' कोरोना लसीचा काळा बाजार – या महत्वाच्या गोष्टींचा शहानिशा करा, यात अडकू नका – InMarathi

कोरोना लसीचा काळा बाजार – या महत्वाच्या गोष्टींचा शहानिशा करा, यात अडकू नका

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“कोरोना गेला का?” सध्या टीव्हीवर दिसणारे मोर्चे, मॉल्स मध्ये वाढलेली गर्दी, सर्रास मास्क न घालता फिरणारे लोक बघितले की असंच वाटतं. कोरोना जाईल तेव्हा जाईल; पण त्याची भीती मात्र कधीच निघून गेली आहे.

विविध देशात सुरू असलेले कोरोना लस बद्दलचे प्रयत्न बघितले की, लोक निर्धास्त झाले आहेत. “आता टेन्शन नाहीये, चला लोणावळा, खंडाळा फिरून येऊ” हे कधीच सुरू झालं आहे.

जनजीवन पूर्ववत येत आहे या गोष्टीचा आनंदच आहे. पण, लस आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी अजून काही महिने जाऊ द्यावे लागतील हे विसरून चालणार नाहीये.

कोणत्याही सरकार पुढे त्यांच्या देशातील ‘शेवटच्या’ व्यक्ती पर्यंत लस पोहोचवणे हे एक आव्हान असणार आहे हे नक्की. लस आल्यानंतर आपल्या नियोजन, वाहतूक यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांचा कस लागणार आहे हे नक्की.

 

covid vaccine inmarathi

 

कोरोना सोबत लढतांना आपण सगळे एकत्र होतो, एका दिशेने होतो. लस बाजारात आल्यानंतर एक दुसरी लढाई सुरू होईल ती म्हणजे कोरोनाच्या नावानं जास्तीत जास्त नफा कमवायचा आणि या ‘संधीचा’ व्यवसायिक फायदा करून घ्यायचा.

“पुन्हा अशी संधी मिळणार नाही” तद्दन व्यवसायिक लोकांची ही वाक्य ‘मास्क’, सॅनिटायझर विक्रीला ठेवण्यापासूनच ऐकायला मिळत होते.

आता तर त्यांच्या हातात हुकुमाचा एक्का असणार आहे. “मी जास्त स्टॉक करेन, कमतरता निर्माण करेन आणि पाहिजे त्या किमतीत लस विकेन आणि नंतर लसीची दुसरी आवृत्ती मी तयार करेन.” या गोष्टी बंद दरवाज्यांमागे बोलणं सुरू झालं आहे. हे आम्हीच नाही तर अमेरिकन मीडिया सुद्धा बोलतंय.

नेमकं काय झालं?

फायझर या अमेरिकेच्या कंपनी ने कोरोना लस तयार करण्यात यश मिळवलं आहे हे आपण सगळेच जाणतो. ९५% प्रभावी असणाऱ्या या लसचं लसीकरण अमेरिकेत सुरू झालं आहे.

लस लोकांपर्यंत पोहोचवण्यात येणारा पहिला अडथळा, घोटाळा समोर आला आहे. आपल्याला असं वाटतं की, असं फक्त भारतातच होतं. पण, तसं नाहीये. विकृत मनोवृत्ती ही जगभरात सारखीच असते.

अमेरिकेतील काही फ्रॉड कंपन्यांनी लोकांची वैयक्तिक माहिती घेऊन कोरोना दूर करण्याची उपचार पद्धती लोकांना देण्यास सुरुवात केली आहे.

सरकार या सर्व प्रकरणावर लक्ष ठेवून आहे. पण, तरीही या लोकांच्या तावडीत काही लोक सापडले आहेत ही दुर्दैवाची गोष्ट आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर संस्था FBI ने दिलेल्या अहवालात हे सांगितलं आहे की –

“कोरोना लस मिळवण्यासाठी ऑनलाईन कॅम्पेन चालवले जात आहेत. क्लिक करा, लस मिळवा अश्या आशयाचे मेसेज, ईमेल्स लोकांना पाठवले जात आहेत. लोक त्यांना बळी पडत आहेत आणि आपली वैयक्तिक माहिती या कंपन्यांना देत आहेत.

 

scam corona inmarathi

 

घोटाळेबाज टोळी या कोरोनाच्या नावाखाली लोकांना फसवत राहणार आहेत. प्रत्येकाने सतर्क राहणं अत्यंत आवश्यक आहे. ”

आतापर्यंत सात कंपन्यांना कोरोनाच्या अवैध औषध विकण्यासाठी आणि साठा करून ठेवण्यासाठी फेडरल ट्रेड कमिशन या संस्थेने नोटीस दिली आहे.

या सात कंपन्यांनी कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांना त्यांचं मान्यता प्राप्त नसलेलं औषध दिलं होतं. चुकीच्या औषधांची विक्री आणि सेवांसोबतच काही घोटाळेबाज हे तुमच्या मोबाईल चा पासवर्ड हॅक करायचा प्रयत्न सुद्धा करू शकतात. आपल्या हातात फक्त सतर्क राहणं इतकंच आहे.

सतर्क कसं रहावं? काय करू नये?

ज्यावेळी सगळयांकडेच अर्धवट माहिती असते आणि सर्वांनाच ती जाणून घ्यायची असते, तेव्हा घोटाळा होण्याची सर्वात जास्त शक्यता असते.

जगभरातील मीडिया आता कोरोना लसीच्या बाबतीत कोणत्याही दाव्यांना बळी पडू नका असं सांगत आहे. त्यासाठी आपण सर्वांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे :

१. तब्येतीची तक्रार असल्यास तुमच्या वैयक्तिक किंवा फॅमिली डॉक्टरशी संपर्क साधा.

२. कोणत्याही “तातडीच्या सेवा” पुरवणाऱ्या फोन कॉल्सला तुमची माहिती जसं की घरचा पत्ता, बँक खाते अशी माहिती त्या फोन वर देऊ नका.

 

fake call inmarathi

 

३. कोरोनाची लस ही सर्वप्रथम ही आरोग्य कर्मचाऱ्यांना पुरवली जाणार आहे ज्यांनी या मधल्या काळात खूप मेहनत घेतली आहे. याची पूर्ण माहिती सरकार सर्व वर्तमानपत्रात जाहीर करणार आहे.

४. प्रत्येक व्यक्तीला २ डोसच्या गरजेपेक्षा सध्या उत्पादन होणाऱ्या लस ची संख्या कमी आहे. हे घोटाळा करणाऱ्या टोळी ला माहीत असणार आहे. त्यामुळे ते तुम्हाला त्वरित पैसे भरा, लस घेऊन जा असं फोनवर, रस्त्यात, हॉस्पिटल च्या आसपास भेटून म्हणू शकतात.

“आज शेवटचा दिवस आहे, उद्यापासून महाग आहे” असे दावे ते करतील. सिनेमा थिएटर वर जशी सिनेमाची तिकिटं एकेकाळी ‘ब्लॅक’ ने विकली जायची, तसा प्रकार लसीच्या बाबतीत सुद्धा होऊ शकतो. घाई करू नका, विचार करूनच कोणालाही पैसे द्या. पैश्या पेक्षाही चुकीची औषध घेतल्याने शरीराला होऊ शकणारा आजार टाळा.

कोरोना सुरू झाल्यापासूनच काही टोळ्या या अशी कामं करायला एकत्र आली आहेत.

काही टोळी अशी पद्धत सुद्धा वापरतात की, “आम्ही इन्श्युरन्स कंपनी मधून बोलत आहोत. कोरोना पासून वाचण्यासाठी तुमचा इन्श्युरन्स कव्हर वाढवायचा असेल तर ही माहिती आम्हाला द्या. अन्यथा, तुमचा इन्श्युरन्स अवैध ठरवला जाईल.”

असे फोन लगेच कट करा किंवा रेकॉर्ड करा. तुम्ही सुद्धा फसू नका आणि इतरांची सुद्धा मदत करा. एकच सोर्स ठरवा आणि तिथूनच माहिती घ्या.

कोरोनाशी सामना करून जनता आधीच त्रस्त झाली आहे. यातून सुटका मिळवून देण्याचं आमिष दाखवून काही लोक स्वतःचे खिसे भरून घेण्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार आहेत. काळजी घ्या.

 

covid 2 inmarathi

 

या लेखाचा उद्देश तुम्हाला घाबरवणे नसून तुम्हाला संभाव्य धोक्यापासून सतर्क करणे हा आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?