पुरुषांनो, स्पर्म काउंट वाढवायचा असेल तर हे ११ पदार्थ खा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

===


प्रजोत्पादनासाठी विज्ञानात काही महत्त्वाचे नियम सांगितले आहेत. हमखास गर्भधारणेसाठी पुरुष शुक्राणूंची संख्या उत्तम असावयास हवी. त्यातून ते सुदृढ असावेत. अशा शुक्राणूंमुळे गर्भधारणेस काहीही धोका नसतो. गर्भसंस्कारांमध्येही सुरुवात ही शुक्राणूंपासूनच होते.

शुक्राणूंचे योग्य प्रमाण आणि प्रकृती उत्तम असणे हे सहज गर्भधारणेचे द्योतक आहे.

बऱ्याचदा खूप जोडप्यांना अपत्य प्राप्ती होण्यास खूप अडचणी उद्भवतात. कधी समस्येचे मूळ स्त्रीबीजामध्ये असू शकते तर कधी पुरुष बीजांमध्ये. शुक्राणूंची संख्या खूपच कमी असल्यास गर्भधारणेत अडथळा येतोच.

शुक्राणूंची संख्या, त्यांची जलद गती, त्यांची प्रकृती आणि त्यांचे आकारमान हे सगळेच गर्भधारणेसाठी आवश्यक असणारे गुण आहेत.

डॉक्टरकडे जाऊन ह्या संदर्भात आपण योग्य तो सल्ला घेऊ शकतो आणि त्याचबरोबर काही औषधे लागल्यास तीही सेवन करू शकतो. पण ह्या सगळ्या उपचारासोबत आपला आहारसुद्धा आपल्याला मदत करू शकतो.

योग्य तो आहार घेतल्यास शुक्राणूंची संख्या वाढण्यास आणि ते सुदृढ होण्यास नक्कीच मदत होते.

खालील पदार्थांचा समावेश दैनंदिन आहारात जरूर करा.

१. झिंक:


झिंक चे सेवन कमी असलेल्या पुरुषांना वंध्यत्वाचा सामना करावा लागतो. शरीरात झिंक कमी प्रमाणात असल्यास त्याचा अपाय शुक्राणूंची संख्येवर आणि त्यांच्या गुणांवर होतो.

झिंक शरीरास मिळण्यासाठी खालील पदार्थ आहारात समाविष्ट करावेत:

● ओयस्टर
● मटन आणि चिकन
● शेलफिशेस जसे खेकडे आणि लॉबस्टर
● सिरिअल्स
● विविध शेंगा आणि शेंगदाणे
● सुका मेवा
● गव्हाची उत्पादने
● दुग्धजन्य पदार्थ

 

zinc-rich-food-inmarathi
healingsolutionshealth.com

२. फोलेट:

फोलेट म्हणजे ‘ब’ व्हिटॅमिन. ह्याची कमतरता असल्यास शुक्राणू DNA चे नुकसान होते. ते खराब निघू शकतात. शुक्राणूंची घनता आणि संख्या कमी होते. खालील काही पदार्थ सेवन केल्यास शरीरातील ब जीवनसत्वाची घट भरून निघते.

● हिरव्या पालेभाज्या जश्या पालक, लेटयूस, अस्परागस
● संत्री
● सुकामेवा
● दाणे, शेंग भाज्या
● अख्खे कडधान्य
● सिरिअल्स
● ब्रेड
● पास्ता

 

zinc-rich-food-inmarathi
the-complete-herbal-guide.com

३. जीवन सत्व ब-१२:

हे जीवनसत्व जर आहारात कमी प्रमाणात असेल तर शुक्राणू DNA खराब उपजण्याची शक्यता असते. शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी आणि त्यांची बीजांडापर्यंत हालचाल सुलभ करण्यासाठी ह्या ब-१२ जीवनसत्वाचे सेवन गरजेचे आहे. खालील काही पदार्थातून आपणास ते मिळेल.

● समुद्री मेवा जसे मासे आणि शिंपले
● मटण आणि चिकन कलेजी
● अंडी
● दुग्धजन्य पदार्थ
● सिरिअल्स
● यीस्ट

 

Foods-High-in-Vitamin-B12-inmarathi
lethow.com

४. क जीवन सत्व:

क जीवनसत्व एक अँटी ऑक्सिडंट आहे. ह्याच्या सेवनाने शुक्राणूंची हालचाल सुरळीत राहते. त्यांची संख्या आणि आकारमान सुयोग्य राहण्यास क जीवांसत्वामुळे मदत होते. खालील पदार्थ आपल्याला क जीवनसत्व पुरवतात.

● आंबट फळे आणि त्यांचा रस
● किवी
● स्ट्रॉबेरी
● भाज्या जश्या टोमॅटो, ब्रोकोली, बटाटा आणि कोबी
● दुग्धजन्य पदार्थ
● सिरिअल्स

 

Vitamin-C-Rich-Foods-inmarathi
nutrition-forest.com

५. ड जीवन सत्व:

शरीरातील टेस्टीस्टेरॉन नावाचा द्रव योग्य प्रमाणात बनण्यास ह्याची मदत होते. शुक्राणुंंना बीजांडापर्यंत पोचण्यास लागणारी गती ह्या जीवनसत्वामुळे प्राप्त होते. ह्याचे प्रमाण कमी असल्यास शुक्राणूंचा दर्जा सुमार असू शकतो. खालील पदार्थांपासून ड जीवनसत्वाचे प्रमाण शरीरात वाढवता येते.

● तेल देणारे मासे जसे बांगडा, टुना, रावस
● चीझ
● अंड्यातील पिवळे बलक
● मशरूम
● दुग्धजन्य पदार्थ

 

Vitamin-C-Rich-Foods-inmarathi
sientetebien.com

६. ई जीवनसत्व:

शुक्राणूंची क्वालिटी राखण्यास ह्या जीवनसत्वाची मदत होते. ई जीवनसत्व शुक्राणूंना डॅमेज होण्यापासून वाचवते. खालील खाद्यपदार्थाच्या ई जीवनसत्व नोठ्या प्रमाणात आढळून येते.

● वनस्पतीजन्य तेल जसे मका तेल, सोयाबीन तेल
● तेलयुक्त बिया
● भाज्या जश्या ब्रोकोली, पालक
● फळांचे रस
● सुका मेवा

 

Vitamin-E-Rich-Food-inmarathi
the-fit-global.com

७. कॉएंझाईम Q१०:

हे एक प्रकारचे अँटी ऑक्सिडंट आहे जे शरीरातील सगळ्याच पेशींना कार्यरत राहण्यास गरजेचे आहे. ह्याच्या सेवनाने पुरुषांमधील वीर्य वाढीला मदत होते आणि वंध्यत्व नष्ट होण्यास मदत होते. खालील विशिष्ट पदार्थातूनच हे शरीराला मिळते.
● बीफ आणि चिकन
● मासे
● सोयाबिन आणि कॅनोला तेल
● शेंगदाणे
● पिस्ते
● सुर्यफुलाच्या बिया

 

Coenzyme-Q10-Food-inmarathi
setaliste.com

८. ओमेगा ३ फॅटी ऍसिड:

शुक्राणूंची संख्या वाढवण्यासाठी ओमेगा ३ फॅटी ऍसिडस् एकदम उपयुक्त आहेत. बीजांड्या पर्यंत शुक्राणूला पोहचवण्यासाठी लागणारी गतीदेखील ह्याच्या मुळे वाढीस लागते. खाली दिलेल्या पदार्थातून ह्याची गरज भागवू शकतो.

● समुद्री मेवा जसे मासे, खेकडे इ.
● शेंगा आणि तेलयुक्त बिया
● अक्रोड
● सोया आणि कॅनोला तेल
● अंडी
● दही

 

Omega-3-inmarathi
lifestylefood.com

९. मेथ्या:

शुक्राणूंची योग्य पैदास आणि त्यांची प्रकृती उत्तम राखण्यास मेथ्या उपयोगाला येतात. टेस्टोस्टेरॉन वाढवण्यासाठी मेथ्या रोज खाल्ल्या पाहिजेत. ६०० मिलिग्रॅम रोज याप्रमाणे २ आठवडे तरी सलग सेवन करणे योग्य.

 

Fenugreek-inmarathi
momjunction.com

१०. अश्वगंधा:

अश्वगंधा हा एक आयुर्वेदिक औषधी आहे. ह्याचे सेवन केल्यास वीर्य वाढीला उपयोग होतो. तसेच पुरुषातील कामयोग्य द्रव्य टेस्टोस्टेरॉन देखील वाढीस लागते. ह्याचे सेवन खालीलप्रमाणे करणे उत्तम:
५ ग्रॅम अश्वगंधा पावडर रोज ३ महिने घ्यावी.

 


ashwagandha-inmarathi
healthtoday.com

११. एल अर्जिनीन:

डॉक्टरांच्या संमतीने एल अर्जिनीन चा प्रयोग स्वतःवर करावा. ह्याने शुक्राणूंची पैदास योग्य पद्धतीने होते. त्यांची गती, आकारमान आणि क्वालिटी सुधारते. खालील पदार्थातून तुम्हाला एल अर्जिनीन मिळते.

● मटण आणि चिकन
● तेलयुक्त बिया
● भोपळ्याच्या बिया
● शेंगदाणे आणि शेंगभाज्या
● डाळी

 

protein_rich-inmarathi
cardio-health-research.com

ह्या सगळ्या पदार्थांचे सेवन केल्यास पुरुषांना वंध्यत्वापासून नक्कीच मुक्ती मिळेल. ह्याच बरोबर मद्याचे आणि सिगारेट चे प्रमाण कमी करून पूर्ण बंद करावे. ह्या सगळ्या उपायातून काहीही निष्पन्न न झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.


===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | Copyright © InMarathi.com | All rights reserved.
Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं हे अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?