' शनिवारची बोधकथा : जाणून घ्या, संकटांकडे बघण्याचा साधा, पण वेगळा दृष्टिकोन

शनिवारची बोधकथा : जाणून घ्या, संकटांकडे बघण्याचा साधा, पण वेगळा दृष्टिकोन

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आटपाट नगराचा एक राजा होता. राजा प्रजाहितदक्ष आणि अतिशय समंजस स्वभावाचा होता. आपल्या राज्यातील लोकांना कोणतीही गोष्ट कधीच कमी पडू नये यासाठी तो कायम प्रयत्नशील असायचा.

त्याच्या स्वभावामुळे प्रजेमध्येही तो लोकप्रिय होता. प्रजेच्या सुखातच तो स्वतःचे सुख शोधायचा. आपल्या राज्यात कोणीच दुःखी असू नये याकडे त्याचं कायम लक्ष असायचं.

राजाचा एक विशेष गुण म्हणजे राज्यातील लोकांचा बौद्धिक विकास व्हावा यासाठी तो अनेक कोडी, गणितीय सूत्र टाकायचा आणि जो कोणी ते सूत्र सोडवेल त्याला भरघोस बक्षिस द्यायचा.

एकदा राजाने एक खूप मोठा महाल बांधला. भव्य दिव्य असा तो महाल बाहेरून बघूनच प्रजेला आनंद झाला होता. तो महाल बघण्यासाठी दूरवरून लोक येत असत, पण गंमत अशी की राजाने तो महाल बंदच ठेवला होता.

 

door inmarathi1

 

त्या महालाच्या प्रवेशद्वारावर एक गणिती कोडे लिहिले होते. जो कोणी ते कोडे सोडवेल त्याला राजाने १०० सुवर्ण मुद्रांचे पारितोषिक ठेवले होते. राजा निपुत्रीक असल्याने जो कोणी हे गणिती कोडे सोडवेल त्याला तो स्वतःचा उत्तराधिकारी घोषित करणार होता. शिवाय याच गणिती कोड्याने प्रवेशद्वार उघडेल असेही त्याने सांगितले होते.

बक्षिसाच्या इच्छेने हजारो विद्वान तिथे आले.. तासनतास चर्चा करून, मोठे ग्रंथ वाचून देखील त्यांना ते कोडे सोडवता आले नाही. राजाने दिलेली मुदत देखील आता संपत आली होती.

शेवटच्या दिवशी २ विद्वान आणि गावातील एक गरीब शेतकरी तिथे आले. सगळ्यांनी त्या शेतकऱ्याची खूप थट्टा उडवली. मोठमोठ्या विद्वानांना कोडे उलगडले नाही तिथे हा शेतकरी काय करणार आहे असा प्रश्न त्यांना पडला.

दोन तास विचार करूनही त्या विद्वानांना कोडे सोडवता आले नाही. ते तसेच माघारी परतले. शेवटी शेतकऱ्याची पाळी आली. त्याने क्षणभर विचार केला आणि दरवाज्याला त्याने फक्त ढकलताच तो उघडला.

 

door inmarathi

 

सर्वांना फार आश्चर्य वाटले. या शेतकऱ्याने कोणता विचार करून कोडे सोडवले असा प्रश्न सगळ्यांना पडला.

त्यावर शेतकरी म्हणाला, “मी एक सामान्य माणूस. मला कुठलं येतंय गणित वगैरे. मी आपला दरवाज्याकडे नीट पाहिलं. तिथे कोणतीच कडी किंवा कुलूप नव्हतं, म्हणून मी फक्त दरवाजा ढकलला आणि उघडला”

त्याला शाबासकी देत राजा म्हणाला, “मला हेच तर हवं होतं. मी मुळातच टाकलेलं कोडं चुकीचं होतं, त्यामुळे त्याचं उत्तर कधीच मिळणार नव्हतं. आपण अनेकदा अस्तित्वातच नसलेल्या समस्यांचा एवढा विचार करतो, की त्या सोडवण्यासाठी काहीतरी कठीण मार्गच असणार अशी आपली मानसिकता असते”

मित्रांनो, आपणही अनेकदा असंच करतो ना? पुढे काहीतरी मोठी समस्या असेल याचा विचार करण्यातच इतके मग्न होतो, की नसलेल्या समस्यांचा डोंगर उभा राहतो.

मुळातच आयुष्य खूप सोपं आहे आणि ते आपण आनंदाने जगलो तर अजून सोपं होतं. दुःख, संकटं ही प्रत्येकाच्याच वाट्याला येतात, परंतु त्यांचा बाऊ करायचा की, साधा सोप्पा विचार करून ते सोडवायचं हे आपल्या हातात आहे, हो ना?

आजची शेतकऱ्याची गोष्ट आपल्याला हाच संदेश देते. संकटांना आधीपासूनच भिण्यापेक्षा.. कायम कठीण मार्गांचा वापर करण्यापेक्षा सोप्या आणि साध्या मार्गाचा विचार करून बघा. उत्तरं आपल्यासमोरच असतात, पण आपणच अतिविचाराने त्यांना दूर ठेवतो.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?