हॉकीचा जादुगार कै . मेजर ध्यानचंदजींच्या 11 आठवणी

आमच्या इतर लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

===

भारताला Olympicsमध्ये सलग ३ दा सुवर्णपदक मिळवून देणाऱ्या, हॉकीच्या जादुगार कै . मेजर ध्यानचंदजींच्या काही खास आठवणी.

 

dhyan1-1440827198-800

 

१) जगभरात, “हॉकीचे सर्वोत्तम खेळाडू” म्हणून प्रसिद्ध

२) त्यांचा जन्मदिन – २९ ऑगस्ट – भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातो. ह्याच दिवशी भारताचे राष्ट्रपती – राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार आणि द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करतात.

३) वयाच्या १६व्या वर्षी भारतीय सैन्यात दाखल झाले आणि तेव्हाच हॉकीमध्ये प्रगती सुरु केली.

४) त्याचं मूळ नाव “ध्यान सिंग” आहे. परंतु ते रात्री उशीरापर्यंत हॉकीचा सराव करायचे – म्हणून त्यांच्या मित्रांनी त्यांना रात्रीच्या चंद्राची उपमा देऊन त्यांचं ध्यानचंद हेच नाव प्रसिद्ध केलं!

 

dhyan-chand-1409231388

५) १९२८च्या Amsterdam Olympics मध्ये त्यांनी तब्बल १४ गोल ठोकले होते. भारतीय संघाच्या एका विजयाचं वर्णन करताना एक रिपोर्ट म्हणते – हा हॉकीचा खेळच नाही. ही जादू आहे आणि मेजर ध्यानचंद हे हॉकीचे जादुगार आहेत.

६) १९३२च्या Summer Olympics मध्ये त्यांनी आणि त्यांच्या भावानी – रूप सिंग – अमेरिका आणि जपानला अनुक्रमे २४-१ आणि ११-१ असं हरवण्यात सिंहाचा वाटा उचलला. एकूण ३५ पैकी २५ गोल ह्या दोघांनी मारले होते. तेव्हापासून त्यांना “hockey twins” – हॉकीचे जुळे – म्हणून ओळखलं जायचं.

७) एका match मध्ये जेव्हा ध्यानचंद गोल करू शकत नव्हते तेव्हा त्यांनी वैतागून match refereeकडे गोल पोस्टची तक्रार केली — आणि आश्चर्य हे – की खरंच गोल पोस्ट ठरलेल्या नियमांनुसार नव्हती!

८) क्रिकेटचे सुपरहिरो Sir Don Bradman म्हणायचे – क्रिकेटमधल्या रन्ससारखे ध्यानचंद गोल्स करतात.

९) असं म्हटलं जातं की ध्यानचंदजींच्या बर्लिन ओलिंपिक्समधल्या खेळाने प्रभावित होऊन हिटलरने त्यांना जर्मन नागरिकत्व आणि जर्मन सैन्यात पद offer केलं होतं. पण ह्या भारतीय जादुगाराने ते नाकारलं.

 

१०) आपल्या २२ वर्षांच्या कारकिर्दीत, त्यांनी तब्बल ४०० गोल केले.

११) नेदरलंडच्या हॉकी ऑथोरिटीने, अक्षरशः त्यांच्या हॉकी स्टिकचे तुकडे करून चाचणी घेतली होती. त्यांना वाटलं होतं की ध्यानचंदजींच्या स्टिकमध्ये चुंबक आहे!

d1-1409231405

ह्या हॉकीच्या जादुगारास, भारताच्या सुपुत्रास सलाम…!

लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुकपेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi

Omkar Dabhadkar

Editor @ इनमराठी.कॉम

omkar has 211 posts and counting.See all posts by omkar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?