' हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

हृदय निरोगी राहण्यासाठी दररोजच्या आहारात हे सात मसाले हवेतच!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

मेंदू जर शरीराचा सिपीयू असेल तर हृदय हे या सिपीयू पासून इतर सर्व भागांना पावर सप्लाय करणारे युनिट आहे.

हृदयाचे काम फक्त रक्तशुद्धीकरण आणि रक्त पुरवठा करणे जरी असले तरी सगळे महत्त्वाचे जीवनसत्त्वे आणि पोषक तत्वे हे याच रक्तातून सर्व शरीरभर पुरवले जात असतात.

भारतात आज याच हृदयाच्या रोगाने ग्रस्त होणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यासोबत त्याच आजाराने होणारा मृत्यूदर सुद्धा वाढत चालला आहे.

 

heart attack inmarathi

 

टाइम्स ऑफ इंडिया ने केलेल्या सर्व्हे नुसार १९९० पासून २०१६ पर्यंत हृदयाच्या विकाराने मृत्यू झालेल्यांची संख्येत ३४% ने वृद्धी झाली आहे.

१९९० साली प्रति एक लाख लोकसंख्येत १५५ मृत्य हा हृदय विकाराने झालेला होता तोच २०१६ ला वाढून प्रति लाख २०९ एवढा झाला आहे.

एकूणच हृदय विकाराकडे बघितले असता ते जडण्याचे मुख्य कारण म्हणजे जंक आणि फास्ट फूडचे प्रमाणाबाहेर सेवन, चिंता, तणाव आणि अनहेल्दी लाइफस्टाइल हे असल्याचे दिसून येते.

तज्ञांच्या मार्गदर्शनानुसार केवळ हेल्दी लाइफस्टाइलने ह्रदय विकारांचे प्रमाण हे ५०% ने कमी करता येते.

आपल्या आरोग्याला जेवढी आपली लाईफस्टाइल जबाबदार आहे तेवढंच आवळा डाएट सुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे लाईफस्टाइल सोबतच आपल्या आहारात केलेला बदल सुद्धा आपल्या आरोग्याला परिणामकारक असतो.

 

lifestyle inmarathi

 

नुकतेच झालेल्या अभ्यासानुसार मसाले आणि मसाल्याचे पदार्थ हे केवळ चव वाढवण्यासाठी नव्हे तर इतर आरोग्यदायी कारणासाठी पण उपयोगी आहेत.

रिपोर्टनुसार मसाले हे अँटी ऑक्सिडेंट युक्त असतात जे बॅड कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त असतात. आणि हृदयाचे विकार हे सर्वाधिक याच बॅड कोलेस्ट्रॉलमुळे होतात हे आपल्याला माहीतच आहे.

आज पाहूया असेच काही मसाले जे चवी सोबत आरोग्याला आणि विशेष करून हृदयासाठी उपयुक्त आहेत.

 

१) हळद :

 

tuermeric inmarathi

 

आपल्या स्वयंपाकघरात असलेलं खात्रीपूर्वक असे औषध. जखम झाली किंवा रक्त निघायला लागले की त्यावर पहिलं औषध म्हणजे हळद हे हमखास असतं. हळद म्हणजे मसाला एक आणि फायदे अनेक.

हळदीत अँटी सेप्टिक,अँटी इन्फलेमेंट्री आणि अँटी बॅक्टरीयल गुणधर्म आहेत जे अपचन, दाताचे विकार, पिरेड क्रॅम्प सारख्या त्रासावर परिणामकारक आहे.

रिसर्च मध्ये आढळून आले आहे की हळदी मध्ये असलेले करकमीन (Curcumin) हे अँटी ऑक्सिडेंट बॅड कोलेस्टेरॉल (LDL) कमी करते. कोलेस्ट्रॉल कमी झाल्याने हृदयाची कार्यक्षमता कैक पटीने वाढते.

 

२. लसूण :

 

garlic inmarathi

 

स्वादासोबत लसूण रक्ताभिसरण संस्थेला तंदुरुस्त ठेवायचे काम करते. लसूण रक्ताला पातळ करण्याचे काम करते त्यामुळे रक्तात कुठे गाठी तयार होत नाहीत.

शिवाय रक्तप्रवाह सुरळीत राहिल्याने उच्च रक्तदाब सारखे विकार सुद्धा जडत नाहीत.

लसूण मध्ये सुद्धा कोलेस्ट्रॉलला प्रतिबंध घालण्याचे तत्व असल्याने हृदयाचा त्याला थेट फायदा होतो. तसेच शरीरात अँटी ऑक्सिडेंटची लेव्हल सुद्धा स्थिर राहते.

 

३. आले :

 

ginger inmarathi

 

हृदय विकाराचा झटका येण्याला मूळ कारण म्हणजे रक्त पुरवठा करणाऱ्या मार्गात अडथळे येणे. आणि या मार्गात अडथळा येण्याचे एक कारण म्हणजे ब्लड क्लॉटिंग.

आल्यात असणारे तत्व जिंजेरोल (Gingerol) हे धमन्यांना स्वस्थ ठेवण्याचे काम करते. ज्यामुळे रक्तवाहिन्या रिलॅक्स राहतात आणि रक्तप्रवाह सुरळीत राहतो. ज्याने हृदयाचे ९०% विकार हे दूर राहतात.

 

४. काळी मिरी :

 

black pepper inmarathi

 

काळी मिरीचा आहारात वापर करणाऱ्या लोकांवर एक रिसर्च करण्यात आला. त्यानुसार या लोकांमध्ये हार्ट अटॅक आणि स्ट्रोक यांचा धोका कमी आढळला. शिवाय या लोकांचा मृत्यूदर हा १३% ने कमी होता.

मिरी मध्ये असलेले पिपरिन (piperine) हे तत्व फ्री रँडीकल्समुळे होणारे जास्तीचे ऑक्सिडेशनमुळे होणारे डॅमेज कंट्रोल करते आणि पेशींना सुरक्षित ठेवते.

 

५. धने :

 

coriender powder inmarathi

 

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सच्या एका रिसर्च नुसार धने हे मधुमेह आणि कोलेस्ट्रॉलच्या लोकांसाठी एक पारंपरिक औषध आहे.

रिसर्च मध्ये दिसून आले की धने हे बॅड कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी करायला मदत करते. अभ्यासाच्या दरम्यान आढळले की धन्याचे बिया हे कोलेस्ट्रॉल आणि डायग्लिस रॉईड या हृदयाला घातक असलेल्या घटकांना अटकाव घालण्याचे काम करते.

 

६. दालचिनी :

 

dalchini inmarathi

 

दालचिनी मध्ये अँटी ऑक्सिडेंट आणि अँटी बॅक्टरीयल प्रॉपर्टी हे भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत.

इंडियन मॅटारिया मेडिका या संस्थेने तर दालचिनीला एका हर्बल ड्रगच्या वर्गात वर्गीकृत केले आहे आणि हे ड्रग कार्डियोवस्कीलर इफेक्ट साठी वापरले जाते.

रिसर्च सांगते की दालचिनी चांगल्या कोलेस्टेरॉल (HDL-C) वाढवून लिपिड प्रोफाइल मध्ये सुधारणा घडवून आणते. तसेच बॅड कोलेस्ट्रॉल, डायग्लिसरॉईड यांना कमी करण्याचे काम करते.

 

७. वेलची :

 

elaichi inmarathi

 

भारतीयांच्या चहा मध्ये हमखास असणारी गोष्ट. चहाच काय प्रत्येक गोड पदार्थात वेलची ही असतेच असते. वेलची मध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, झिंक, कॅल्शियम आणि आयर्न हे मोठ्या प्रमाणात असते.

शिवाय रक्त पातळ करणारे घटक मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने शरीरात ब्लड क्लॉटिंग सारख्या घटनांना आळा घातला जातो.

तर, हे आहेत काही मसाले जे भारतीय स्वयंपाक घरात हमखास उपलब्ध असतात.

शक्यतो जास्तीत जास्त यांचा वापर करून आपण आपल्या शरीराला स्वस्थ ठेवू शकतो शिवाय हृदय विकारांना आपल्या पासून चार हात लांब ठेवू शकतो.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?