' फक्त ५ मिनिटं हा व्यायाम केलात, तर आरोग्याच्या अनेक समस्या एकाच वेळी सुटतील – InMarathi

फक्त ५ मिनिटं हा व्यायाम केलात, तर आरोग्याच्या अनेक समस्या एकाच वेळी सुटतील

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही सहज वाटणाऱ्या गोष्टींचे खूप फायदे असतात. यातले बरेच आपल्याला माहीत नसतात. काहीजणांना नखं एकमेकांवर घासण्याची सवय असते. जाणीवपूर्वक असं करणाऱ्या व्यक्तींना त्याचे महत्व माहीत असेलच. ज्यांना या दोन मिनिटाच्या कृतीचे नाव आणि त्याचे फायदे माहीत नसतील त्यांच्यासाठी हा लेख अत्यंत महत्त्वाचा आहे.

दोन्ही हाताच्या नखांना एकमेकांवर घासण्याच्या या प्रक्रियेला ‘बालायम योग’ असं नाव देण्यात आलं आहे. ‘बालायम योग’ला केसांची काळजी घेण्यासाठी सांगण्यात येणारा जालीम उपाय म्हणून ओळखलं जातं.

 

balayam yog inmarathi

 

भारतीय आयुर्वेदाने आणि योगाने जगाला दिलेल्या सर्वात सोप्या व्यायामांपैकी एक म्हणून ‘बालायम योगा’ ला ओळखलं जातं. ऍक्युप्रेशर थेरपीमध्ये सुद्धा हाताच्या नखांच्या एकमेकांवर घासण्याला खूप महत्व देण्यात आलं आहे. केसांची वाढ योग्य पद्धतीने होण्यासाठी ऍक्युप्रेशर मध्ये सुद्धा ही पद्धत सांगण्यात येते.

‘बालायम योग’ ही पद्धत एक वरदान मानली जाते. दोन मिनिटे करायच्या या व्यायामामुळे केसांचं पांढरे होणेसुद्धा आपण थांबवू शकतो. त्याच बरोबर, केस पातळ होणे, अकाली टक्कल पडणे या सर्व समस्यांवर ‘बालायम योगा’ हा एक उपाय आहे.

दोन्ही हाताच्या नखांना एकमेकांवर घासल्याने टाळूला योग्य पद्धतीने रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा होतो. हाताच्या नखांना एकमेकांवर घासण्याची प्रक्रिया जर काही वर्षांसाठी सातत्याने सुरू ठेवली तर माणसांना कधीच टक्कल पडत नाही असं सुद्धा आयुर्वेदात सांगण्यात आलं आहे. ‘बालायम योगा’ला प्रसन्न मुद्रा हे सुद्धा एक नाव देण्यात आलं आहे.

‘बालायम योग’ करण्यासाठी ही पद्धत सांगण्यात आली आहे:

 

balayam yog inmarathi1

 

१. आपले दोन्ही हात छातीजवळ घेऊन यायचे. दोन्ही हाताची बोटं आतील बाजूने वळवायची आणि नखांना एकमेकांवर घासायचं असा हा इतका सोपा व्यायाम आहे.

२. हा योग दिवसभरात ५ ते १० मिनिटांसाठी केला पाहिजे जेणेकरून, तुमच्या केसांच्या समस्यांचं निवारण लगेच होईल.

‘बालायम योगा’ चे इतर फायदे कोणते आहेत?

१. त्वचा रोग निवारण हे ‘बालायम योग’ नियमित केल्याने होत असते.

२. मानसिक स्वास्थ्य टिकवण्यासाठी आणि तणाव विरहित जीवन जगण्यासाठी ‘बालायम योग’ करायला पाहिजे असं तज्ञ सांगत असतात.

३. राग कमी करण्यासाठी, मन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी सुद्धा ‘बालायम योगा’ चा नियमित सराव केला जातो.

 

alia bhatt 1 inmarathi

 

४. आपल्या शरीरात रक्तपुरवठा सुरळीत राहण्यासाठी, चेहरा तजेलदार दिसण्यासाठी आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी प्रसन्न मुद्रा हे आसन करण्याचा सल्ला कित्येक डॉक्टर सुद्धा देतात.

‘बालायम योग’ करतांना या काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहीजेत:

१. या योग पद्धतीचा शरीरावर होणारा बदल दिसण्यासाठी थोडा संयम असणं अत्यंत आवश्यक आहे. थोडे दिवस सराव केल्यानंतरच अपेक्षित बदल दिसेल हे लक्षात ठेवावं.

२. दोन्ही हातांची नखं एकमेकांवर घासल्याने मिशी आणि दाढीच्या केसांची वाढ सुद्धा लवकर होत असते. हे आसन करताना कोणीही अंगठ्याचा वापर करू नये असं सांगितलं जातं.

‘बालायम योग’ कोणी करू नये? 

 

balayam yog inmarathi2

 

१. ज्या व्यक्तींना रक्तदाब (ब्लड प्रेशर)चा त्रास होत असेल त्यांनी ‘बालायम योग’ करू नये असं तज्ञ लोक सांगतात.

२. गरोदर स्त्रियांनी सुद्धा ‘बालायम योग’ करण्याचे टाळावे असं सांगितलं जातं. याचं कारण म्हणजे, त्यामुळे गर्भाशयात त्रास होऊ शकतो किंवा अतिरक्तदाबाचा त्रास होऊ शकतो.

‘बालायम योग’ करत असताना आहारावर नियंत्रण, धूम्रपान न करणे, केसांना तेल लावणे असे पथ्य पाळणे सुद्धा गरजेचं आहे. ‘बालायम योग’ हा शब्द “बाल” म्हणजे केस आणि “व्यायाम” हे शब्द एकत्र करून बनलेला आहे.

नैसर्गिक उपाय असल्याने या आसनाचा कोणताही साईड इफेक्ट नाहीये. वर दिलेल्या फायद्यांपैकी कोणतीही गोष्ट आपल्याला योग्य वाटल्यास आपणही आजच ‘बालायम योगा’चा सराव करायला सुरुवात केली पाहिजे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?