' कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये उद्भवलेल्या दुष्परिणामांची माहिती करून घ्या, सतर्क रहा! – InMarathi

कोरोना लसीच्या ट्रायलमध्ये उद्भवलेल्या दुष्परिणामांची माहिती करून घ्या, सतर्क रहा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना, सगळ्यात जास्त धुमाकूळ घालून जगातील खूप लोकांना प्राणांची आहुती द्यायला लावणारा हा भयानक आजार. जगाच्या इतिहासात अतिशय भयंकर असलेली महामारी असंच या आजाराचं वर्णन करावं लागेल.

थंडी वाजून ताप येणं, तोंडाची चव जाणं, डोकेदुखी होता होता आॅक्सिजन लेव्हल कमी होणं असं होत बरेच लोक मृत्युमुखी पडले. दवाखाने पुरेनासे झाले. व्हेंटिलेटर मिळणे कठीण झाले.

 

corona test inmarathi

 

खूप लोकं कोरोनाच्या धसक्याने मृत्युमुखी पडले. वाईट अवस्था ही होती, की आपल्या माणसाचं शेवटचं दर्शनही आप्तांना घडलं नव्हतं. आपल्या हिंदू धर्मात प्रेतावर जे धार्मिक विधी, संस्कार करुन त्याचं दहन केलं जातं तेही अशक्य झाले या परिस्थितीत.

पहिली लाट, दुसरी लाट, यावर उपाय म्हणून लाॅक डाऊन सुरू केला. सगळीकडे संचारबंदी..सगळं सगळं बंद. आयुष्य ठप्प.. मानवी इतिहासात सन २०२० हे महाभयंकर संकट घेऊन आलेलं वर्ष अशीच नोंद होईल.

यात सगळ्यात वाईट गोष्ट होती या कोरोनावर कसलीही लस, औषधं उपलब्ध नाहीत. त्यावर लस तयार करण्यासाठी शास्त्रज्ञांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे.

त्यावरच्या चाचण्या चालू आहेत. ब्रिटनमध्ये तर लस आली, पण अजून आपण मात्र मागं आहोत. आपल्याकडेही लस तयार करून ती लवकरच जनतेला उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

 

covid vaccine 2 inmarathi

 

पण या लसीचे काही दुष्परिणामही आहेत! लस तयार करणं हे सोपं काम नाही. प्रत्येक माणसाचं शरीर वेगळं, त्यांच्या सिस्टीम वेगळ्या. एखादी गोष्ट एखाद्या माणसाला पचते पण तीच दुसरा माणूस पचवू शकतो असं नाही.

तिसऱ्या माणसाला पचायला वेळ लागेल. चौथ्या माणसाला अॅलर्जी होईल..असा सर्व शक्यतांचा खेळ असतो. खरं सांगायचं तर असा एखादा आजार ज्याची काहीही माहिती नाही त्यावर औषधोपचार करणं हे भयंकर अवघड आहे.

आंधळं युद्ध म्हणा. चहुबाजूंनी मारा होत असताना अंदाजाने हत्यारं फेकायची. स्वतःचा बचाव करायचा. दरवेळी संत महंत काही देवळात प्रवचन कीर्तन करणारेच हवेत असं नाही.

अशा गंभीर परिस्थिती मध्ये ते डाॅक्टर, पोलिस, नर्सेस यांच्या वेषात पण असतातच. तसेच लस तयार करणारे आणि त्याचं परिक्षण करण्यासाठी जीवावर उदार होणारे लोकही याच ओळीतले.

 

covid warriors inmarathi 2

 

हा लेख तुमच्यापर्यंत येईल तोवर कदाचित ब्रिटन, अमेरिका येथे लसीकरण मोहीम सुरू झालेली असेल. फायझर या जगप्रसिद्ध औषध कंपनीने प्रचंड प्रयत्न करुन लस तयार केली आहे.

३७५८० लोकांवर त्याची चाचणीही करण्यात आली आहे. पण त्याचे काही दुष्परिणामही आहेत काय आहेत हे दुष्परिणाम?

१. बहुतेक लोकांना लस घेताच त्याची रिअॅक्शन झाली होती.

२. काहीजणांना थकवा, डोकेदुखी, अंगदुखी असेही त्रास उद्भवले.

पण महत्त्वाचे म्हणजे ही लस कोविडच्या विरोधात ९५% यशस्वी ठरली आहे. सुरक्षित आणि यशस्वी लसीकरण असंच म्हणायला हरकत नाही.

३. वेदना –

फायझर या कंपनीने लस बनवल्यानंतर दोन टप्प्यांत तिची चाचणी घेतली तर खूप जणांना लस टोचताच आजूबाजूला खूप वेदना झाल्या होत्या.

 

fizer inmarathi

 

या औषधाची चाचणी ३७५८६ लोकांवर केली होती. १८हजार लोकांना लस दिली तर १८ हजार लोकांना प्लेसबो दिलं. म्हणजे औषध दिलं पण ते औषध नाही.

लस घेतल्यानंतर काहीजणांना इंजेक्शन घेतलेल्या जागेवर पुरळ उठणं, थोडीशी सूज येणं, इंजेक्शन घेतलेली जागा थोडी कडक होणं अशी लक्षणं दिसली. ८०% लोकांना ही लक्षणं जाणवली.

४. थकवा –

इंजेक्शन घेतल्यानंतर काही जणांना थकल्यासारखे वाटू लागले. डोकेदुखी अंगदुखी असेही अनुभव लोकांना आले. खूपच कमी लोकांना सांधे दुखणं, ताप येणं असेही लसीकरण केल्यानंतर आलेले परिणाम.

पहिला डोस दुसरा डोस यांच्या दरम्यानच्या काळात काही जणांना हे जाणवलेले परिणाम. पण यापुढे फार मोठे दुष्परिणाम मात्र झालेले दिसले नाहीत.

लसीकरणानंतर पक्षाघाताचा झटका आला अशी उदाहरणं दुर्मिळ आहेत. गंभीर अॅलर्जी झालेलं ही कुणी आढळलं नाही. लस घेतली नी फीट आली अशी घटना तर नाहीच झाली. जे काही किरकोळ साईड इफेक्ट जाणवले ते तर साधारण सगळीकडे होतातच.

थोडक्यात सांगायचं तर आपण बाळाला बीसीजी, वगैरे लस जन्मल्यावर, दिड महिन्यात देतो तेव्हा बाळाला एखादा दिवस ताप येतो. इंजेक्शन दिलेली जागा खूप दुखते.

बाळ खूप रडतं. मांडीत ते इंजेक्शन देतात, पाय हलवताना त्याला दुखत असतं. पण नंतर‌ त्याचा त्रास कमी होतो. दुसऱ्या दिवशी बाळ अगदी मजेत हातपाय हलवत खेळत राहतं.

 

vaccine to kid inmarathi

 

ही लस घेतली की हे साईड इफेक्ट म्हणजे थकवा येणं, डोकेदुखी अंगदुखी ही फार गंभीर लक्षणं नाहीत असं फायझरचे प्रवक्ते सांगतात.

आणि औषधं, डॉक्टर हे जगाला सेवावृत्तीचे मिळालेले वरदान आहे. कोणत्याही डाॅक्टरना, औषधं बनवणाऱ्या कंपनीला आपण औषध द्यावं आणि रुग्ण मरावा असं वाटत नसतं.

तसं असतं तर कोविडच्या भयंकर दिवसांत डाॅक्टर नर्सेस जीवावर उदार होऊन सतत सेवा देत राहीले नसते‌. कितीतरी डाॅक्टर कोविडचा बळी ठरले. तरीही इतर डॉक्टरांनी रुग्णसेवा सोडली नाही.

मानवी जीवन धोक्यात आलेलं पाहून शास्त्रज्ञ औषध शोधायला झुंजले नसते.

लस घेतल्यार जर काही किरकोळ गोष्टी वाटल्या तर आपले डाॅक्टर असतातच. तेव्हा न घाबरता लस घ्यायला हरकत नाही.. नाही का? कारण शेवटी जान है तो जहान है!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?