११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी !

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

सध्याची पोरं फारच भन्नाट आहेत. ज्या वयात आपण फक्त रडायचो, हसायचो, खायचो, प्यायचो आणि झोपायचो त्या वयात सध्याची चिमुकली पिढी बक्कळ पैसे कमावते आहे. अगदी बिझनेस उभं करतेय असं म्हटलं तरी चालेलं. १०-१५ वर्षाच्या पोरांना जेव्हा मोठ्या मोठ्या परिषदांमधून त्यांच्या शोधांची आणि व्यवसायाची माहिती देताना आपण आज पाहतो तेव्हा आपल्या मनातही प्रश्न येतो, “आयला मी असा विचार केला असता तर मी देखील वयाच्या १०-१५ व्या वर्षी फेमस आणि पैसवाला झालो असतो.” पण त्यात आपलीही चूक नाही म्हणा! तेव्हाच वातावरण आणि आताच वातावरण खूप बदललंय. आपल्याला नसते तेवढी या चिमुरड्यांना तंत्रज्ञानाची, व्यवसायाची एकंदर जागतिक घडामोडींची इत्यंभूत माहिती असते.

हे देखील वाचा: वय वर्ष १४ – हवेत उडणारे ड्रोन्स – व्हायब्रण्ट गुजरात – ५ कोटींचा करार!

आता आम्ही तुम्हाला ज्या मुलीची गोष्ट सांगणार आहोत तिचचं उदाहरण घ्या. या अवघ्या ११ वर्षाच्या मुलीने केवळ लिंबू पाण्यातून तब्बल ७० कोटी रुपये कमावले आहेत. काय? उडालात ना हवेत?

mikaila-ulmer-marathipizza00

स्रोत

अमेरिकेतील टेक्सास मध्ये राहणाऱ्या या मुलीचं नाव आहे मिकाईला उल्मेर! ती आहे केवळ ११ वर्षांची! मिकाईला लहान असताना तिच्यावर मधमाशांनी दोनदा हल्ला केला होता. तेव्हापासून तिला मधमाशांची प्रचंड भीती वाटत असे. मात्र, कालांतराने मिकाईलाने मधमाशांबद्दल माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिला मधमाशांबद्दल एकप्रकारची ओढ, कुतूहल निर्माण झालं. तेव्हा मिकाईलाने ठरवलं की, घरात परंपरेने चालत आलेल्या लेमनेडमध्ये धने, जवस आणि मध मिसळून काय होतंय ते पाहूया आणि यातून मिकाईलने लेमनेड तयार केलं. तिला आपलं हे पेय भयंकर आवडलं आणि त्याची विक्री करण्याची कल्पना तिच्या डोक्यात आली.

mikaila-ulmer-marathipizza01

स्रोत

त्यानंतर मिकाइलाने ‘एबीसी टीव्ही’च्या ‘शार्क टँक’ कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रमात नव्या बिझनेस आयडियाजच्या साहाय्यानं पैसे जिंकण्याची संधी मिळते. या कार्यक्रमातून तिने ६० हजार डॉलरची सीड फंडिंग जिंकली आणि आपला व्यवसाय सुरु केला.

mikaila-ulmer-marathipizza02

स्रोत

गूगलच्या ‘डेयर टू बी डिजिटल कॅम्पेन’च्या माध्यमातून मिकाइलाने शोनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनाही आपल लेमनेड सर्व्ह केलं.

mikaila-ulmer-marathipizza03

स्रोत

होल फूड स्टोअर्ससोबत आपल्या ‘लेमनेड’ ब्रँडच्या विक्रीचा तिने करार केला आहे आणि याबदल्यात तिने ७० कोटी रुपयांची कमाई केली.

mikaila-ulmer-marathipizza04

स्रोत

तिचं ‘बी स्वीट’ नावाचं हे पेय उत्पादन आता टेक्सास, ओकलाहोमा, अरकन्सास आणि लुइसियाना येथील स्टोअर्समध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे.

mikaila-ulmer-marathipizza05

स्रोत

संपूर्ण जगभरातून अश्या लहानग्या उद्योजकांना प्रेरणा मिळत आहे. भारतामध्ये देखील गेल्या काही काळामध्ये अशी उदाहरणे पुढे आली आहेत आणि येणाऱ्या काळातही येतील. त्यांना प्रोत्साहन देऊन जगापुढे आणण्यासाठी सरकारने प्रयत्न केले तर निश्चितच ही चिमुरडी मांडली भारताचे नाव देखील जगामध्ये उज्ज्वल करतील आणि भारताची येणारी पिढी ही यशस्वी उद्योजक म्हणून जगापुढे येईल.

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarath

One thought on “११ वर्षांच्या मुलीने लिंबू पाण्यातून कमावले ७० कोटी !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?