलं. जागोजागी केलेली रोषणाई, लोकांचा उत्साह आणि कोरोनाचा ओसरत चाललेला प्रभाव यामुळे एका आनंददायी वर्षाची सुरुवात होत आहे असं वाटतंय.

इंग्रजी दिनदर्शिका वापरणारे आपण नवीन वर्षाची सुरुवात आपण तेव्हाच साजरी करणार हे नक्की. मराठी नववर्षाची आठवण करून देणारे बरेच संदेश यावर्षी फॉरवर्ड केले जात होते.

३१ डिसेंबर या तारखेची प्रत्येक जण खूप आतुररतेने वाट बघत असतो. २१ व्या शतकातील या एकविसाव्या वर्षात पदार्पण करतांना प्रत्येक जण हा २०२० ने दिलेली आत्मनिर्भर होण्याची शिकवण लक्षात ठेवणार हे नक्की.

 

new year celebration inmarathi

 

‘असे वर्ष पुन्हा येऊ नये’ हे काही दिवसांपासून एकसुरात सगळे जण म्हणत आहेत. ज्या २०२० ने आपल्या प्रत्येकाला इतका त्रास दिला ते एका देशात अजून पोहोचलेलंच नाहीये हे आपल्याला माहीत आहे का? हे कसं शक्य आहे?

इथीयोपिया हा आफ्रिकेतील जगावेगळा देश आपल्यापेक्षा ७ वर्ष ३ महिने मागे आहे. हे त्या मागचं कारण आहे. आज तिथली तारीख २६/४/२०१३ ही आहे. आपण गुगल करून चेक करू शकता.

आफ्रिकेच्या दुसऱ्या सर्वात जास्त लोकसंख्या (८५ लाख) असलेला हा देश त्यांचं नववर्ष ११ सप्टेंबर या दिवशी साजरा करत असतो. इथीयोपिया हा देश याबाबतीत जगावेगळा आहे.

इतकंच नाही तर तारखेतील या बदलामुळे इथीयोपियाचे लोक प्रत्येक सण आपल्या पेक्षा वेगळ्या तारखेला साजरा करत असतात.

इथीयोपिया बद्दल अजून एक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या देशाची दिनदर्शिका ही १२ महिन्यांच्या ऐवजी १३ महिन्यांची आहे. प्रत्येक महिना हा ३० दिवसांचा असतो. इथे लीप इयर वगैरे काही नसतं.

 

ethiopia inmarathi

 

३६५ किंवा ३६६ दिवसांच्या वर्षातील शेवटचे ५-६ दिवस हे इथीयोपिया मधील लोक हे शेवटच्या महिन्यात मोजत असतात. या शेवटच्या महिन्याला पाग्यूमे असं नाव देण्यात आलं आहे.

हे ६-७ दिवस त्या दिवसांच्या आठवणीत काढले जातात जे की दिवस कोणत्या न कोणत्या कारणाने मोजणीत आले नाहीयेत.

इथीयोपिया हा ७ वर्ष आणि ३ महिन्यानी मागे असल्याने तारखेच्या या घोळाचा त्रास पर्यटकांना होऊ नये हे प्रशासनाचं धोरण आहे. पण, हॉटेल बुकिंग करताना, तारीख आणि वार निवडताना या देशात आल्यावर बऱ्याच समस्यांना तोंड द्यावंच लागतं.

इथीयोपिया मध्ये हा बदल का?

कॅलेंडर चे दोन प्रकार आहेत. आधी होतं ते ज्युलियन कॅलेंडर आणि नंतर आलं ते ग्रेगोरीयन कॅलेंडर.

आपण सध्या जे कॅलेंडर वापरतो ते ग्रेगोरीयन कॅलेंडर आहे. पोप ग्रेगरी १२ वे यांनी जगाला ग्रेगोरीयन कॅलेंडर बनवून दिलं आहे. हे कॅलेंडर १५८२ पासून आमलात आणलं गेलं. काही देशांनी या नवीन कॅलेंडरचा विरोध केला होता.

 

gregorian calender inmarathi

 

कॅथलिक चर्चला मानणाऱ्या लोकांनी नव्या कॅलेंडरला मान्यता दिली होती. इथीयोपिया ने या नवीन कॅलेंडरला कडाडून विरोध केला होता. ग्रीस या देशाने सुद्धा या ग्रेगोरीयन कॅलेंडरला १९२३ मध्ये मान्यता दिली होती.

ज्युलियन कॅलेंडर मध्ये दुरुस्ती केलेल्या या कॅलेंडरला आता बहुतांश देशाने मान्य केलं आहे. अपवाद आहे तो इथीयोपिया सारखा देश.

इथीयोपिया मध्ये सुरुवातीपासून रोमन चर्च चा प्रभाव राहिलेला आहे. इथीयोपिया मधील लोकांचं हे मानणं आहे की, इसा मसी चा जन्म हा चौथ्या ते सहाव्या शतकाच्या मध्ये (BC) झाला होता. तेव्हापासूनच ज्युलियन कॅलेंडर ची सुरुवात झाली असं सांगण्यात येतं.

डायनिसियस एक्सिगस या संताच्या लिखाणानुसार इसा मसीहचा जन्म AD1 या वर्षात झाला होता.जे की बहुतांश देशाने मान्य केलं आहे.

इथीयोपिया मात्र आजही ज्युलियन कॅलेंडर वापरते जे की ग्रेगोरीयन कॅलेंडर पेक्षा ७-८ वर्षांनी मागे आहे. कारण, त्यांच्या मते, इसा मसीचा जन्म ७ वर्ष आधीच झाला होता.

 

isa masiah inmarathi

 

या दोन मतप्रवाहमुळे इथीयोपिया हा देश जगापेक्षा ७ वर्ष मागे राहिला आहे. धार्मिक मान्यता इतका मोठा बदल करू शकतात याचं हे एकमेव उदाहरण असावं.

इथीयोपिया हा देश भौगोलिक दृष्ट्या सुंदर आहे. युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज मध्ये सामील केलेल्या जागांपैकी सर्वात जास्त जागा या इथीयोपिया मधील आहेत. जगातील सर्वात उंच आणि लांब गुफा ही इथीयोपिया मध्ये आहे.

नैसर्गिक सौन्दर्याने समृद्ध असलेला इथीयोपिया हा देश जगातील सर्वात उष्ण देश म्हणून सुद्धा गणला जातो. जगभरातील पर्यटक हे इथीयोपियाला आवर्जून भेट देत असतात.

 

ethiopia heritage inmarathi

 

दरवर्षी ११ सप्टेंबर हा नववर्षदिन सुद्धा इथे खूप उत्साहात साजरा केला जातो. या दिवसाला ‘एंकूतातश’ या नावाने त्या देशात संबोधलं जातं. हा सोहळा पाहण्यासाठी सुद्धा कित्येक पर्यटक या दरम्यान इथीयोपिया ला भेट देत असतात.

जग बदललं पण इथियोपिया बदललं नाही हे अगदी खरं. जेव्हा पूर्ण जग २५ डिसेंबरला ख्रिसमस साजरं करत असतं तेव्हा इथीयोपिया मध्ये ७ जानेवारी ही तारीख असते. दोन्ही प्रकारचे कॅलेंडर हे सूर्याच्या स्थितीवरून बनवले गेले आहेत.

तरीही हा फरक आहे आणि हा फरकच इथियोपिया ला एक युनिक देश म्हणून जगासमोर ठेवतो.

 

etheopian inmarathi

 

पर्यटन वाढवण्यासाठी असं बोललं जातं की, “ज्या लोकांना नववर्ष आणि ख्रिसमस दोन वेळेस साजरा करायची इच्छा असेल” ते सप्टेंबर २०२१ मध्ये इथीयोपियाला भेट देऊ शकतात आणि पुन्हा एकदा धमाल करू शकतात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?