भारतातील २०० वर्ष जुनं शिवमंदिर या प्राण्याच्या ‘पाठीवर’ उभं आहे!
आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
===
भारत हा ऐतिहासिक वास्तू जतन करणारा सुंदर देश आहे. मागील काही वर्षात आपल्या पर्यटन मंत्रालयाने हाती घेतलेल्या incredible इंडिया या मोहिमेमुळे भारतात पर्यटकांचा ओघ कितीतरी पटीने वाढला आहे.
आपल्या प्राचीन मंदिरांबद्दल कितीही माहिती आपल्याकडे असली तरीही ती कमीच असणार हे नक्की. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या आणि विविध परंपरांनी समृद्ध असलेल्या देशातील प्रत्येक राज्य, त्या राज्यातील वैशिष्टयपूर्ण मंदिरं, गडकिल्ले जरी आपण फिरलो तरीही आपल्याला वेळ पुरणार नाही.
एका अशाच आश्चर्यचकित करणाऱ्या मंदिराबद्दल सांगणार आहोत, ज्या मंदिरात चक्क एका बेडकाची पूजा होते. होय… हे खरं आहे.
उत्तरप्रदेश मधील लखमीपुर- खेरी जिल्ह्यातील एका मंदिराबद्दल आम्ही सांगत आहोत. ओयल शैव संप्रदायचं हे प्रमुख केंद्र आहे. येथील प्रशासक हे शंकराचे उपासक होते. याच भागात एक शिव मंदिर आहे जे की शहराच्या मध्यवर्ती भागावर आहे. या मंदिरात शंकर भगवान हे बेडकाच्या पाठीवर विराजमान आहेत.
जिल्हा मुख्यालयापासून १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या या मंदिराला बेडूक मंदिर म्हणून ओळखलं जातं. या मंदिराचं एक वैशिष्ट्य आहे, की या मंदिरातील नर्मदेश्वर शिवलिंगाचं रंग बदलतो असं सांगितलं जातं. हे असं एकमेव मंदिर आहे जिथे, की नंदीची उभी मूर्ती आहे.
राजस्थानी स्थापत्यकलेवर आधारित असलेलं हे मंदिर मंडूक तंत्रावर बनलेलं आहे असं सांगितलं जातं. चाहमान शासकांच्या अधिपत्याखाली असलेल्या या ठिकाणाचा कार्यकाळ ११ व्या शतकापासून ते १९ व्या शतकापर्यंत होता.
चाहमान वंशाच्या राजा बख्श सिंह यांनी हे मंदिर बांधलं होतं. या राजाने एका युद्धातील जिंकलेल्या पैशाचा सदुपयोग करण्यासाठी या भव्य मंदिराची निर्मिती केली होती असं सांगितलं जातं.
कपिला या एका मांत्रिकाने या मंदिराच्या वास्तूची कल्पना आणि रचना केली होती. ही रचना तांत्रिक पद्धतीने केली असल्याने ती प्रत्येकाला मोहित करते.
श्रावण महिन्यात या मंदिरात भक्त येतात आणि शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करतात आणि आशीर्वाद घेतात. बेडूक मंदिरात एक विहीर सुद्धा आहे. या विहिरीला नेहमीच पाणी असतं.
२०० वर्षांपूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या या मंदिराचं बांधकाम हे नैसर्गिक आपत्तीपासून वाचण्यासाठी करण्यात आलं होतं असं सांगण्यात येतं. या मंदिरातील शिवलिंग हे संगमरवरी दगडाने बनलेल्या एका बांधकामावर ते शिवलिंग विराजमान आहे. हे शिवलिंग नर्मदा नदीतून आणल्याचं स्थानिकांकडून सांगितलं जातं.
‘बेडूक मंदिर’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या मंदिरात महाशिवरात्रीला आणि दिवाळीच्या दिवशी दरवर्षी गर्दी होत असते. खूप सुंदर आणि अद्भुत अशा या रचनेला उत्तरप्रदेशच्या पर्यटन विभागाने सुशोभित ठेवण्याचा संकल्प हाती घेतला आहे. बेडूक मंदिराला दुधवा टायगर रिजर्व्ह कॉरिडोरच्या अंतर्गत ‘विश्व मानचित्र’ म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
बेडूकच का? असा प्रश्न पडू शकतो. तर ते यासाठी,की तांत्रिक लोकांच्या मान्यतेनुसार बेडूक हा प्राणी यश, समृद्धी आणि भरभराटीचं प्रतीक मानलं जातं. त्यामुळे बेडूक हे मंदिर आपल्या अंगावर घेऊन आहे अशी रचना मंदिराची आहे.
बेडकाला देव मानण्यात येत नाही. मंदिरातील देव हे शंकर भगवानच आहेत, म्हणून या मंदिराचं नाव नर्मदेश्वर मंदिर हे ठेवण्यात आलं आहे. पूर्ण मंदिर हे बेडकाच्या पाठीवर अशा पद्धतीने बांधलेलं असूनही मुख्यद्वार हे बऱ्याच उंचीवर आहे. ही रचना यंत्र रचनेप्रमाणे अष्टकोनी स्वरूपात बांधली गेली आहे. मंदिराच्या आतील चित्र हे मुख्य गाभाऱ्याला अजूनच सुशोभित करतात.
एक मान्यता अशी सुद्धा आहे, की बख्त सिंग या राजाला बेडकाने आशीर्वाद दिला होता आणि नंतर तो समृद्ध झाला होता. या बेडकाच्या आठवणीत हे मंदिर बांधण्यात आलं होतं अशी सुद्धा एक नोंद आहे.
मंडूक मंदिर हे भारतीय स्थापत्यशास्त्राचा एक उत्कृष्ट उदाहरण आहे. नवीन लग्न झाल्यावर दोघांनी इथे येऊन दर्शन घेण्याची प्रथा स्थानिकांनी आजही सुरू ठेवली आहे. झाडं, स्वच्छता, पाणी यामुळे मंदिराला भेट दिल्यावर प्रसन्न होतो असा आजपर्यंत आलेला प्रत्यय आहे.
लखमीपुर ते सितापूर रोडवर असलेलं हे मंदिर हे लखनऊ पासून १३० किमी इतक्या अंतरावर आहे. पुढच्या वेळी फिरायला जाण्याचा प्लॅन करत असाल, तर त्यात उत्तरप्रदेश मधील या बेडूक मंदिरासाठी एक दिवस नक्की ठेवा.
===
इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप
–
आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi
–
आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.