' सचिन तेंडुलकरचा सल्ला नाकारून त्या दिवशी विरूने हा इतिहास रचला! – InMarathi

सचिन तेंडुलकरचा सल्ला नाकारून त्या दिवशी विरूने हा इतिहास रचला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

सचिन म्हणजे क्रिकेटचा देव. त्याचा आदर्श घेऊच क्रिकेटर होऊ पाहणारा प्रत्येक जण हातात पहिली बॅट धरतो. एवढंच काय, तर सचिनच्या वेळचे समकालीन क्रिकेटर देखील सचिनला डोळ्यासमोर ठेवूनच आपण खेळायचो असे म्हणतात,

यातच सचिनच्या महानतेचे दर्शन होते. नावाजलेल्या आणि सचिनला आदर्श मानणाऱ्या या क्रिकेटर्सपैकी एक क्रिकेटर म्हणजे आपण विरू अर्थात वीरेंद्र सेहवाग!

सचिनबद्दल बोलताना एकदा सेहवाग म्हणाला होता,

आज मी क्रिकेटर आहे तो केवळ सचिन तेंडूलकर मुळेच! तो नसता तर कदाचित मी या खेळामध्ये कधी आलोच नसतो, मी कधी बॅट उचललीच नसती!

 

sachin sehwag 4

हे ही वाचा – भारतीय क्रिकेटमधील “या” भन्नाट गोष्टी कदाचित तुम्हाला माहितच नसतील…

सचिनसोबत खेळायचे सेहवागचे स्वप्न होते आणि ते जेव्हा पूर्ण झाले तेव्हा त्याच्यासाठी आभाळ ठेंगणे झाले. हळूहळू सचिन-सेहवागची जोडी मैदानाच्या मैदानं गाजवू लागली. सचिन आणि सेहवाग मैदानावर एकत्र खेळत असले की क्रिकेटमध्ये कधी कोणता रेकॉर्ड होईल याचा नेम नसायचा.

सचिन म्हणजे संयमी खेळाडू तर सेहवागची शैली स्फोटक! सचिन प्रत्येक निर्णायक वेळी सेहवागला मार्गदर्शन करायचा आणि सेहवाग देखील त्याच प्रकारे खेळ करायचा.

आपण सचिनच्या तालमीतच फलंदाजी करायला शिकलो हे सांगताना सेहवागला कुठेही कमीपणा वाटत नाही यातच त्याचा नम्रपणा दिसून येतो.

इतकं असूनही त्याने कधी सचिनची शैली कॉपी केली नाही. त्याचा अंदाजच वेगळा होता. इतरांसारखं टूकुटूकु खेळण त्याला कधी जमलंच नाही आणि म्हणूंच भारतीय क्रिकेटमधील एक धडाकेबाज फलंदाज म्हणून त्याचं नाव प्रत्येक क्रिकेट रसिकांच्या मनामनात कोरलं गेलंय, तेही कायमचं!

 

sehwag in action

 

नेहमी सचिनचा सल्ला ऐकणाऱ्या अश्या या सचिनच्या आज्ञाधारी सहकाऱ्याने एकदा मात्र सचिनचा सल्ला ऐकला नाही. तो दिवस होता २९ मार्च २००४ चा..

पाकिस्तान सोबतच्या तीन कसोटी सामन्यांपैकी पहिली कसोटी मुलतानच्या मैदानावर २८ मार्च २००४ रोजी खेळवण्यात येणार होती. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजी स्वीकारली आणि सेहवाग नावाचे वादळ आपली किमया दाखवण्यासाठी सज्ज झाले.

पहिल्या चेंडू पासून सेहवागने गोलंदाजाना झोडायला सुरुवात केली होती. दिवसाचा खेळ संपला तेव्हा सेहवागच्या खात्यावर होत्या तब्बल २२८ धावा. दूसरीकडे सचिन खेळत होता ६० धावांवर आणि भारताची स्थिती होती पहिल्या दिवसअखेर ३५६ वर २ विकेट्स!

 

sachin-sehwag-marathipizza01

 

पहिल्या दिवशी घोंघावणारं सेहवाग नावाचं वादळ दुसऱ्या दिवशी पुन्हा नव्या दमानं मैदानात उतरलं. सेहवागला जणू कुठेतरी वाटलं की आपण ३०० धावांचा टप्पा ओलांडू शकतो. त्याने जर असं केलं असतं, तर तो ३०० धावा करणारा भारतीय इतिहासातील पहिला क्रिकेटर ठरला असता आणि त्या विक्रमाच्या दिशेने त्याची घौडदौड सुरु झाली.

हा हा म्हणता त्याने २५० च्या आकड्याला गवसणी घातली. त्याचा खेळ पाहून प्रेक्षकांना आपण टेस्ट नाहीतर वन डे मॅच पाहतोय असेच वाटत होते.

त्याच्या या केह्ली दरम्यान त्याने अनेक सिक्स मारले. त्याची घाई पाहून त्याचा सल्लागार सचिन त्याच्याजवळ गेला आणि म्हणाला,

जर परत सिक्स मारला तर मी तुला बॅटने मारेन. (हे सचिन हिंदीत बोलला.)

 

viru

 

शेवटी सचिन म्हणतो म्हटल्यावर सेहवागला ऐकणं भाग होतं. आता तो हळूहळू खेळू लागला. हळूहळू सेहवागच्या नावावर धावा जमा होत होत्या. अखेर तो २९५ धावांवर पोचला. आता कोणी भारतीयाने कधीही न केलेला भीम प्रकाराम करण्यासाठी त्याला केवळ ५ धावांची गरज होती.

सचिनने सांगितल्यानंतर त्याने एकही सिक्स मारला नव्हता हे विशेष!

दुसरा एखादा फलंदाज असता तर त्याने एक एक धावा काढून आपली सर्वोच्च धावसंख्या नोंदवली असती, पण हा सेहवाग होता, कामगिरी करायची ती तर धमाका करूनच ही गोष्ट त्याला स्वस्थ बसू देत नव्हती. तो आपल्या सल्लागाराकडे अर्थात सचिनकडे गेला आणि म्हणाला,

जर साकलेन आला तर मी सिक्स मारणार (हे देखील हिंदीतच म्हणाला बरं)

 

viru sachin

 

हा साकलेन म्हणजे पाकिस्तानचा गोलंदाज साकलेन मुश्ताक होय. तो जर बॉलींगसाठी आला तर मी सिक्स मारणार हे सेहवागने सचिनला कळवून टाकले.

 

saqlain-marathipizza

 

म्हणजे सचिनने त्याला सिक्स न मारण्यास बजावले होते, तो सल्ला त्याने धुडकावून लावला. सचिन देखील मंद हसला.

ही गोष्ट जर पाकिस्तानी कर्णधाराला कळली असती तर त्याने साकलेनला बॉलींग दिलीच नसती, पण शेवटी देवाच्या मनात जे होतं तेच घडलं आणि साकलेन बॉलींगसाठी आला.

सेहवाग जे बोलला तेच त्याने करून दाखवले. स्वत:ची विकेट धोक्यात घालून २९५ रन्स वर खेळत असताना त्याने साकलेनच्या बॉलवर सिक्स ठोकत ट्रिपल सेंच्युरी साजरी केली. सगळीकडे टाळ्यांचा कडकडाट झाला. इंडियन ड्रेसिंग रूम उभे राहून त्याचे कौतुक करू लागले.

३०९ धावा करणाऱ्या सेहवागच्या या खेळीमध्ये ३९ चौकार, ६ षटकारांचा समावेश होता मुख्य म्हणजे अवघ्या ३७५ चेंडूमध्ये त्याने ही खेळी साकारली. सचिन देखील त्याचे अभिनंदन करण्यास सरसावला.

 

sachin-sehwag-marathipizza04
=

 

हा सामना म्हणजे सचिन आणि सेहवाग दोघांसाठी यादगार ठरला. अपेक्षेप्रमाणे भारताने हा सामना आणि सिरीजही जिंकली. पण सगळ्यात महत्त्वाचा तोच क्षण ठरला जेव्हा एका भारतीयाने पहिल्यांदा ट्रिपल सेंच्युरी साजरी करत क्रिकेट इतिहासामध्ये आपल्या नावाची नोंद केली.

===

हे ही वाचा – क्रिकेटमधील हे ११ जबरदस्त रेकॉर्डस् तोडणं केवळ अशक्य मानलं जातं!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

 शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?