' एकट्याने बनवलेल्या आणि कीक मारुन सुरू कराव्या लागणाऱ्या कारच्या जन्माची कथा! – InMarathi

एकट्याने बनवलेल्या आणि कीक मारुन सुरू कराव्या लागणाऱ्या कारच्या जन्माची कथा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

भारतीय तरुण नेहमीच आपल्या सृजनशील बुद्धीसाठी ओळखले जातात. आपल्या अनेक तरुण मुलांच्या बुद्धिमत्तेने जगाला अनेक गोष्टींकडे वेगळ्या दृष्टीकोनाने कसं बघायचं याचा धडा दिलाय.

आता हेच पहा ना तामिळनाडूच्या राकेश बाबूने चक्क वोक्सवॅगन कंपनीच्या बीटल कारची प्रतिकृती बनवली आणि तेदेखील अत्यंत कमी किमतीत, चला तर मग जाणून घेऊयात काय आहे हे प्रकरण….!

 

rakesh babu inmarathi

 

तामिळनाडूत वास्तव्यास असलेल्या राकेश बाबू या तरुणाने वोक्सवॅगन या कंपनीच्या बीटल कारची चालवता येणारी प्रतिकृती तयार केली आहे आणि ती देखील अत्यंत कमी खर्चात.

या गाडीला देखील त्याने पिवळा रंग दिला आहे. राकेश बाबू याच्या वडिलांचं एक लहानसं गॅरेज आहे. राकेश लहानपणापासूनच आपल्या वडिलांच्या गॅरेजमध्ये जात असत त्यामुळे त्याला गाड्या बद्दल प्रचंड आकर्षण होतं.

त्याने इंडस्ट्रियल ट्रेनिंगचा डिप्लोमा २००९ मध्ये पूर्ण केला, त्यानंतर त्याने मोटर सायकल आणि जीप यांची प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न केला परंतु तो गाड्यांसाठी खर्च करू शकत नसल्यामुळे काही प्रमाणात अयशस्वी ठरला.

वोक्सवॅगन बीटल गाडीची प्रतिकृती बनवत असताना राकेश नोकरी देखील करत होता त्यामुळेच त्याच्याकडे गाडीसाठी द्यायला अत्यंत कमी वेळ होता.

ही गाडी बनवायच्या आधी देखील त्याने अनेक असे प्रयोग केलेले होते त्यामुळे मोठ्या अपयशाचा मोठा अनुभव त्याच्या सोबत होता. या सर्व अपयशानंतर देखील तो खचुन गेला नाही, त्याने त्याचे प्रयत्न सोडले नाहीत.

 

rakesh babu 2 inmarathi

 

जेव्हा त्यांने बीटल कारची प्रतिकृती बनवायचे ठरवले होते तेव्हा देखील त्याने पूर्णपणे ती गाडी पाहिलेली नव्हती. या गाडीत वापरण्यात आलेले जवळपास सर्वच स्पेअर पार्ट त्याच्या वडिलांच्या गॅरेजमधील होते.

तो जुन्या वापरलेल्या स्पेअर पार्टला वापरून ही गाडी तयार करत होता आणि म्हणूनच चक्क चाळीस हजारांपेक्षाही कमी किमतीत ही गाडी राकेशने तयार केली.

या गाडीत वापरण्यात आलेले इंजिन सुझुकीच्या सामुराई या दुचाकी गाडी मधील आहेत, तर या गाडीसाठी वापरलेली चाकं एका ऑटोरिक्षाची आहेत.

या गाडीचा बंपर दुचाकी गाडीच्या गार्ड पासून तयार करण्यात आलेला आहे, या गाडीत दार उघडण्यासाठी वापरण्यात आलेले हँडल हे अॅबेसिडर गाडीचे आहेत. या गाडीला राकेशने मोटरसायकलचे आरसे बसवलेले आहेत.

 

wolkswagon inmarathi

 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे राकेशला गाडी तयार करण्यासाठी रिव्हर्स गिअरची आवश्यकता होती परंतु ते अत्यंत महाग होते, रिव्हर्स गिअर घेण्याचे पैसे नसल्यामुळे राकेशने ते रिव्हर्स गिअर चक्क स्वतः तयार केले आहेत.

सुरुवातीला या गाडीला किक मारून सुरू करावी लागत असे परंतु नंतर त्याने यात सुधारणा करून आता त्याला सेल्फ स्टार्टची सुविधा सुद्धा जोडली आहे.

महत्त्वाचं म्हणजे टू स्ट्रोक इंजिन ला सेल्फ स्टार्ट सुविधा जोडण्याची कदाचित ही पहिलीच वेळ असेल.

या गाडीच्या क्षमतांविषयी विचार केला तर लक्षात येतं की, ही गाडी जास्तीत जास्त ४० किलोमीटर प्रती तास एवढ्या वेगाने प्रवास करु शकते, या गाडीचे एवरेज तीस किलोमीटर प्रति लिटर असे आहे तर या गाडीत जास्तीत जास्त चार लिटर पेट्रोल बसू शकते.

काही नियमांमुळे राकेश ही गाडी रस्त्यांवर ती सर्रासपणे वापरू शकत नाही परंतु त्याच्या या प्रयत्नाचे मात्र सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे. त्याला आज देखील अनेक गाड्या मोडीफाय करण्याची ऑफर येत आहे.

 

wolkswagon 3 inmarathi

 

नोकरी करत करत गाडी तयार केल्यामुळे त्याला गाडी तयार करण्यासाठी फार वेळ देता येत नसेल त्यामुळे राकेशला ही गाडी तयार करण्यासाठी सहा महिने लागले.

त्याचं म्हणणं आहे की जर तो पूर्णवेळ गाडीसाठी देऊ शकला असता तर त्याने केवळ तीनच महिन्यात ही गाडी तयार केली असती.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?