' कोरोनाच्या नव्या रुपाला भिडताना भारताने अशी खबरदारी घ्यायलाच हवी! – InMarathi

कोरोनाच्या नव्या रुपाला भिडताना भारताने अशी खबरदारी घ्यायलाच हवी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

एखाद्या प्रसिद्ध मोबाईल कंपनीने त्यांचा नवीन मोबाईल लॉन्च केला की काही दिवसात किंवा महिन्यात त्याचा सक्सेसर दुसरा मॉडेल ते लॉन्च करतात.

जास्त काही बदल नसतो, फक्त लहानसहान काही गोष्टी वर खाली करून ते लॉन्च करतात. उदाहरणार्थ वनप्लस ८ आला आणि काही महिन्यातच वनप्लस ८टी बाजारात आला.

सांगायचं तात्पर्य हे, की २०२० मध्ये कोविड १९ कोरोनाच्या विषाणूने जगभर थैमान घातल्यानंतर याच विषाणूचे अपग्रेडेड व्हर्जन कोरोना २.० २०२१ च्या सुरवातीला लॉन्च व्हायच्या तयारीत आहे.

 

corona 2.0 inmarathi

 

ब्रिटन मध्ये याचा ट्रायल दिसून आल्याचे आपण बघितलेच आहे.

मागच्या काही दिवसात भारता सहित अनेक देशांनी आपल्या युरोपात आणि खास करून ब्रिटन मध्ये जाणाऱ्या सर्व फ्लाईट या रद्द केल्या आहेत.

२०२०च्या कोरोनाच्या वाईट आठवणींना मागे सोडून २०२१ या नेमक्या काळात कोरोना २.० ने ब्रिटन मध्ये घातलेला थैमान पाहता पूर्ण जगाला पुन्हा धोक्याची घंटा ऐकायला मिळत आहे.

आता डिसेंबर मध्ये ब्रिटनमध्ये आलेल्या या लाटेची कल्पना सप्टेंबर मध्येच त्यांना मिळाली होती. परंतु कोरोनाच्या लक्षणाशी असलेले साधर्म्य पाहता हा कोरोनाच असावा असा त्यांचा समज झाला.

पण नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये अचानक वाढलेली रुग्ण संख्या पाहता ब्रिटन मधील संशोधकांना कळून चुकले की ज्यांना ते फक्त कोरोना समजत होते तो केवळ कोरोना नसून त्याचा प्रगत असा विषाणू आहे.

कोरोनाच्या मानाने कोरोना २.० चा फैलाव हा ७०% एवढा जास्त आहे. त्यामुळे युरोपात ब्रिटनला लागून असलेल्या देशात सुद्धा या कोरोना २.० चे रुग्ण दिसून यायला लागले.

 

britain 2 inmarathi

 

शिवाय ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका आणि इतर देश ज्यांचे ब्रिटनमध्ये प्रवाशांचे येणे जाणे जास्त होते तिथे सुद्धा याचे रुग्ण दिसून आले आहेत.

आता प्रश्न असा की हा कोरोना निर्माण झाला कसा?

कारण कोरोनाचे प्राथमिक कारण बघता चिनी लोकांनी वटवाघूळ, साप, विंचू सारख्या कोणताही जीव खायच्या सवयीमुळे निर्माण झाला असे म्हटले जाते.

(कोरोना हा बायोलॉजीकल वेपन आहे, ज्याची निर्मिती वूहान स्थित लॅब मध्ये झाली आहे हे चीन कितीही नाकारत असला तरी यावर जग यावर आपला स्टँड घेऊन उभा आहे.)

तर ब्रिटन मधले राहणीमान आणि तिथल्या लोकांची खानपान ची पद्धती पाहता तिथले लोक असे काही खाण्याची रिस्क घेणार नाही हे तर निश्चित आहे. तरी या व्हायरसची निर्मिती आणि प्रादुर्भाव वाढलाच कसा?

या प्रश्नाचे उत्तर देताना ब्रिटनच्याच व्हिक्टोरिया युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी सांगितले की जो कोरोना आज जगभर आहे त्याच कोरोनाच्या विषाणूचे हे अपग्रेड झालेले व्हर्जन आहे.

आणि हा अपग्रेड कसा झाला यावर ते सांगतात की कोरोना आज जवळपास वर्ष झालं ज्याचं अस्तित्व आज जगभर आहे. तसेच त्याला खात्रीशीर असा इलाज बाजारात आलेला नाही.

 

covid vaccine inmarathi

 

त्यामुळे सृष्टीच्या नियमानुसार वातावरणाच्या हिशोबा नुसार हा कोरोना चा विषाणू फैलावासोबत स्वतःहुन अपग्रेड झाला आणि ब्रिटन मधील वातावरण त्याला विकसित होण्यासाठी योग्य होत.

कोरोना २.० चा परिणाम सुद्धा कोरोना सारखाच आहे का?

तर ताप भरणे, घसा कोरडा पडणे, सर्दी, पडसे आणि खोकला इत्यादी याचे प्राथमिक लक्षण आहेत. परंतु याची आपल्या शरीरातील अवयवांना हानी करण्याची क्षमता कोरोना पेक्षा जास्त आहे.

ब्रिटन मध्ये दिसून आले आहे की ज्यांना आधी कोरोना होऊन गेला आहे त्यांनाच या कोरोना २.० ची पुन्हा लागण झाल्याचे दिसून आले आहे.

कोरोना पासून जे रिकव्हर झाले होते त्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती हवी तेवढी डेव्हलप झाली नव्हती. त्यामुळे आधीच्या कोरोनाचे जे अवशेष होते त्यांनाच या नव्या कोरोनाने रिप्लेस केले आहे.

मग आता तयार होत असलेली लस ही या नव्या कोरोनावर उपायकारक आहे की नाही?

तर, जी लस आता प्रोग्रेस मध्ये आहे ती कोरोनाच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करून विषाणू निकामी करण्याच्या हेतूने तयार होत आहे. आता प्रगत कोरोना विषाणू आधीच्याच विषाणूचे प्रारूप आहे.

त्यामुळे तयार होणारी लस ही नव्या विषाणू मध्ये असणाऱ्या जुन्या विषाणूच्या अंगावर प्रभावीपणे काम करू शकते असा प्राथमिक अंदाज आहे.

त्यामुळे नव्या आणि जुन्या विषाणू मध्ये नेमका काय आणि किती फरक आहे यावरून नेमकं उत्तर मिळू शकेल.

आता भारतावर याचा काय परिणाम काय?

तर, जागतिक आरोग्य संघटना आणि प्रगत देशांच्या आरोग्य यंत्रणेने भारताबद्दल कोरोना संबंधित लावलेल्या अंदाजावर भारताने पाणी फिरवत कोरोना विरोधात यशस्वी रित्या काम केले आहे.

 

WHO inmarathi

 

जनतेने वैयक्तिकपणे घेतलेली काळजी,आरोग्य यंत्रणेने केलेली कामे, सरकारी यंत्रणेने केलेली उपाय योजना यामुळे एक करोड कोरोना बाधित संख्या गाठायला भारताला डिसेंबर महिना लागला.

तेच जागतिक आरोग्य संघटनेने भारत एक करोडचा आकडा पावसाळ्यात गाठेल असा अंदाज वर्तवला होता.

या नव्या साथीवर अनुभव नसताना सुद्धा, प्रगत देशांसारख्या सुविधा नसताना भारताने त्याच प्रगत देशांच्या तुलनेने कोरोनाचा प्रतिकार केला आहे.

आटोक्यात आणलेला मृत्यदर आणि रिकव्हर होणाऱ्या रोग्यांच्या आकड्यावरून हे दिसून येते. त्यामुळे या नव्या कोरोनाला भारत सक्षमपणे तोंड देऊ शकतो यात शंका नाही.

१३० करोड लोकसंख्येच्या देशात १ करोड इतके कमी कोरोना बाधित रुग्ण होण्याचे कारण म्हणजे भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती!

 

corona india

 

झालेल्या एका सर्व्हेनुसार ६०% भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती ही कोरोनाला तोंड देण्यासाठी सक्षम आहे. जी इतर कोणत्याही देशापेक्षा सर्वाधिक आहे. ज्याचे श्रेय हे भारताच्या हवामानाला आणि भारतीयांच्या आहारपद्धतीला जाते.

जरी ६०% भारतीयांची रोगप्रतिकारशक्ती चांगली असली तरी ४०% लोकांची तेवढी चांगली नाही आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. यामध्ये तुम्ही आम्ही कोणीही असू शकतो.

त्यामुळे मास्क वापरणे, सॅनिटायझरचा वापर करणे, स्वछता राखणे यासारख्या गोष्टीकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही.

विमान सेवा स्थगित करण्याबरोबर भारतात आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांची तात्काळ आपत्कालीन बैठक बोलवण्यात आली होती. त्यामध्ये काय निर्णय झाले ते अजून जाहीर करण्यात आलेले नाही.

 

air line inmarathi

 

पण लवकरच या नव्या कोरोना संबंधित गाईडलाईन्स या लवकरच जाहीर होतील अशी अपेक्षा आहे.

तर, कोरोनाच्या वेळेस आपण घेत असलेली काळजी तशीच पुढे नियमित ठेवून जस या कोरोनचा प्रभाव आपण कमी केला तसाच या नव्या कोरोनचा प्रादुर्भाव टाळणे सुद्धा आपल्या वैयक्तिक वागणुकीवर अवलंबून आहे.

सरकार त्यांच्या परीने या नव्या कोरोना संबंधित दिशानिर्देश जाहीर करतीलच!

तोपर्यंत आपण आपल्या सोबत इतरांची सुद्धा काळजी घेऊन स्वतःसोबत आपला समाज आणि आपला देश या महामारीतून लवकरात लवकर मुक्त होईल यासाठी प्रयत्न करूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?