' तुमच्या घरात असलेला हा एक पदार्थ तुम्हाला सुंदर बनवू शकतो!

तुमच्या घरात असलेला हा एक पदार्थ तुम्हाला सुंदर बनवू शकतो!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

सगळ्यांनाच सुंदर दिसायचं असतं. नितळ, डाग विरहित, मऊ त्वचा हवी असं सगळ्यांना वाटतं. बाजारात स्त्रियांसाठी भरपूर क्रीम्सपण उपलब्ध आहेत, पण पुरुषांचं काय? त्यांना सुद्धा छान दिसायचं असतं, वाटून घ्यायचं असतं.

आजकालच्या या प्रदूषित वातावरणात तर सगळ्यांनीच आपल्या त्वचेची काळजी घ्यायलाच हवी. मग ती स्त्री असो वा पुरुष. हयगय करून चालत नाही. कारण या प्रदूषणामुळे त्वचा तेलकट, पुटकुळ्यांनी भरलेली आणि बघण्यास किळसवाणी दिसते. म्हणून स्वच्छतेसाठी म्हणून का असेना, सगळ्यांनी या अगदी घरगुती असल्या नुस्क्याचा नक्की उपयोग करायला हवा.

तो नुस्का वेगळी अशी कोणतीच जादू नाही तर ते आहे बेसन”. बेसनात अँटीऑक्सिडंट्स असतात. याच बेसनात वेगवेगळे पदार्थ मिसळल्यास त्याचे गुण द्विगुणित होऊन, वेगवेगळ्या त्वचा विकार व वेगवेळ्या फायद्यांसाठी आपल्याला त्याचा वापर करता येऊ शकतो.

 

===

हे ह वाचा त्वचेचं सौंदर्य ते वजनाची समस्या : या एकाच “प्रयोगामुळे” तुम्ही चिरतरुण राहू शकता..!

===

जाणून घेऊया त्वचेसाठी बेसन कसे उपयुक्त असते व त्यात काय मिसळले म्हणजे आपल्याला वेगवेगळे फेस पॅक तयार करता येऊ शकतात…

१) तेलकट त्वचेसाठी –

तेलकट त्वचेसाठी बेसन हे एक अत्यंत गुणकारी क्लिनजर आहे. ते त्वचेत साचलेले अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचेला फ्रेश बनवते.

त्वचेतील अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी व त्वचेला मोईश्चराईझ करण्यासाठी बेसनात गुलाबाचे पाणी मिसळून हे मिश्रण चेहऱ्यावर लावून १५ मिनिटांनी धुवून घ्या. गुलाब पाण्याने चेहरा ताजा व टवटवीत राहतो.

२) टॅन घालवण्यासाठी –

 

beautiful-skin-inmarathi

 

उन्हात किंवा धूळ मातीतून फिरताना मुली स्कार्फ बांधतात किंवा सनस्क्रीन लावतात, पण मुलं या पैकी काहीच करत नाही. ज्यामुळे अंगावरील धूळ माती आणि उन्हामुळे झालेले टॅन अगदी घट्ट बसते आणि त्वचा काळपट दिसते. हे टॅन आपल्याला घरच्या घरीच कमी करता येऊ शकते.

यासाठी बेसन, टोमॅटो आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण उपयोगी पडेल. हे मिश्रण लावून चेहऱ्यावर २० मिनिटे ठेवा आणि नंतर धुवा. टोमॅटोमध्ये ब्लिचिंग तत्व असतात व लिंबात व्हिटॅमिन सी. ज्यामुळे टॅन निघून त्वचा ताजी तरतरीत दिसते.

३) चेहऱ्यावरील पुरळ घालवण्यासाठी –

 

skin inmarathi

 

बेसनात अँटीऑक्सिडंट्स असतात. ज्यामुळे चेहऱ्यावर साचलेली घाण कमी होते. यात औषधी गुण असलेली हळद, चंदनाची पावडर आणि दूध मिसळल्यास, हळदीमुळे चेहऱ्यावरील सगळे बॅक्टरीया व त्यामुळे होणारे पुरळ, पिंपल्स कमी होतात.

चंदन अतिरिक्त तेल शोषून घेऊन त्वचेला खुलण्यासाठी संतुलित वातावरण प्रदान करते. दुधामुळे चेहरा मऊ होतो व त्याला मोईश्चरायझेशन मिळते.

४) कोरड्या त्वचेसाठी –

 

 

बेसन अत्यंत न्यूट्रल असते. त्यामुळे कोरड्या व ओल्या अशा दोन्ही त्वचेसाठी ते वापरले जाऊ शकते. जर तुमची त्वचा कोरडी असेल, शुष्क आणि निस्तेज असेल तर बेसनात साय, दूध, मध आणि हळद मिसळून हे मिश्रण वापरावे.

===

हे ही वाचा कोरोनाच्या संकटात ब्युटी पार्लरला जाणं टाळा, सौंदर्य खुलवणा-या घरगुती टिप्स ट्राय करा

===

हे एक अत्यंत औषधी मिश्रण आहे त्यामुळे सगळी घाण निघून, बॅक्टरीया निघून त्वचेला पुरेसे तेल व ओलावा मिळतो. साय आणि मधामुळे त्वचा मऊ होते. हे मिश्रण लावून १५ मिनिटे ठेऊन हलक्या कोमट पाण्याने धुवून घ्या.

५) डेड स्किन काढण्यासाठी –

त्वचेला सतत घासून “पॉलिश” सुद्धा करावे लागते. यामुळे तिला चमक येते व त्वचा निस्तेज दिसत नाही. बेसन एक नैसर्गिक एक्सफोलियेटर आहे, जे त्वचेला स्वच्छ करते.

बेसनात तिळाचे तेल, वाळवलेल्या लिंबाच्या सालांची पावडर आणि लिंबाचा रस मिसळून हे मिश्रण त्वचेवर लावा आणि हलक्या हाताने अंग घासून घ्या. नंतर कोमट किंवा गार पाण्याने धुवून घ्या.

६) तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी –

 

aditi rao inmarathi

 

बदलत्या हवामानामुळे वयापेक्षा लवकरच आपण म्हातारे दिसू लागतो. निस्तेज त्वचा, त्वचेची सालं निघणे, त्वचा सैल पडणे हे सगळे प्रकार आजकाल फार कमी वयात होऊ लागले आहेत, पण घाबरू नका. आपल्या मदतीला बेसन आहे.

बेसनात साय, पाणी व मीठ मिसळून हे मिश्रण लावल्यास या सगळ्या समस्यांपासून मुक्ती मिळू शकते. हे मिश्रण १० मिनिटे लावून अंग घासा व पाण्याने स्वच्छ धुवा.

७) बॉडी स्क्रब –

 

 

बेसनात योग्य वस्तू मिसळल्यास वेगवेगळ्या समस्यांवर त्याचा उपयोग होतो हे आपण बघितलेच आहे. बेसनाचा बॉडी स्क्रबसारखा वापरही करता येऊ शकतो. त्यामुळे डेड सेल्स, बॅक्टरीया, अनावश्यक केस, सगळं निघून जाते.

बेसनात वाटून बारीक केलेली ओट्स पावडर, मक्याचं पीठ आणि दूध घालून हे मिश्रण अंघोळीच्या वेळी अंगावर लावा व अंगाला चोळून नंतर धुवा.

===

हे ही वाचा चिनी स्त्रियांची त्वचा इतकी सुंदर आणि नितळ कशी काय? जाणून घ्या

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?