' महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळ्याला जाऊन कंटाळलात? मग या ठिकाणांना भेट द्या!

महाबळेश्वर, लोणावळा, खंडाळ्याला जाऊन कंटाळलात? मग या ठिकाणांना भेट द्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

राकट देशा, कणखर देशा, दगडाच्या देशा,
प्रणाम माझा घ्यावा हे श्री महाराष्ट्र देशा.
भीमा, वरदा, कृष्ण, कोयना, भद्रा, गोदावरी,
एक पणाचे भरती पाणी मातीच्या घागरी…
ही भूमी सप्त सुरांची रंगांची अष्टकालांची, काव्याची शास्त्रविनोदाची हि भूमी साहित्याची.

अशा या थोर महाराष्ट्र भूमीला संपन्नतेचा, कलाकुसरीचा आणि शूरवीरांच्या बलिदानाचा दैदीप्यमान वारसा लाभलेला आहे. भारताच्या आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईच्या मॉडर्न स्वरूपापासून, गाव खेड्यांतील डोंगर दऱ्यांमध्ये वसलेलं साधंसं आणि पारंपरिक स्वरूपाचं जीवन महाराष्ट्रात आहे.

नैसर्गिक संपन्नतेने नटलेले डोंगर, दऱ्या, वेगवेगळ्या प्रकारचे वन्य जीव, गड किल्ले, सुट्ट्यांचा आनंद लुटण्यासाठीचे हिलस्टेशन्स, पुरातन अजिंठा एलोरा लेण्या, छोटं काशी म्हणजे नाशिक, सगळ्यात जास्त पाऊस पडणारं माथेरान या सगळ्यांसाठी सुद्धा महाराष्ट्र प्रसिद्ध आहे.

लोक दुरून दुरून नागपूरची संत्री, कोकणातील काजू आणि आंबा, बुलढणा जिल्ह्यात असलेल्या खामगावची चांदी खरेदी करण्यासाठी, तीर्थक्षेत्रांना भेटी देण्यासाठी, सुट्ट्यांचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्रात येत असतात.

टुरिझम इंडस्ट्री सुद्धा महाराष्ट्राच्या अर्थार्जनाच्या साधनांपैकी एक महत्त्वाचा भाग आहे, पण लोणावळा, खंडाळा, मुंबई, कोकण, याव्यतिरिक्त सुद्धा महाराष्ट्रात काही ठिकाणं बघण्यासारखी आहेत.

थंडीत भेट देण्यासाठी उत्तम असलेली महाराष्ट्रातील काही अप्रतिम ठिकाणं –

 

१) सापुतारा –

 

saputara inmarathi

 

सापुतारा म्हणजे सापांचं राज्य. पुरातन काळातील हे सापांचं राज्य असल्याची मान्यता आहे. महाराष्ट्र आणि गुजरातच्या सीमेवर स्थित हे एक सुंदर हिलस्टेशन आहे.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

मुंबईपासून ४ तासांच्या अंतरावर असलेल्या सापुताऱ्यात करण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. पूर्णा अभयारण्य, सनसेट पॉईंट, नागेश्वर महादेव मंदिर, हातगड किल्ला, सापुतारा संग्रहालय इतके सगळे स्पॉट्स तुम्ही स्पुताऱ्यात बघू शकता. इथे महाराष्ट्रीयन पाककृतीं व्यतिरिक्त गुजराती पदार्थांचा सुद्धा आस्वाद लुटू शकता. खवैयांसाठी हे ठिकाण म्हणजे चंगळच.

सापुताऱ्यापासून पुढे वणीचा सप्तशृंगी गडही काही फार लांब नाही. फक्त १-१:३० तासांच्या अंतरावर असलेल्या सप्तशृंगी मातेचं दर्शनही तुम्ही घेऊ शकता.

 

२) भंडारदरा –

 

bhandardara inmarathi

 

सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं भंडारदरा हे मुंबई पासून ३.५ तासांच्या अंतरावर आहे. अम्बरेला फॉल्स, कळसुबाई शिखर, वील्सन धरण, अगस्त्य ऋषी आश्रम, रतनगड किल्ला, अमृतेश्वर मंदिर इतकी ऐतिहासिक ठिकाणं भंडारदऱ्यात आहेत.

ही सगळी ठिकाणं आपल्या खिशाला परवडणारी सुद्धा आहेत. त्यामुळे कसलीही चिंतान करता एकदा भंडारदऱ्याला नक्की भेट द्या.

३) चिखलदरा –

 

chikhaldara inmarathi

 

चिखलदऱ्याचा उल्लेख महाभारतात आढळतो. या ठिकाणचं नाव आधी किचकदरा होतं. असं म्हणतात, की अज्ञातवासात असताना पांडव हे चिखलदाऱ्याच्या विराट राजाकडे सेवेत होते. त्यांचा सेनापती किचक हा अत्यंत क्रूर होता. याच किचकाचा वध करून भीमाने इथल्या एका झऱ्यात हात धुतले होते.

नागपूरपासून ५ तासांच्या अंतरावर असलेले हे हिलस्टेशन ब्रिटिश आर्किटेक्चरसाठी, महाराष्ट्रातील एकमेव कॉफी प्लान्टेशन आणि तिथे असलेल्या इको पॉईंट मुळे ओळखले जाते.

चिखलदाऱ्यात सनसेट पॉईंट, देवी पॉईंट, गाविलगड किल्ला, स्ट्रॉबेरी प्लान्टेशन याहूनही अधिक नयनरम्य ठिकाणं आहेत. त्यामुळे विदर्भातील या हिलस्टेशनला नक्की भेट द्या.

 

४) ताम्हिणी घाट –

 

 

tamhini inmarathi

 

पुणे आणि कोकणाला जोडणारा हा घाट मोटार बाईक वरून फेर फटका मारणाऱ्या प्रवाश्यांसाठी अत्यंत महत्वाचा समजला जातो.

टाटा पावर हाऊस, कालिका मंदिर, शांत असलेला मुळशी तलाव, काळूबाई मंदिर अशी अनेक सुरेख ठिकाणं आहेत. बाईक असेल तर या घाटावरून प्रवास करण्याची मज्जा आणि थ्रिल काही औरच असतं.

 

५) ड्युक्स नोज –

लोणावळा आणि खंडाळ्याच्या अत्यंत जवळ असलेलं हे ठिकाण वेलिंग्टनच्या ड्युकच्या नाकाप्रमाणे भासत असे, म्हणून याचं नाव ड्युक्स नोज पडलं. याला नागफणी सुद्धा म्हटले जाते.

हे ठिकाण दाट धुक्यासाठी आणि आणि गिर्यारोहणासाठी प्रसिद्ध आहे. आज कूछ तुफानी करण्याची इच्छा असेल तर ड्युक्स नोजला नक्की भेट दिलीच पाहिजे.

इथल्या ट्रेकचा बेसिक खर्च मात्र १६०० रुपये इथून सुरु होतो. त्यामुळे लगेच बॅग भरो आणि निकल पडो.

 

६) कार्ले लेणी –

 

carle caves inmarathi

 

कार्ले लेणी हा १६ बौद्ध लेण्यांचा गट असून त्यातील एक चैत्यगृह व इतर विहार आहेत. ही लेणी प्राचीन काळी ‘वलुरक’ नावाने ओळखली जात असे.

बुद्धांच्या जीवनावर आधारलेल्या या दगडी गुंफा पुणे जिल्ह्यात मळवलीपासून (लोणावळा) ४-५ कि.मी. अंतरावर आहे. पर्वतात कोरलेल्या या लेण्या अत्यंत सुंदर व मनाला मोहित करणाऱ्या आहेत. शांत, प्रसन्न आणि शुद्ध वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी इथे नक्की भेट द्या.

 

७) भाजे लेणी –

 

bhanje inmarathi

इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात याचे निर्माण कार्य सुरू झाल्याचे मानले जाते. भाजे लेणी पुणे जिल्ह्यात मळवली (लोणावळा) गावानजीकच्या भाजे गावाजवळील डोंगरातील प्राचीन बौद्ध लेणी आहेत. येथील चैत्यगृह महत्त्वपूर्ण आहे. बाजूला भिक्खूंना राहण्यांसाठी खोल्या आहेत.

मनःशांती च्या शोधात असणाऱ्यांनी इथे नक्की जाऊन बघावं. इथले दगडांवर साकारलेली शिल्प आणि कोरीव कलाकृती बघण्यासारख्या आहेत.

 

८) तारकर्ली –

 

Tarkarli Beach InMarathi

 

मालवण जिल्ह्यातील तारकर्ली हे छोटंसं गाव महाराष्ट्राचं मॉरिशियास म्हणून सुद्धा ओळखल्या जातं. हे नाव तिथे असलेल्या स्वच्छ, सुंदर निळ्याशार समुद्र किनाऱ्यामुळे पडलंय.

मांसाहार प्रेमींसाठी तर तारकर्ली म्हणजे स्वर्गच. स्पेशल मालवणी बांगडा फ्राय, मटण मालवणी, कोंबडी वडा या तारकर्लीच्या स्पेशल डिश आहेत.

समुद्रावरील विविध स्पोर्टस् रोमांच आणि थ्रिलच्या मागे असलेल्या पर्यटकांना भुरळच घालतात. त्यामुळे फार वेळ दवडू नका आणि लगेच तारकर्लीला भेट देण्याची योजना आखायला घ्या.

वरील नमूद केलेल्या प्रत्येक ठिकाणी राहण्या खाण्याची योग्य सोय आहे. स्वच्छता, पर्यावरणपूरक योजना राबविणे, आदरातिथ्य या सगळ्यांची काळजी इथे उत्तम घेतली जाते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?