'छोटी गल्लीही हुडकून काढणारं 'गुगल मॅप' माहिती कशी मिळवतं? जाणून घ्यायला हवंच

छोटी गल्लीही हुडकून काढणारं ‘गुगल मॅप’ माहिती कशी मिळवतं? जाणून घ्यायला हवंच

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

काही वर्षांपासून कोणीही त्यांच्या घराचा किंवा ऑफिसचा पत्ता फोनवर सांगताना “तुम्ही मला लोकेशन पाठवता का प्लिज ?” हे वाक्य आपसूकच आपल्या तोंडी येतं. आपल्याला आणि पुढच्या पिढीला या लोकेशनच्या आधारे कोणत्याही ठिकाणी पोहोचणं खूप अंगवळणी पडलं आहे.

जगाच्या पाठीवर कुठेही जा, जसं सूर्य, चंद्र आपल्यासोबतच असतात, तसं जगात कुठेही जा, गुगल मॅप हे आपल्याला इप्सित ठिकाणी बरोबर पोहोचवतं. तुमची एकही गल्ली, एकही वळण चुकू नये म्हणून गुगल मॅप हा तुम्हाला प्रत्येक वेळी सूचना देत असतो.

टर्न घ्यायच्या आधी ६०० मीटर अंतरावरून सूचना देणे, तुम्हाला पोहोचण्याच्या ठिकाणाचा सर्वात छोटा रस्ता शोधणे आणि काही सेकंदात तो सादर करणे या गुगलच्या काही सर्वोत्तम सुविधा म्हणता येईल.

‘गुगल मॅप’ हा सगळा कारभार कसं चालवत असेल? प्रत्येक वेळी रियल टाईम ट्रॅफिक अपडेट कसे देत असेल? असे प्रश्न ज्यांना पडले असतील त्यांच्यासाठी हा लेख महत्वाचा आहे.

 

 

आपल्याला योग्य मार्ग दाखवण्यासाठी गुगलने काही पार्टनर हाताशी ठेवले आहेत. ‘गुगल मॅप’द्वारे आपल्या समोर येणारी माहिती ही योग्यच असावी यासाठी गुगलकडे काही चेकपॉइंट सुद्धा आहेत. कोणते आहेत हे चेकपॉइंट्स?

१. मॅप पार्टनर्स: ‘बेस मॅप पार्टनर’ या प्रोग्राम अंतर्गत काही संस्थासोबत हात मिळवणी केली आहे. या संस्था गुगल ही नवीन जागांची माहिती जमा करत असते.

२. स्ट्रीट व्ह्यू: ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम म्हणजेच GPS च्या आधारे गुगल तुमच्या गाडीचे लोकेशन ठरवते आणि ‘स्ट्रीट व्ह्यू’ च्या आधारे रस्त्याची सध्याची स्थिती आपल्यासमोर आणते.

३. सॅटेलाईट: ‘गुगल अर्थ’ च्या आधारे गुगल मॅप हे सॅटेलाईट मधून दिसणारा व्ह्यू सुद्धा जोडून आपल्याला रस्ता शोधण्यास मदत करत असतं.

 

 

४. लोकेशन सर्विसेस: स्मार्टफोन्सने एकमेकांना शेअर केलेल्या लोकेशन्स चा सुद्धा पूर्ण एक्सेस गुगल मॅपला असतो.

५. गुगल मॅप मेकर्स: हा एक प्रोग्राम गुगल मॅपने सुरू केला आहे, ज्या मध्ये कोणीही आपला सहभाग नोंदवू शकतं. आपण भेट दिलेल्या किंवा माहिती असलेल्या, पण नाव न दिलेल्या जागांना ती व्यक्ती नाव देऊ शकते.

६. लोकल गाईड्स: जागेबद्दल माहिती पुरवणारे लाखो लोक गुगल मॅपने एकत्र आणले आहेत, ज्यांना ‘लोकल गाईड्स’ हे नाव देण्यात आलं आहे. गुगल मॅप वापरतांना My Contributions मध्ये जाऊन आपण आपल्या भागातील जागांची माहिती बघू शकतो.

आपण भेट दिलेल्या जागेबद्दल नेहमीच गुगल मॅप आपल्याला काही प्रश्न विचारत असतो, फोटो अपलोड करण्याची विनंती करत असतो. त्यामध्ये कित्येक लोक आपला सहभाग नोंदवून इतरांना मदत करत असतात. तुम्ही पुरवलेल्या माहितीचा किती लोकांना फायदा झाला हे सुद्धा गुगल मॅप वेळेवेळी आपल्याला सांगत असतो.

 

google maps inmarathi2

 

गुगल मॅपचा हा प्रचंड मोठा पसारा संभाळण्यासाठी गुगलने प्रत्येक देशात आपले प्रतिनिधी नेमले आहेत. इतकी मोठी यंत्रणा असतांना सुद्धा गुगल मॅपकडून काही वेळेस चुका होतात हे आपण बघितलं असेल.

याचं कारण हे आहे की, रोज कित्येक भागात नवीन रस्त्यांची कामं सुरू असतात, काही रस्ते, ट्रॅफिकचे नियम बदलले जातात. हे आमलात आणण्यासाठी गुगल मॅप त्यांना येणाऱ्या प्रत्येक फीडबॅकवर काम करत असते आणि प्रत्येक वेळी योग्यच रस्ता दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते.

‘रियल टाईम ट्रॅफिक अपडेट’ हे गुगल मॅपला सर्वोत्तम बनवणारं फिचर आहे. जुनं गुगल मॅप हे स्थानिक प्रशासनाने लावलेल्या ट्रॅफिक सेन्सर वर अवलंबून असायचं. आता मात्र ‘रडार’ पद्धतीमुळे प्रत्येक रस्त्याची जागा, वाहनांची गती हे सतत चेक करून गुगल मॅपच्या सर्वर वर तो डेटा अपलोड केला जातो.

एका जागेवरून दुसरीकडे पोहोचण्यासाठी एका व्यक्तीला लागणारा वेळ हा रेकॉर्ड केला जायचा आणि त्यावरून तो जाहीर केला जायचा. पण, ते फक्त हायवे वर शक्य होतं. छोट्या रोडचं काय?

 

google maps inmarathi3

 

छोट्या रोडचा प्रश्न सोडवण्यासाठी गुगल मॅप ने ‘क्राऊड सोर्सिंग’ हा एक नवीन प्रकल्प सुरू केला. अँड्रॉईड फोन वापरणारे आपण सगळे जेव्हा आपलं लोकेशन ‘ऑन’ करतो तेव्हा फोन मधून गुगल ला सिग्नल्स पोहोचत असतात. तुमच्या कारची गती ही गुगल मॅप ला कळत असते.

एखाद्या रोडवर जेव्हा गुगल मॅप लाल रंगांच्या स्वरूपात ‘ट्रॅफिक जॅम’ दाखवत असतो, तेव्हा ते यश फोनच्या सिग्नल्समुळे शक्य होत असतं. त्या जागेवर जितके थांबलेले सिग्नल्स तितका तो ट्रॅफिक जॅम चा लाल रंग गडद होत असतो.

जितक्या जास्त लोकांनी मोबाईल मधील लोकेशन्स ऑन ठेवले असतील तितकी त्या रूट वरची गुगल मॅपची माहिती ही योग्य असते. कारण, गाड्यांच्या हालचालींची गती सुद्धा गुगल सतत चेक करत असतो.

 

google maps inmarathi4

 

एखाद्या रस्त्याबद्दल जर का जास्त माहिती उपलब्ध नसेल तर त्या रस्त्याला करड्या रंगात मॅप वर दाखवलं जातं. २०१३ मध्ये गुगल मॅपने ‘वेझ’ या दिशादर्शक अँप ला सुद्धा खरेदी केलं आणि त्यानंतर एखाद्या मार्गावरील स्लोडाऊन, गतिरोधक यांची योग्य माहिती सुद्धा डॅश च्या स्वरुपात उपलब्ध केली जाऊ लागली.

गुगल मॅप हे पूर्णपणे जाहिरात नसलेलं अप्लिकेशन आहे. कंपनीचे संस्थापक सिर्जी ब्रिन आणि लॅरी यांनी १९९८ मध्ये गुगलची सुरुवात करतांना त्यांचा हा उद्देश लोकांसमोर मांडला होता: “जगाची माहिती ही जगातल्या प्रत्येक व्यक्तीला सहज उपलब्ध झाली पाहिजे.” गुगल मॅप हे या उद्देशाची परिपूर्ती करतांना आपण रोज बघत असतो.

गुगल मॅपमुळे आपल्या सर्वांचं आयुष्य सोपं झालं आहे यात वादच नाहीये. काही अनुभव हे वेगळे असू शकतात, पण त्याचं प्रमाण हे नक्कीच कमी असणार. आपण ही जितकी शक्य तितकी माहिती गुगल मॅपला देऊन इतरांना नकळत मदत करूया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?