' एक आकर्षक ‘स्माईल’ बदलू शकते तुमचं आयुष्य, कसं? हे वाचा – InMarathi

एक आकर्षक ‘स्माईल’ बदलू शकते तुमचं आयुष्य, कसं? हे वाचा

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

किती तरी कवींची प्रेरणा, जगातील अत्यंत उपयुक्त सौंदर्य मिळवण्याचे साधन, सगळ्या रोगांना आणि विकारांना आपल्या जवळ फिरकू न देणारे औषध, इतके सगळे गुण कुण्या एकाच गोष्टीत आहेत हे जर तुम्हाला सांगितलं तर पटेल का? पण होय हे अगदी अगदी खरं आहे आणि हे कोणतंच चमत्कारिक औषध नाही तर आहे आपलं “हास्य”.

हास्य लहान बाळाचं असो, सुंदर मुलीचं असो वा कोणत्याही अनोळखी व्यक्तीचं असो…आपल्या मनात घर करतच. एका संशोधनानुसार, दिवस वाईट जात असताना एखाद्या अनोळखी व्यक्तीने सुद्धा आपल्याकडे छान हसून बघितल्यास आपल्याला स्फूर्ती आणि नवीन प्रेरणा मिळते.

 

 

नैसर्गिकरित्या यायला हवं ते हसू आणण्यासाठी आजकाल लाफिंग क्लब्जची संकल्पना जन्माला आलीये. सकाळी बागेत सुद्धा म्हाताऱ्या माणसांना मोठमोठ्याने हसताना आपण बघतो  पण हे सगळं कशासाठी? साधं हसूच तर आहे, मग हा अट्टाहास का मुळी? कारण आहे. ते असं की आपल्या आरोग्यकरीता हसणं अत्यंत गरजेचं आहे आणि ते नेमकं का आहे ते पाहूया.

 

 

 

१) वेदनांपासून मुक्ती – अजब वाटेल, पण वेदना होत असताना खळखळून हसल्याने वेदना काही प्रमाणात कमी होतात.

हसल्यामुळे आपल्या शरीरात “एंडोर्फीन्स – फील गुड हॉर्मोन्स आणि नैसर्गिक पेन किलर तत्व” निर्माण होतात. यामुळे वेदनांवरून लक्ष वळून आनंदावर लक्ष केंद्रित होतं आणि यामुळे काही प्रमाणात वेदना कमी होतात.

२) रक्तदाबावर नियंत्रण – हसल्याने हृदयाची रक्ताभिसरण गती वाढते आणि शरीरात ऑक्सिजन भरपूर प्रमाणात शोषलं जातं ज्यामुळे हृदयातील स्नायू रिलॅक्स होतात. ज्यांना ब्लडप्रेशरचा त्रास आहे त्यांनी रोज १०-१५ मिनिटे खळखळून हसायलाच हवे.

३) रोगप्रतिकारशक्तीत वाढ – हसल्याने इम्युनिटी सेल्स, रोगसंसर्ग टाळण्यासाठी उपयुक्त अँटिबॉडीज यांची योग्य प्रमाणात निर्मिती होते. ज्यामुळे आपली रोगप्रतिकारशक्ती बळकट होते आणि सगळे रोग आपल्यापासून अत्यंत लांब राहतात.

 

 

४) ताण नाशक – शरीराला ताणाविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेले सगळे घटक हसल्याने निर्माण होतात. आधी सांगितल्याप्रमाणे हसल्यामुळे एंडोर्फीन्स अर्थात फील गुड हॉर्मोन्स, डोपमीन आणि सेरिटोनिनसारख्या हॉर्मोन्सची निर्मिती होते. त्यामुळे ताण तणाव घालावण्यास अत्यंत मदत होते आणि आपण नैराश्यपासून दूर राहतो.

५) तारुण्य वाढतं – सतत येणाऱ्या ताणामुळे, टेन्शनमुळे, आपल्या कपाळावरील आठयांमुळे आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडू लागतात, पण हसल्याने चेहऱ्याचा व्यायाम होतो व चेहऱ्याचे स्नायू टवटवीत राहतात. 

६) मूड छान होतो – कधी कधी कामाची, वातावरणाची, प्रदूषणाची मरगळ आपल्यावर ठळकपणे दिसू लागते. या मरगळीमुळे आपण आजारी सुद्धा पडतो, पण हसल्याने हे सगळे त्रास नाहीसे होतात. त्याचमुळे “लाफ्टर इज दि बेस्ट मेडिसिन” ही म्हण इंग्रजी भाषेत प्रसिद्ध आहे.

 

 

७) सुदृढ नाती – जी व्यक्ती सतत प्रसन्न असते, जिच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असत, प्रतिकूल परिस्थिती जी व्यक्ती रडत बसत नाही, हसत हसत परिस्थितीचा सामना करते ती व्यक्ती सगळ्यांनाच आवडते. अशा माणसांना भरपूर मित्र मैत्रिणी असतात.

रडक्या, चिडचिड्या आणि लहान सहन संकटांपासून खचून जाणाऱ्या व्यक्तीपेक्षा अशा प्रेरणादायी व्यक्तीच्या सहवासात राहणं सगळ्यांनाच आवडतं. म्हणून हसत राहा.

८) आत्मविश्वास वाढतो – हसल्याने आपल्यात जे जे हार्मोनल बदल होतात त्यामुळे आपला ताण कमी होतो. आपण एखाद्या परिस्थितीला घाबरत असू किंवा आपण स्वतःवर शंका घेत असू, तर हसल्याने हे सगळे कमी होतं. आपण स्वतःबद्दल अत्यंत सकारात्मक विचार करू लागतो व आपल्याच सहवासात प्रसन्न राहू लागतो.

९) कॅलरीज घटणे – आश्चर्यकारक वाटेल पण हसल्याने कॅलरीज बर्न होतात हे एक संशोधन आहे. दिवसातून किमान १०-१५ मिनिटे खळखळून हसल्याने ४० कॅलरीज जळतात. ज्यांना वजन कमी करायचंय त्यांनी नक्की मनावर घ्या व रोज खळखळून हसा.

 

actress eating inmarathi

 

१०) आयुष्य वृद्धिंगत होते – कोणाला भरपूर जगावंसं वाटत नाही? आणि हास्याने हे शक्यही आहे. हसल्याने आपलं हृदय, मेंदू, मन सगळंच सुदृढ राहतं, रोगप्रतिकारशक्ती वाढते. संशोधनानुसार, जी माणसं खळखळून हसतात ती इतरांपेक्षा काही वर्षे अधिक जगतात.

११) ऍब्स मेंटेन राहतात – हसण्याचा हा फायदा सगळ्यांना भरपूर आवडेल. हसल्याने पोटाच्या स्नायूंवर ताण पडतो, ज्यामुळे त्या स्नायूंची आकुंचन आणि रुंदीकरणाची क्रिया घडू लागते. यामुळे पोटावरची चरबी कमी होऊन, पोट सपाट होतं व ऍब्स मेंटेन राहतात.

१२) ट्युमर्स – स्ट्रेसमुळे आपल्या शरीरात जे जे काही हार्मोनल बदल होतात, त्यामुळे कधी कधी इतका नकारात्मक प्रभाव पडतो, की आपल्या शरीरात ट्युमर्स सुद्धा तयार होतात. हसल्याने शरीरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे निघून जाते, स्ट्रेस कमी होतो आणि नकारात्मकतेमुळे होणाऱ्या ट्युमर्सचा धोका कमी होतो.

इतके सगळे फायदे कळल्यावर सुद्धा थोडासा वेळ काढून, इतकं स्वस्त असलेलं कोणताही कर नसलेलं हसू आपण आपल्या जीवनात आणू शकत नसू तर आपलंच नुकसान आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?