' आजतागायत विज्ञानालादेखील “ही” ६ आव्हाने उलगडता आलेली नाहीत… – InMarathi

आजतागायत विज्ञानालादेखील “ही” ६ आव्हाने उलगडता आलेली नाहीत…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

हे जग अनेक रहस्यमयी गोष्टींनी भरलेलं आहे. जगभरातील उत्साही आणि सगळ्या रहस्यांचा पर्दाफाश करण्याचा ध्यास घेतलेले लोक सतत कुठल्या ना कुठल्या शोधमोहिमेवर जाऊन जगातील रहस्यांचा उलगडा करण्याचा प्रयत्न करीत असतात.

आपला भारत सुद्धा अनेक अद्भुत लोक, जागा आणि गोष्टी बाळगून आहे. ह्या अद्भुत गोष्टींवर जगभरातल्या अनेक वैज्ञानिकांनी प्रयोग केले, अभ्यास केला, निरीक्षणे केली. पण त्यांनाही ह्या रहस्यांचा उलगडा करणे जमले नाही.

आधुनिक विज्ञानाने सुद्धा ह्या रहस्यांपुढे गुडघे टेकले आहेत.

आज आपण अशाच काही रहस्यांबद्दल जाणून घेणार आहोत.

१) प्रल्हाद भाई मगनलाल जानी

 

Mysterious-Prahlad-Jani-marathipizza

 

एक निरोगी साधू, जे काहीही न खाता व्यवस्थित आरोग्य राखून आहेत. कदाचित ह्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहित असेल. जगातल्या अनेक लोकांनी ह्यांच्यावर रिसर्च केला आहे.

हे प्रल्हादभाई काहीही खात नाहीत. काहीही नाही म्हणजे काहीच नाही. अन्नाचा एक कण सुद्धा नाही.

जेव्हा दुसरं महायुद्ध संपत आलं होतं तेव्हा तेव्हा त्यांनी शेवटचं खाल्लं होतं. त्यानंतर त्यांनी अन्नाचा एकही कण पोटात घेतला नाही.

त्यांचा जन्म १९२९ मध्ये झाला असून वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी संन्यास घेण्यासाठी घर सोडले.

२००३ साली डॉक्टरांनी १० दिवस त्यांचे निरीक्षण केले पण १० दिवसांनंतर सुद्धा आश्चर्य वाटले की रोज फक्त १०० मिली पाणी घेऊन सुद्धा प्रल्हाद भाईंच्या सर्व शारीरिक क्रिया व्यवस्थित सुरु होत्या आणि आजही आहेत.

त्यांच्या ह्या Super natural शक्तीचे रहस्य आजवर कोणालाही कळू शकले नाही.

जगामध्ये ब्रीथेरिअन्स ( केवळ सूर्य आणि हवेवर जगणारे ) या विचार पद्धतीला मानणारे असंख्य लोक आहेत, या लोकांवर बऱ्याच डॉक्युमेंटरी तयार झालाय आहेत, खालील यूट्यूब लिंक जरूर पहा.

 

हे ही वाचा – “रात्रीच्या वेळी झाडाखाली झोपू नये” अंधश्रद्धा की विज्ञान? वाचा याचं शास्त्रीय उत्तर

२) प्रकाश उत्सर्जक घातक शक्ती – उत्तर प्रदेश

 

uttar-pradesh-mystery-marathipizza

 

उत्तर प्रदेश हे राज्य दाट लोकसंख्येसाठी प्रसिद्ध आहे. २००२ साली ह्या राज्याच्या काही भागात एका प्रकाश उत्सर्जक वस्तुमुळे अनेक लोकांना शारीरिक इजा झाली होती आणि ७ लोक ठार झाले होते.

अनेक लोकांच्या चेहऱ्यावर व हातांवर ओरखडे उमटल्याच्या खुणा होत्या.

पण आजवर कोणालाही कळू शकले नाही की हवेत उडणारी ती विचित्र वस्तु म्हणजे नेमकं काय होतं!

काही लोक म्हणतात की ती वस्तू म्हणजे aliens चे UFO होते. तर काही म्हणतात की ते शत्रू राष्ट्राचे विमान होते.

IIT – कानपुरच्या संशोधकांचे असे निदान आहे की वातावरणात झालेल्या अनियमित बदलांमुळे हिरव्या व निळ्या रंगाची ऊर्जा/ प्रकाश उत्सर्जित झाली.

पण हे परत का झाले नाही? हे एक न उलगडलेले कोडेच आहे.

 

३) Kongka- La : भारत चीन बॉर्डर वरचा UFO base?

 

kongka-la-pass-marathipizza

 

भारत व चीन च्या LOC (line of control) च्या क्षेत्रात Kongka La pass म्हणून एक जागा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तिथे अनेक विचित्र, अनाकलनीय आकृतींचे दर्शन झाले आहे.  कधी हवेत उडत्या तबकड्या, कधी alien प्राणी, तर कधी एखादे UFO!

जेव्हा भारतीय सैन्याला असे काही दिसले तेव्हा सुरुवातीला त्यांना ते चीनचे विमान किंवा ड्रोन आहे असे वाटले. पण अनेक वर्षात तिथे संशोधनासाठी गेलेल्या लोकांना आणि स्थानिकांना विचित्र अद्भुत गोष्टींचा अनुभव आला आहे. इतकेच नव्हे, ह्याच गोष्टींचा चीनला सुद्धा अनुभव आला आहे.

जेव्हा जेव्हा त्यांना असे काही दिसते, तेव्हा तेव्हा ते तिथला सैन्याचा बेस कॅम्प हलवतात. अमरनाथच्या यात्रेला गेलेल्यांना सुद्धा काही वर्षांपूर्वी त्या भागात aliens असल्याचे जाणवले होते. आसपासचे टुरिस्ट गाईड सांगतात की तिथे एक UFO base आहे.

४) जयगडच्या किल्ल्यामधील रहस्यमयी खजिना

 

jaigarth-fort-marathipizza

 

राजा अकबर हा त्याच्या उदार धार्मिकनीतीसाठी प्रसिद्ध होता. परंतु त्याच्या काही अधिकाऱ्यांना हे मान्य नव्हते. त्यांनी राजा विरुद्ध कट कारस्थान रचले.

पण राजाला हे कळल्यावर त्याने त्याच्या निष्ठावान राजा मानसिंहाला सोबत घेऊन ह्या कारस्थान्यांचा पाडाव केला आणि मानसिंह राजाला काबूलचा गव्हर्नर केले.

मानसिंहाने तेथे अनेक वर्ष राज्य केले आणि एक शहर वसवले जे आज आपण जयपूर म्हणून ओळखतो.

असे म्हणतात की राजा मानसिंहाने राजा अकबरापासून लपवून जयगड किल्ल्यात विहिरी खोदून त्यात अनेक जड जवाहिर व संपत्ती लपवून ठेवली होती. अनेक वर्षांनंतर आणीबाणीच्या काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी ह्या खजिन्यासाठी शोधमोहीम सुरु करण्याचा विचार केला.

जेव्हा हे पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो ह्यांना कळले, तेव्हा त्यांनी ह्या खजिन्यावर पाकिस्तानचाही हक्क आहे असा दावा केला.

त्यांनी पत्रात असे नमूद केले फाळणीपूर्वीच्या प्रत्येक संपत्तीवर पाकिस्तानचाही हक्क आहे. तर जयगडमध्ये काही संपत्ती सापडल्यास पाकिस्तानचाही एक भाग देण्यात यावा. ह्यावर इंदिरा गांधींनी बराच काळ काहीही उत्तर पाठवले नाही.

भारत सरकारचे म्हणणे आहे की जयगड किल्यात काहीही सापडले नाही. पण त्यानंतर ३ दिवस सेनेला मार्ग देण्यासाठी दिल्ली-जयपूर हायवे बंद करण्यात आला होता.

खरंच जयगड किल्ल्यात काही सापडले की नाही हे आजवर रहस्यच आहे.

 

५) छत्तीसगढमधील अद्भुत रॉक पेंटिंग

 

chttisgarh-rock-painting-marathipizza

 

chttisgarh-rock-painting-marathipizza01

 

काही महिन्यांपूर्वी छत्तीसगढच्या चमारा ह्या भागातील काही गुहांमध्ये १०००० वर्षांपूर्वीचे रॉक पेंटिंग्स सापडले. त्यात त्या काळातले प्राणी, जनावरे, त्यांचे राहणीमान, जनजीवन ह्या विषयी अनेक चित्रं आहेत.

पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे एका चित्रामध्ये alien च्या UFO चे चित्र होते. ह्यात एका चित्रात aliens माणसांना किडनॅप करून नेताना दाखवले आहे.

आजूबाजूच्या गावात राहणारी माणसे सांगतात की aliens दर महिन्याला माणसांना त्यांच्या UFO मध्ये किडनॅप करून नेत असत आणि ती माणसे कधीच परत येत नसत.

 

६) ज्वालाजी मंदिर – अखंड ज्योत

 

jwalaji-mandir-marathipizza

 

हिमाचल प्रदेशाच्या कांगडा जिल्ह्यामध्ये ज्वालाजी मंदिर स्थित आहे. हे मंदिर धरमशाला पासून ५५ किमी लांब आहे. ह्या मंदिरात कधीच न विझणारी ज्योत आहे जिला भक्त ज्वालाजी म्हणून मानतात आणि पूजा करतात.

ह्या मागे एक रंजक कहाणी आहे.

भगवान शंकर आणि सती ह्यांचा विवाह सतीचे वडील प्रजापती दक्ष ह्यांना मान्य नव्हता. एकदा जेव्हा दक्षाने मोठा यज्ञ करायचे ठरवले तेव्हा सर्वाना आमंत्रण दिले परंतु सती व शिवाला आमंत्रण दिले नाही. तरीही सती त्या स्थळी गेली पण दक्षाने शिवाचा अपमान केला.

हे सहन न झाल्याने सतीने क्रोधाने यज्ञकुंडात उडी घेतली. हे पाहून व्यथित आणि क्रोधीत होऊन भगवान शंकरांनी सतीचा देह घेऊन तांडव सुरु केले.

विश्वाचा विनाश होणार ह्या भीतीने भगवान विष्णू ह्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने सतीच्या देहाचे ५१ तुकडे केले. ते देहाचे भाग पृथ्वीवर जिथे पडले तिथे शक्तिपीठे आहेत अशी धारणा आहे.

तर ह्या ठिकाणी सतीची जिव्हा म्हणजेच जीभ पडली व तिथेच ज्वालाजी मंदिर बांधले अशी आख्यायिका आहे.

 

jwalaji-mandir-marathipizza01

 

मुघल शासक अकबराने त्याच्या राज्यात ही ज्योत विझवण्याचे अनेक विफल प्रयत्न केले.

आजही पुजारी न घाबरता ह्या ज्योतीमध्ये हात घालून तो दर्शनाला येण्याऱ्या भक्ताच्या डोक्याला लावतात. पण त्यांचा हात भाजत नाही.

ह्या ज्योतीच्या स्रोताबद्दल अनेक वेळा रिसर्च केले आहे परंतु कोणालाही तिचा उगम स्रोत सापडला नाही हे विशेष. आजही ज्वालाजी मंदिर हे रहस्यमय म्हणून ओळखले जाते.

असं म्हणतात जिथे विज्ञान उत्तर देऊ शकत नाही तिथे supreme power म्हणजेच देवाचा चमत्कार हेच उत्तर असते…

अनेक लोक कदाचित अश्या काही रहस्यमयी गोष्टींमुळेच देवाचं अस्तित्व मानत असावेत!

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?