' हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी, वाचा उपयुक्त माहिती… – InMarathi

हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणं ठरेल आरोग्यदायी, वाचा उपयुक्त माहिती…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

===

खरंतर डिंक आपल्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त पदार्थ आहे. परंतु त्याच्यात असणाऱ्या उष्णतेच्या गुणधर्मामुळे तो फारसा खाल्ला जात नाही.

आपल्याकडे उष्ण हवामान असल्यामुळे उष्ण पदार्थ टाळले जातात. आणि तसंही फक्त डिंकाला कोणतीही चव नाही. त्याच्यावर प्रक्रिया केल्यावरच तो इतर पदार्थांबरोबर खाल्ला जातो.

खाण्याचा डिंक हा वनस्पतींपासून मिळवला जातो. शक्यतो बाभूळ झाडावरचा डिंक हा सर्वोत्कृष्ट मानला जातो. बाभूळ म्हणजे सुबाभूळ नव्हे तर काटे बाभूळ.

गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र ,पंजाब या राज्यांमध्ये बाभळीच्या झाडावर जो डिंक तयार होतो तो उन्हात वाळवला जातो. आणि तोच डिंक खाण्यासाठी वापरतात.

बाभळीच्या झाडाचे औषधी गुणधर्म या डिंका मध्ये उतरतात. हा डिंक पाण्यामध्ये विरघळतो. म्हणूनच शेळीचे दूध सकस मानले जाते कारण हे प्राणी बाभाळीचा पाला खातात.

हिवाळ्यात हवा थंड असते. या काळात मात्र डिंक खाल्ला तर त्याचा त्रास होत नाही म्हणूनच मग डिंकाचे लाडू खाण्याचा हिवाळा हा ऋतू मानला जातो.

या काळात घरोघरी पारंपारिक पद्धतीने लाडू बनवले जातात. डिंक आणि ड्रायफ्रूट्स म्हणजेच बदाम, काजू, बेदाणे, अक्रोड, पिस्ता, खोबरं खसखस, भोपळा आणि खरबुजच्या बिया, आणि शुद्ध देशी तूप व गूळ वापरून लाडू बनवले जातात.

 

dink laddoo inmarathi

 

हे लाडू अत्यंत आरोग्यपूर्ण असतात. आज-काल विकतही डिंकाचे लाडू मिळतात. पण ते खात्रीपुर्वक चांगले मिळत असतील तर जरूर घ्यावेत.

डिंकाचे महत्व :

आयुर्वेदानुसार डिंकाचे अनेक फायदे आहेत. शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी डिंक मदत करतो. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला, ताप याच्या साथी येतात.

त्यामुळे अशक्तपणा येतो, रोगप्रतिकारक शक्ती कमी होते हे जर थांबवायचं असेल तर डिंक खाणे महत्त्वाचे आहे. डिंकाचे शक्तीवर्धक लाडू खाल्ल्याने सर्दी, ताप सारखे आजार होण्याची शक्यता कमी असते.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

याचाच अर्थ डिंक आजारपणापासून आपल्याला दूर ठेवतो. त्याचप्रमाणे डिंकामध्ये कॅल्शियम आणि विटामिन डी यांचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे ज्या लोकांना सांधेदुखी, गुडघेदुखी आहे त्यांनी हे डिंकाचे लाडू खाणे गरजेचे असते.

सांध्यांमध्ये वंगण घालण्याचं काम डिंक करते. सांध्यांमधील वेदना कमी करणे, पाठदुखी कमी करण्यासाठी देखील डिंक उपयुक्त आहे.

म्हणजेच हाडे मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम आणि प्रथिने मिळवण्याचे डिंक हा महत्त्वाचा स्रोत आहे.

 

bones inmarathi

 

सध्या covid-19 मुळे विटामिन डी ची लेव्हल चांगली ठेवणे गरजेचे बनले आहे. कारण ज्यांना कोरोनाची लागण होते त्यात विटामिन डी महत्त्वाची भूमिका बजावतो.

आणि ज्यांचे विटामिन डी कमी आहे त्यांना त्रास होत आहे. यासाठी डिंकाचे लाडू खावेत. एक लाडू खाल्ल्यास त्यापासून बऱ्याच तासांपर्यंत ऊर्जा मिळते. कारण त्यात साजूक तूप आणि शक्तिवर्धक ड्रायफ्रूट्स देखील घातलेले असतात.

त्यामुळे सगळ्यांनी हा डिंकाचा लाडू खाल्ला पाहिजे. लहान मुलांसाठी तर हा डिंकाचा लाडू एक एनर्जी फूडच आहे.

मुलं जेव्हा खेळून येतात त्यावेळेस त्यांना लगेच डिंकाचे लाडू खायला द्यावा त्यामुळे त्यांना शरीराला आवश्यक घटक त्वरित मिळतात. किंवा थंडीत शाळा असते तेव्हा छोट्या सुट्टी साठी हा डिंकाचा लाडू त्यांच्या डब्यात असावा.

किंवा आजकाल शाळा आणि घर यामध्ये इतकं अंतर असतं की एक-दीड तास लागतो. त्यामुळे बसमध्ये खाण्यासाठी देखील हा लाडू उपयोगी पडेल. तरीही हा डिंकाचा लाडू कोणा कोणाला जास्त उपयुक्त आहे ते आता पाहू!

गर्भवती महिला :

 

pregnant women inmarathi

 

गर्भवती स्त्रियांनी डिंकाचा लाडू खाल्ला पाहिजे. कारण डिंक हा कॅल्शियम आणि प्रोटीनचा स्त्रोत म्हणून ओळखला जातो. हाडे मजबूत होण्यासाठी आणि पाठदुखी कमी होण्यासाठी याचा उपयोग होतो.

स्तनदाई माता :

ज्या स्त्रिया नुकत्याच माता बनल्या आहेत आणि ज्या बाळांना स्तनपान देतात अशा स्त्रियांनी डिंकाचे लाडू खाल्ले पाहिजेत. पारंपारिक दृष्ट्या डिंकाचे लाडू अशा स्त्रियांना दिले जातात.

कारण त्यामुळे तिच्या शरीरात दूधवाढ चांगल्या प्रकारे होते. स्तनपान करणार्‍या माताना एनर्जीची गरज असते. ती एनर्जी त्यांना डिंकापासून मिळते आणि डिंकाचे उपयुक्त गुणधर्म बाळाला आपोआप मिळतात.

ज्येष्ठ नागरिक :

 

senior-citizens-inMarathijpg

 

अनेक ज्येष्ठ नागरिकांना गुडघेदुखीचा त्रास असतो. तसेच बऱ्याच जणांचे सांधे ही दुखतात. वयोमानापरत्वे शरीरातील कॅल्शियम कमी होते. हाडे ठिसूळ बनतात.

म्हणून या ज्येष्ठ नागरिकांनीदेखील कॅल्शियम आणि प्रोटिनयुक्त डिंकाच्या लाडवाचा समावेश आपला आहारात करावा.

ताप सर्दी सारख्या संसर्गजन्य त्रस्त व्यक्ती :

ज्या लोकांना वारंवार सर्दी तापासारखे छोट्या-मोठ्या आजारांनी संसर्ग होतो, त्यांनी शरीराची ताकद वाढवण्यासाठी डिंकाचे लाडू खावेत. ज्या लोकांना फुप्फुसाचा आजार आहे त्यांनादेखील डिंक उपयुक्त आहे.

फुप्फुस ताकदवान बनण्यासाठी डिंक उपयोगी पडतो.

डिंकाचा लाडू किती प्रमाणात खावा :

डिंकाच्या लाडवात डिंक तूप आणि इतर पौष्टिक घटक आहेत अर्थात तसे ते खूपच पोषक आणि आरोग्यवर्धक आहेत.

तरीही कुठल्याही गोष्टीचे अतिसेवन चांगले नाही. त्यामुळे दिवसातून फार तर एक ते दोन लाडू खाल्ल्यास ते शरीराला फायदेशीर आहेत. पण याच्या पेक्षा जास्त लाडू खाल्ल्यास डिंकातल्या उष्णतेचा त्रास होऊ शकतो.

तसेच ज्यांना डायबिटीज आहे त्या लोकांनी देखील कमी गुळ घालून लाडू खावा. परंतु त्यात साखर घालू नये. कारण साखरेपेक्षा गुळ कितीतरी पट अधिक शरीराला उपयुक्त आहे.

gondh inmarathi

 

डिंकाचे लाडू बनवण्याची कृती जर किचकट वाटत असेल किंवा लाडू बनवण्याइतका वेळही नसेल तर मग डिंक कसा खावा? असा प्रश्न पडू शकतो. यावेळेस डिंक साजूक तुपात तळून घ्यावा आणि त्याची पावडर करून ठेवावी.

ज्यावेळेस आपण दूध घेतो त्यावेळेस तयार केलेली डिंक पावडर आणि गुळ पावडर मिक्स करून दुधात घालावी आणि ते दूध प्यावे.

चहाच्या ऐवजी हे ड्रिंक घेतल्यास नक्कीच फ्रेश वाटेल आणि डिंकाचे फायदे ही मिळतील.

आजकाल बेकरी आयटम, आयुर्वेदिक औषधे, सौंदर्य उत्पादने, फिझी एनर्जी ड्रिंक्स, आईस्क्रीम, इत्यादीमध्ये डिंकाचा वापर होतो. असा हा बाभळीच्या झाडावरील बहुगुणी डिंक. निदान हिवाळ्यात तरी याचा समावेश आपल्या आहारात करावा.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?