' या कारणामुळे राजीव गांधींनी मतदानासाठीचे वय १८ वर्षे केले..! – InMarathi

या कारणामुळे राजीव गांधींनी मतदानासाठीचे वय १८ वर्षे केले..!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

‘मतदान करण्याचा अधिकार’ हा भारतीय लोकशाहीमध्ये मिळालेला सर्वात मोठा बहुमान आहे. “तुमच्या मताला महत्व आहे” ही गोष्ट किती महत्वाची आहे ते कोणत्या अनिवासी भारतीयाला विचारलं तर लगेच कळेल.

जितकं मतदान करणाऱ्या व्यक्तींचं प्रमाण अधिक, तितकं ते लोकशाहीला पूरक असं नेहमीच म्हंटलं जातं.

हे माहीत आहे, तरीही आपण बघतो की जवळपास प्रत्येक निवडणुकीच्या आधी प्रादेशिक सरकार, केंद्र सरकार यांना मतदान करण्यासाठी जाहिरात करावी लागते.

 

voting inmarathi

 

सुट्टी जाहीर करून सुद्धा लोक मतदान केंद्रावर जायचा कंटाळा करतांना आपल्याला दिसतात. कित्येक लोक मतदानाच्या सुट्टीचं औचित्य साधून फिरायला जायचा प्लॅन करतात आणि मग नंतर निवडून आलेल्या सरकारला नावं ठेवतात.

मतदान करण्याचा अधिकार असलेली व्यक्ती ही कोणी लहान नसून १८ वर्ष आणि त्याहून अधिक वय असलेली व्यक्ती असते.

निवडणुक प्रक्रिया सुरू झाली तेव्हा मतदान करण्यासाठी सरकार मान्य पात्रतेचं वय हे २१ वर्ष होतं. कदाचित, त्या वयात मतदान करण्याचं महत्व कळेल असं तज्ञ लोकांनी मत मांडलेलं असावं.

हे ही वाचा ‘मिस्टर क्लीन’ ते ‘बोफोर्स’ घोटाळा : राजीव गांधींची प्रतिमा – पत्रकार शेखर गुप्तांच्या लेखणीतून

पण, नंतर हे वय बदलून १८ वर्ष करण्यात आलं. काय कारण असेल? आपण लवकर शहाणे व्हायला लागलो असं काही असेल का? या बदलमागे असलेलं सरकारी कारण जाणून घेऊयात.

२० डिसेंबर १९८८ रोजी संसद भवनात एक विधेयक संमत करण्यात आलं ज्यामध्ये मतदानास पात्र वयात बदल घोषित करण्यात आला. तत्कालीन कॉँग्रेस सरकारला या निर्णयाचं नुकसान झालं होतं असंही काही आकडे सांगतात.

 

congress 2 inmarathi

 

दर पाच वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतदार संख्येत १९८० चा दशकात दर पाच वर्षांनी २ ते अडीच कोटी मतदार वाढलेले असायचे.

१९८४ च्या निवडणुकीत मतदारांची संख्या ही ३७.४ करोड होती जी की या निर्णयामुळे १९८९ च्या निवडणुकीत ४४.७ करोड इतकी वाढली होती.

मतदारांच्या वयाचा हा मुद्दा सरकारला इतका गरजेचा का वाटला असावा?

१९८४ मध्ये ४०४ सीट्स जिंकून मोठ्या बहुमताने सत्तेत आलेल्या राजीव गांधी यांच्या सरकारला लोकांचा पाठींबा होता. हे आत्तापर्यंत भारतीय लोकशाही मध्ये कोणत्याही पक्षाला मिळालेलं सर्वोत्तम यश आहे.

इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर काँग्रेस सरकार बद्दल संपूर्ण भारतात आलेली सहनुभतीची लाट हे या यशाचं प्रमुख कारण मानलं जातं. पण, हे घवघवीत यश काही अंतर्गत व्यक्तींना खुपत होतं असं बोललं जातं.

काँग्रेस मधील काही व्यक्तींनीच बोफोर्स तोफांच्या खरेदीत झालेल्या संभाव्य घोटाळ्याची बोलणी सुरू केली आणि पुढचं काम मीडियाने केलं.

 

congress bofors inmarathi

 

१९८८ मध्ये हेच वातावरण असल्याने अलाहाबादची निवडणुक काँग्रेसला हरावी लागली. ही जागा अमिताभ बच्चन यांच्या राजीनाम्या मुळे रिक्त झाली होती.

ही जागा जनमोर्चा चे उमेदवार व्ही.पी.सिंग यांनी जिंकली होती. त्याच बरोबर तत्कालीन शेतकरी नेते महेंद्र सिंह यांनी शेतकरी आंदोलन सुरू करून ‘दिल्ली बंद’ चं आवाहन केलं होतं. बोफोर्स तोफेच्या खरेदीत झालेल्या गैरव्यवहारामुळे विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते.

१९८९ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभेच्या निवडणुकीला सामोरं जातांना ‘तरुणांना आकर्षित करावे’ अशी युक्ती काँग्रेस सरकार ला तज्ञांनी दिली. राजीव गांधी हे स्वतः तेव्हा केवळ ४५ वर्षांचे होते.

४० व्या वर्षी पंतप्रधान पदाची शपथ घेणारे ते देशाचे सर्वात तरुण पंतप्रधान आहेत. तरुणांमध्ये असलेल्या लोकप्रियतेमुळे नवीन मतदार आपल्यालाच मतदान करतील असा काँग्रेसचा अंदाज होता.

 

rajiv gandhi inmarathi

 

लोकसभेची निवडणुक झाली, निकाल हाती येऊ लागले. नवीन मतदार यादीत समाविष्ट झालेल्या तरुण मतदारांनी काँग्रेस चं कौतुक केलं होतं, पण मत देताना त्यांनी काँग्रेसला नाकारलं होतं.

राष्ट्रीय पातळीवर झालेल्या युतीचं सरकार स्थापन होणार होतं. ज्या तरुणांसाठी काँग्रेस ने मतदान करण्याचं वय १८ केलं त्याचा फायदा विरोधकांनाच जास्त झाला होता.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनात पास झालेल्या विधेयकात पुन्हा बदल करणं शक्य नव्हतं. तो बदल आमलात आला ते आजपर्यंत तसाच आहे.

“भारत हा सर्वात जास्त तरुणांचा देश आहे” हे जेव्हापासून अधोरेखित होऊ लागलं तेव्हापासून प्रत्येक पक्ष हा तरुणांना आकर्षित करण्याचे विविध पर्याय शोधू लागला.

नोकरीच्या संधी, मोफत लॅपटॉप अश्या घोषणा सगळेच पक्ष देऊ लागले. शेतकरी आणि तरुणवर्ग हे निवडणुकीचा निकाल ठरवणारे प्रमुख वर्ग ठरू लागले.

ज्या हेतूने काँग्रेस पक्षाने मतदान वय हे २१ वरून १८ वर आणलं त्याचा फायदा त्यांना नवीन चेहरे समोर आणून घेता आला नाही हे सिद्ध झालं.

 

indian youth inmarathi

 

राजीव गांधी यांना भारतात कम्प्युटरची क्रांती आणण्याचं सुद्धा श्रेय दिलं जातं. तरुणांना लवकर मतदान करण्याची संधी दिल्याबद्दल त्यांचे आभार मानले जातात.

हा बदल करण्यामागे राजकीय हेतू होता हे कळायला काही वर्ष जाऊ द्यावे लागले. ‘सोशल मीडियाचा अभाव’ हे सुद्धा अश्या काही निर्णयांचं नेमकं कारण लोकांसमोर येत नव्हतं असं म्हणता येईल.

हे ही वाचा राजीव-सोनिया गांधी, अमिताभ-जया बच्चन जेव्हा आयएनएस विराटवरून सहलीस जातात

प्रथम मतदान करण्याची संधी १९८९ पासून लोकांना ३ वर्षांआधी मिळू लागली.

या गोष्टीचा त्या वयात कॉलेज मध्ये असलेल्या मुला मुलींना खूप फायदा असतो हे नक्की. मतदानाचा अधिकार प्रत्येक वेळी बजावूया आणि आपल्या गौरवशाली लोकशाहीला अजून मजबूत करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?