या विदेशी शहरांना देण्यात आली आहेत भारतीय शहरांची नावं

आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page

===

आपण नेहेमी बोलत असतो की, आपल्या देशातील लोकं विदेशी गोष्टींच्या हारी गेले आहेत. त्यामुळे ते प्रत्येक गोष्टीत विदेशींची कॉपी करण्याचा प्रयत्नात असतात. मग ते वेशभूषेत असो किंवा बोलण्यात असो. आपण विदेशिंच्या प्रत्येक गोष्टीपासून प्रभावित असतो आणि त्याचं काही अंशी का होईना अनुकरण करण्याचा प्रयत करत असतो. पण काय आपणच त्याचं अनुकरण करतो? तर असे नाही ते देखील काही गोष्टींत आपले अनुकरण करतात. जसे की जगातील अशी काही राष्ट्र आहेत ज्यांनी आपल्या देशातील ठीकांणांना आपल्या भारतातील शहरांची नाव दिली आहेत. आश्चर्य वाटतय ना.. पण हे सत्य आहे.. आज आम्ही तुम्हाला अश्याच ११ विदेशी ठिकाणांबद्दल सांगणार आहोत ज्यांना आपली स्वदेशी नाव देण्यात आली आहे.

 

delhi-inmarathi00

 

देशाची राजधानी दिल्ली (Delhi) शिवाय युएसमध्ये देखील याच नाव आणि स्पेलिंगचं एक ठिकाणं आहे Delhi. एवढचं काय तर कॅनडाच्या ऑन्टारियो शहरात देखील याच नावाचे एक ठिकाण आहे पण तेथे त्या ठिकाणाला Delhi नाही डेल-हाई म्हटल्या जातं.

 

Calcutta-inmarathi

 

युएसमध्ये Calcutta नावाचं शहर हे १८७० साली वसवण्यात आलं होतं. या ठिकाणी कोळश्याच्या खाणी होत्या. तर भारतातील Calcutta, म्हणजेच कोलकाता तेथील संस्कृती आणि आर्ट करिता प्रसिद्ध आहे.

 

lucknow-inmarathi

 

लखनऊ म्हणजे ‘ढगांत बनलेला महाल’.. भारतातील लखनऊ म्हणजे संस्कार आणि रॉयल याचं मिश्रण तर अमेरिकेत देखील एक लखनऊ आहे, जो पहाडावर ५ हजार एकरात बनलेलं एक अलिशान मेंशन आहे.


 

patna-inmarathi

 

एकेकाळी मगध राज्याची राजधानी असणारी पटना, भारताचा इतिहास सांगते. तर इकडे स्कॉटलंड मध्ये देखील याचं नावाचं एक सुंदर गावं आहे. या गावाचं नाव या गावाला वसवणाऱ्या William Fullarton यांनी ठेवलं होत. William Fullarton यांचे वडील इस्ट इंडिया कंपनीत काम करायचे आणि तत्यांच्याच तोंडून William Fullarton यांनी हे नाव एकल होत, जे त्यांना खूप आवडलं होत.

 

Thane-inmarathi

 

महारष्ट्रातील ठाणे याबद्दल तर आपण सर्वच जाणतो, पण काय तुम्हाला माहित आहे की, ऑस्ट्रेलियात देखील एक ठाणे नावाचं शहर आहे.

 

indore-inmarathi

 

मध्यप्रदेशातील इंदौर, जे तेथील सेव-पोहे करिता खूप प्रसिद्ध आहे. पण युएसच्या West Virginia येथे देखील एक इंदौर आहे. पण हा शब्द हिब्रूच्या ‘Endore’ यापासून घेण्यात आला आहे ज्याचा अर्थ एखाद्या ठिकाणी राहणे असा होतो.

 

dhaka-inmarathi

 

बांगलादेश येथील ढाका जी बांगलादेशची राजधानी आहे, पण आपल्या भारतातील बिहार राज्यात देखील ढाका नावाचे क्षेत्र आहे.

 

hyderabad-inmarathi01

 

भारतातील हैद्राबाद या शहराचे नाव याला वसवणाऱ्या राजाच्या आवडत्या नृत्यांगनेच्या नावावर पडले. आज हे शहर येथील बिर्याणी आणि चार मिनार करिता जगविख्यात आहे. तर एक हैद्राबाद पाकिस्तानात देखील आहे. ज्याच नाव हैदर आली यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे, जे पैगंबर मोहोम्मद यांचे भाऊ होते.

 

kochi-inmarathi

 

कोची हे केरळचे सर्वात सुंदर शहर आहे, तर एक कोची जपान येथे देखील आहे जे एक टूरिस्ट डेस्टिनेशन आहे.

 

salem-inmarathi

 

तामिळनाडू येथील पौराणिक शहर सलेम याचा उल्लेख आपल्याला पहिल्या आणि दुसऱ्या शतकाच्या पुस्तकांत सापडतो. जेव्हाकी युएस येथील सलेम हे हिब्रू भाषेतून घेण्यात आले आहे ज्याच अर्थ ‘शांती’ असा होतो.

 

Faridkot-inmarathi

 

भारतातील पंजाब राज्यात फरीदकोट नावाचा एक जिल्हा आहे. याचं नावाचे एक ठिकाण पाकिस्तानात देखील आहे. पाकिस्तानचे फरीदकोट २६/११ मुंबई हल्ल्या नंतर जास्त चर्चेत आले, २६/११ मुंबईच्या हल्ल्यातील आतंकवादी कसाब हा इथलाच राहणारा होता.

जर तुम्ही देखील या ठिकाणी गेलात तर त्या शहरांची नावे एकूण आश्चर्यचकित होऊ नका…

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com तसेच, आमच्या लेखांच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आमच्या फेसबुक पेजला नक्की Like करा: facebook.com/InMarathi.page । Copyright (c) 2017  InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *