' सावधान! प्रमाणाबाहेर बदाम खाल्लेत, तर होऊ शकतात हे गंभीर आजार… – InMarathi

सावधान! प्रमाणाबाहेर बदाम खाल्लेत, तर होऊ शकतात हे गंभीर आजार…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

बदाम हा बुद्धीवर्धन करण्यासाठी सर्वात उत्कृष्ट पदार्थ मानला जातो. रोज बदाम खाल्यास बुद्धी तल्लख होते, याला आता जगभरात मान्यता आहे. तसेच गरोदर स्त्रीने बदाम खाल्यास जन्मणाऱ्या बाळाची देखील बुद्धी तल्लख होते असं मानलं जातं.

विटामिन ‘ ए ‘ चा महत्त्वाचा स्त्रोत म्हणूनही बदामाकडे पाहिलं जातं. त्यामुळे त्याचा समावेश आपल्या आहारात असावा असं मानलं जातं.

परंतु कधीकधी कोणतीही गोष्ट अतिप्रमाणात केल्यास त्याचे दुष्परिणामही भोगावे लागतात. मराठी मध्ये एक म्हण आहे ‘अति तिथे माती’, ही म्हण बदाम खाण्यासाठी देखील लागू पडते.

अतिप्रमाणात जर बदाम खाल्ले गेल्यास त्याचे काही वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. अति प्रमाणात बदाम खाल्ल्याने त्याचे शरीरावर काय गंभीर परिणाम होतात हे पाहू!

 

almond inmarathi

 

बदामाचे अतिसेवन होत असल्यास त्यापासून बद्धकोष्टता येऊ शकते. आपले पोट दुखू शकते. बदामामध्ये खूप फायबर असतात. पण ते सगळेच फायबर आपले शरीर पचवू शकत नाही.

याचाच अर्थ आपली पचनक्रिया नीट चालत नाही. इतक्या प्रमाणातले फायबर पचवण्यासाठी भरपूर पाणी पिण्याची आवश्यकता असते. परंतु आपल्याकडून तितके पाणी प्यायले जात नाही.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

बदामाचे अतिसेवन केल्याने भूकही मंदावते. म्हणून अती बदाम खाणे टाळावे. बदामामध्ये विटामिन ई चे प्रमाणही जास्त असते. म्हणजे अर्धा कप बदामात २५ ग्रॅम विटामिन ई असते.

परंतु आपल्या शरीराला दिवसभरात केवळ १५ ग्रॅम विटामिन ई ची गरज असते. तसेच आपण विटामिन ई असलेले इतरही पदार्थ खात असतो. त्यामुळे शरीरात विटामिन ई ची मात्रा अतिरिक्त होते.

यामुळे अतिसार, अशक्तपणा येऊ शकतो. त्याचबरोबर दृष्टीदोषही येऊ शकतो. रक्तप्रवाहातही अडथळा निर्माण होतो. रक्त गोठण्याची समस्या निर्माण होऊ शकते. म्हणूनच जास्त बदाम खाऊ नयेत.

बदामामध्ये चरबी आणि कॅलरीज भरपूर असतात. म्हणजे साधारण शंभर ग्रॅम बदामात ५० ग्रॅम चरबी मिळते. अर्थातच ही चरबी मोनोसॅच्युरेटेड फॅट म्हणून ओळखली जाते.

 

fats inmarathi

 

जी आपल्या हृदयासाठी उपयुक्त आहे. पण जर तुमची शारीरिक हालचाल जास्त नसेल, व्यायामाचा अभाव असेल तर ही चरबी साठून राहील आणि अतिरिक्त चरबीमुळे वजन वाढेल. त्यामुळे हृदयावर दाब येईल.

तसंच ज्या लोकांना किडनी स्टोनचा त्रास आहे त्यांनीही अतिप्रमाणात बदाम खाऊ नयेत. किडनी स्टोनचा त्रास हा मूत्राशयात कॅल्शियमचे खडे झाल्यामुळे होतो.

मुख्यतः कॅल्शियम जर शरीरात विरघळले नाही तर त्याचे खडे तयार होतात. ते मूत्रनलिकेतून शरीराच्या बाहेर जात नाहीत, त्यामुळे किडनी वर दबाव येतो. बदामामुळे असे मूतखडे होण्याची शक्यता अधिक असते.

kidney pain

 

कारण बदमासारखे नट्स शरीरास कॅल्शियम शोषून घेण्यास मज्जाव करतात. म्हणूनच किडनी स्टोन असलेल्या लोकांनी बदामाचे सेवन अतिप्रमाणात करू नये.

जास्त प्रमाणात बदाम खाल्ल्याने ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो. शरीराचा दाह होणे, जळजळ होणे, पुरळ उठणे इत्यादी प्रकारही होतात. बदामामुळे एनाफेलेक्सिस नावाची एलर्जी होते.

यामुळे श्वास लागणे, डोकेदुखी, रक्तातील साखर वाढणे, मळमळ, उलट्या होणे आदी त्रास होऊ शकतात. म्हणूनच बदाम खाताना काळजी घ्यावी. ही एलर्जी तोंडातल्या आजारासाठीही काही प्रमाणात कारणीभूत ठरते.

म्हणजे तोंडात खाज सुटणे, घसा खवखवणे, जीभ, तोंड, ओठ यावर सूज येणे इत्यादी त्रासही होतात.

 

allergy inmarathi

 

बऱ्याचदा वेदना कमी करण्यासाठी कडू बदाम खाण्याचा सल्ला दिला जातो. पण ते केवळ औषध म्हणून कमी प्रमाणात, ठराविक दिवसांसाठी घेण्यास ठीक आहे. परंतु त्याच्या अतिसेवनामुळे आपल्या शरीरात विषाचे प्रमाण वाढू शकते.

कारण त्यात हायड्रोसायनिक ॲसिड असते. ज्यामुळे श्वास घ्यायला त्रास होईल, तगमग होईल, अस्वस्थपणा जाणवेल, कधी कधी मृत्यूही येईल. गरोदर स्त्रियांनी आणि स्तनदा मातांनी कडू बदाम खाऊ नयेत.

१०० ग्रॅम बदामात २.३ मिलिग्रॅम मॅंगनीज असते आणि आपल्या शरीराला केवळ १.३ मिलिग्रॅम मँगनीजची गरज असते. याशिवाय आपल्या पालेभाज्या, फळं, धान्य यामधूनही मँगनीज आपल्या शरीरात जात असते.

आणि अती मॅंगनीज देखील आपल्या शरीरासाठी उपयुक्त नाही. त्याच्यामुळे ब्लड प्रेशर कमी होते आणि त्याचा त्रास होऊ शकतो. जर कोणतीही अँटिबायोटिक्स घेत असाल तर त्याचा परिणाम जाणवणार नाही.

मग आता प्रश्न पडतो की दररोज किती बदाम खावेत. तर याचे उत्तर आहे दिवसभरात १० ते १५ बदाम एखाद्या निरोगी व्यक्तीसाठी योग्य आहेत. बदाम कच्चे खाल्ले तरी चालतात.

almond 2 inmarathi

 

परंतु शक्यतो कच्चे बदाम खाऊ नयेत. कारण एखाद्या बदामात बॅक्टेरिया असेल तर त्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून बदाम भाजून खाणे योग्य.

तसेच शक्यतो भिजवलेले बदामही खाल्ल्यास त्याचा जास्त फायदा मिळतो. रात्रभर भिजवून ठेवलेले बदाम सकाळी उठून खाल्ले तर ते आपल्या शरीराला उपयुक्त घटक पुरवतात.

रिकाम्या पोटी भिजवलेले बदाम खाल्यास चयापचय क्रिया चांगली होते. बदामाचे इतरही पदार्थ खाता येतात जसे की ड्रायफ्रूट्सचे लाडू ज्यात बदाम असतात किंवा बदामाचा शिरा.

 

badam halwa inmarathi

 

पण हे देखील दररोज खायचे असल्यास त्यांचे प्रमाण ठराविकच असावे. बदाम जर पूर्ण काळजी घेऊन ठेवल्यास एकवर्षभर नीट राहू शकतात. मात्र किडके, नासलेले, खाऊट बदाम खाऊ नयेत.

जर बदाम खायला डॉक्टरांनी परवानगी दिली नसेल, तर त्याऐवजी काजू, पिस्ता, अक्रोड खाता येतील पण तेही एका मर्यादेतच.

असे मानले जाते, की बदामाच्या तेलाने केसांचे आणि त्वचेचे सौंदर्य वाढते आणि ते खरेही आहे. परंतु हे तेल प्रत्येकालाच लागू पडेल असे नाही. काहींना बदामाच्या तेलाचीही ऍलर्जी असू शकते.

कधीकधी अती तेल लावण्याने केस आणि त्वचेवर विपरीत परिणाम होतो. म्हणूनच कोणतीही गोष्ट एका मर्यादेत केल्यास त्याचे नक्कीच फायदे मिळतील.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?