' अडखळत बोलणारा इंजिनियर ते अख्या जगाचा हास्यसम्राट, वाचा असामान्य प्रवास! – InMarathi

अडखळत बोलणारा इंजिनियर ते अख्या जगाचा हास्यसम्राट, वाचा असामान्य प्रवास!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

बालपण – आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सुवर्णकाळ. तेव्हा आपण सगळेच सारखे असतो. काही वर्षांनी येतात मार्क्स, मग येतं तुमचं चांगलं किंवा साधारण दिसणं.

तुमच्या सवयी, बोलण्याची पद्धत यामधून तुमचं वेगळेपण लोकांना जाणवायला लागतं. काहींना ते आवडतं तर काहींना ते खटकतं.

घरात तुमचं भरभरून कौतुक होत असतं तर घराबाहेर नव्याने ओळखू लागणारे काही व्यक्ती तुम्हाला नावं ठेवत असतात. लहानपणी मिळालेल्या वागणुकीचा परिणाम हा आयुष्यभरासाठी आपल्या मनावर होत असतो.

कोणतीही व्यक्ती ही आत्मविश्वासाने तेव्हाच वागू शकते जेव्हा त्याच्या कलेवर, कर्तृत्वावर कोणीतरी विश्वास दाखवतो.

लहानपणी नाव ठेवण्यात आलेल्या कित्येक लोकांनी आपल्या जिद्दीवर आपलं करिअर यशस्वी करून दाखवलं आहे. रोवन अटकिन्सन म्हणजेच ‘मिस्टर बिन’ यांचं नाव या श्रेणीत अग्रस्थानी घ्यावं लागेल.

 

rowan atkinson inmarathi

 

आपल्या चेहऱ्यावरील हावभावाने लोकांना हसवणाऱ्या या गुणी कलाकाराचा जन्म एका मध्यम वर्गीय कुटुंबात झाला होता.

अडखळत बोलण्याच्या आजारामुळे पूर्ण बालपण लोकांचे टोमणे ऐकण्यात गेलेल्या या कलाकाराने तारुण्यात आल्यावर जो काही ‘मेक ओव्हर’ केला आहे तो पाहून त्याला लहानपणी त्रास देणाऱ्या त्याच्या मित्रांनी अक्षरशः तोंडात बोटं घातली होती.

वयाने लहान असणारा रोवन किती दिवस दुर्लक्ष करणार होता? काही दिवसांनी तो शांत झाला आणि स्वतः मध्येच मग्न राहू लागला. कोणासोबत जास्त बोलायचा नाही.

त्याच्या शिक्षकांना सुद्धा त्याच्याबद्दल काळजी वाटत होती. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या शिक्षकाने हे बोलून सुद्धा दाखवलं आहे की –

“रोवन ने आम्हाला सर्वांना चूक ठरवलं आहे. आम्हाला हा शांत मुलगा एक शास्त्रज्ञ होईल असं अजिबात वाटलं नव्हतं. कॅमेरा समोर इतका चांगला अभिनय करू शकेल याचे काहीच लक्षणं त्याने बालपणी दाखवली नव्हती.

अडखळत बोलणारा रोवन हा इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग मध्ये पदवीधर होऊन टीव्हीवर काम करू शकेल असं आम्हाला कधीच वाटलं नाही.”

 

rowan 2 inmarathi

 

विनोदी भूमिका करण्याची आवड असणाऱ्या रोवनने सुरुवातीला एक ‘कॉमेडी ग्रुप’ जॉईन केला होता. टीव्ही शो साठी ऑडिशन देतांना कित्येक चॅनल्सने रोवन यांना नाकारलं होतं.

पण, रोवन यांनी कधीच धीर सोडला नाही. स्वतःच्या अभिनय क्षमतेवर त्यांना संभ्रम नव्हता. लोकांना हसवणे ही त्यांची सर्वात आवडती गोष्ट होती.

विनोदी पात्र लिहिणे आणि त्या टोन मध्ये बोलणं हे रोवन यांनी सुरू केलं. कोणत्याही पात्राचे संवाद बोलतांना रोवन हे अजिबात अडखळत बोलायचे नाही.

पदव्युत्तर अभ्यास करतांना ‘रोवन अटकिन्सन’ यांनी एक असं पात्र तयार केलं जे की दिसायला विचित्र होतं. शब्दाविना बोलणारं होतं. इतिहासात घडत होता…’मिस्टर बिन’ या पात्राने जन्म घेतला होता.

‘रोवन अटकिन्सन’ यांना इतर शोज मुळे प्रसिद्धी तर मिळाली होती. पण, त्यांना जगभरात ओळख दिली ते ‘मिस्टर बिन’ या पात्रानेच. रोवन अटकिन्सन हे रातोरात स्टार झाले होते.

आजवरच्या त्यांच्या आयुष्यात आलेले अडथळे, लोकांनी मारलेले टोमणे यांचा शेवट करण्यासाठीच ‘मिस्टर बिन’ हे पात्र त्यांना सुचलं असावं.

 

mr.bean inmarathi

 

हिरो सारखी शरीरयष्टी नसतांना, हँडसम चेहरा नसताना सुद्धा एक व्यक्ती केवळ अभिनयाच्या जोरावर लोकांचा इतका आवडता अभिनेता होऊ शकतो हे रोवन अटकिन्सन ने सिद्ध करून दाखवलं होतं.

आज रोवन हे जगातील सर्वात लोकप्रिय विनोदी अभिनेत्यांपैकी एक आहेत.

रोवन अटकिन्सनच्या या प्रवासातून एक सिद्ध होतं की, यशस्वी होण्यासाठी तुमची मेहनत, धीर न सोडण्याची वृत्ती ही सर्वात महत्वाची असते.

“आपल्याबद्दल कोण काय विचार करतो ?” या विचाराला आपण जितकं कमी महत्व देऊ तितकं आपल्यासाठी चांगलं आहे. अडथळे तर प्रत्येकालाच असतात त्यांच्यावर मात करून जो पुढे जाईल त्याबद्दलच लोक जाणून घेण्यास लोक उत्सुक असतात.

६ जानेवारी १९५५ मध्ये इंग्लंड मधील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या आणि तीन भावात सर्वात लहान असलेल्या रोवन अटकिन्सन यांनी करून दाखवलेलं काम हे सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे.

क्विन्स कॉलेज मध्ये पदवीचं शिक्षण घेतांना पहिल्या वर्षी मिळालेल्या स्केच बनवण्याच्या संधीचं रोवन यांनी सोनं केलं होतं.

रिचर्ड कर्टीस या लेखका सोबत केलेल्या स्केच तयार करण्याच्या कामामुळे रोवन यांच्या करिअर ला दिशा मिळाली होती. बीबीसी रेडिओ मध्ये काम करताना मिळालेले ३ कॉमेडी शो हे सुद्धा तितकेच महत्वाचे होते असं म्हणता येईल.

 

rowan atkinson 2 inmarathi

 

रोवन अटकिन्सन यांनी आपल्या सिनेमा करिअरची सुरुवात केली ती जेम्स बॉण्डच्या ‘नेवर से नेवर’ या सिनेमाने केली. या सिनेमाचं नाव रोवन यांच्या करिअरचं वर्णन करण्यासाठी सुद्धा खूप समर्पक आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?