' कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी "शेर शाह" कोण होता?

कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी “शेर शाह” कोण होता?

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

कारगिल युद्धाच्या विजयाच्या शिल्पकारांपैकी एक कॅप्टन विक्रम बत्रा हे भारतीय सैन्यामधील अत्यंत शूर सैनिक होते. त्यांचा जन्म ९ सप्टेंबर १९७४ रोजी हिमाचल प्रदेशच्या पालमपूर येथे झाला.

 

vikram-batra-marathipizza

१९९९ साली जेव्हा कारगिल युद्धाच्या वेळी पाकिस्तानने भारताच्या भूमीवर कब्जा केला होता, तेव्हा त्यावेळी लेफ्टनंट असलेल्या विक्रम बत्रा ह्यांना १९ जून १९९९ रोजी (कारगिल युद्ध सुरु झाल्यानंतर ५ आठवड्यांनी ) शिखर ५१४० वर परत ताबा मिळवण्याची ऑर्डर मिळाली होती.

शिखर ५१४० च्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याचा कॅम्प होता ज्यात अनेक सैनिक त्या शिखराच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानने ठेवले होते.

अनेक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत बत्रा आणि त्यांचे साथीदार शिखरावर सही सलामत पोचले व त्यांनी ते शिखर काबीज केले. त्यावेळी बत्रा आनंदाने बेस कॅम्पवर असलेल्या त्यांच्या कमांडरला म्हणाले होते –

ये दिल मांगे मोअर!

 

vikram-batra-marathipizza01

विक्रम बत्रा ह्यांना त्यांच्या साथीदारांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा अगदी उत्साहाने आणि भरभरून साथ दिली. त्यांचे शिखर काबीज करण्याचे मिशन हे भारतीय इतिहासातील सर्वात कठीण मिशन समजले जाते.

शत्रू सैन्यामध्ये त्यांचा इतका दरारा होता की पाकिस्तानी सैन्यात जेव्हा सांकेतिक शब्दात संदेशांची देवाण घेवाण चालत असे तेव्हा बत्रा ह्यांचा उल्लेख ‘शेर शाह’ असा केला जात असे.

 

Vikram-Batra 1 InMarathi

हे ही वाचा – अंगावर काटा आणणारी चित्तथरारक कहाणी : एअर इंडिया “IC 814” विमान अपहरण…

शिखर ५१४०, टायगर हिल काबीज केल्यानंतर भारताची काश्मीर खोऱ्यात पकड मजबूत झाली. हे ऑपरेशन यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर बत्रांनी त्यांच्या वडिलांना फोन करून कळवले होते की त्यांनी त्यांची जबाबदारी यशस्वीपणे पूर्ण केली आहे.

तेव्हा त्यांना माहित नव्हते की त्यांच्यावर ह्या पेक्षाही मोठी व कठीण जबाबदारी देण्यात येणार आहे.

शिखर ५१४० काबीज केल्याच्या बरोबर ९ दिवसांनंतर बत्रांनी अजून एक फोन करून सांगितले की ते एका तातडीच्या मिशनवर जात आहेत. त्यांच्यावर शिखर ४८७५ परत काबीज करण्याची महत्वाची जबाबदारी सोपवलेली होती.

 

vikram-batra-marathipizza03

हे शिखर काबीज करणे अत्यंत कठीण होते कारण ह्या शिखरावर म्हणजेच १६००० फुटांवर पाकिस्तानी सैन्य दबा धरून बसले होते आणि हे शिखर चढाई करण्यास अत्यंत कठीण होते.

त्यात भर म्हणजे धुके आपल्या सैनिकांची चढाई आणखी कठीण करीत होते. ह्या मिशनवर गेल्यानंतर ते परत घरच्यांशी संपर्क साधू शकले नाहीत.

शिखरावर दबा धरून बसलेल्या शत्रू सैन्याला विक्रम बत्रा आणि त्यांच्या साथीदाऱ्यांच्या आगमनाची कुणकुण लागली आणि त्यांनी जोरदार हल्ला केला. ह्या हल्ल्यात बत्रा गंभीर जखमी झाले. त्यांचे सहकारी अनुज नय्यर ह्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा दिला.

ती ७ जुलै १९९९ ची रात्र होती. ८ जुलै १९९९ च्या सकाळी भारताने शिखर ४८७५ काबीज केले परंतु विक्रम बत्रा ह्यांना मात्र गमावले. ह्यानंतर विक्रम बत्रा ह्यांना त्यांच्या शौर्यासाठी मरणोत्तर भारतीय सैन्याचा सर्वोच्च सन्मान परमवीर चक्र ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कॅप्टन बत्रा हे अतिशय निर्भीड आणि आव्हानांना न घाबरणारे होते. भारतीय लष्करी छावणी मधल्या अनेक इमारतींना ह्या शूर सैनिकाचे नाव दिले आहे.

 

vikram-batra-marathipizza02

हे ही वाचा – कारगिल युद्धातील विजयाला “लॉन्च” करणारा भारतीय सैन्याचा हवाई भाता

आजही IAS च्या परीक्षांमध्ये विक्रम बत्रा ह्यांनी काबीज केलेल्या शिखारांविषयी, त्यांच्या पराक्रमाविषयी प्रश्न विचारले जातात. भारतीय लष्करात जाण्याचे स्वप्न बघणाऱ्या तरुणांसाठी विक्रम बत्रा हे एक दीपस्तंभ आहेत.

वयाच्या अवघ्या २४-२५ व्या वर्षी स्वतःच्या स्वार्थाचा, परिवाराचा, सुरक्षेचा कुठलाही विचार न करत केवळ मातृभूमीसाठी प्राण कुर्बान करणारे विक्रम बत्रा तरुणांसाठी आदर्श निर्माण करून गेले आहेत.

आपल्या साथीदारांचा व त्यांच्या परिवाराचा विचार करणारे बत्रा ह्यांनी देशाला देव मानून त्यासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. ह्या मिशन दरम्यान त्यांच्या बरोबर असणाऱ्या सुभेदाराला ते म्हणाले

तू बाल बच्चेदार आदमी है, तू पीछे हट

आणि शत्रूच्या हल्ल्याचा सामना त्यांनी स्वतः करून आपल्या प्राणांचे बलिदान केले.

 

vikram-batra-marathipizza04

भारतमातेच्या ह्या थोर आणि अत्यंत शूरवीर सुपुत्राने आपले विक्रम हे नाव सार्थ केले. देशासाठी सर्वोच्च पराक्रम गाजवण्याचा त्यांनी विक्रम केला आणि शत्रू सैन्याचा पाडाव करून मगच प्राण त्यागला.

अशा ह्या थोर, पराक्रमी योद्ध्यास आमचे शतशः वंदन !

हे ही वाचा – कारगिल युद्धात पराक्रम गाजवणाऱ्या एकमेव महिला पायलटची थरारक कथा!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

One thought on “कारगिल युद्धात स्वतःच्या प्राणांची आहुती देणाऱ्या पराक्रमी “शेर शाह” कोण होता?

  • January 8, 2019 at 5:08 pm
    Permalink

    i love indian army.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?