' पेटून उठलेल्या क्रांतिकारकाने “जालियानवाला बाग” क्रौर्याचा घेतला होता असा बदला! – InMarathi

पेटून उठलेल्या क्रांतिकारकाने “जालियानवाला बाग” क्रौर्याचा घेतला होता असा बदला!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

इंग्रजांनी जेवढे वर्षे भारतावर राज्य केले, आणि त्या काळात जितके अगणित अत्याचार केले. त्यापैकी जालियानवाला बाग हत्याकांड ही घटना म्हणजे इंग्रजांच्या निर्दयीपणाचा कळस आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील काळी घटना म्हणावी लागेल.

बैसाखी सारख्या शुभ दिनी १३ एप्रिल १९१९ ला तब्बल २०,००० निरपराध भारतीय जालियानवाला बागमध्ये जमले होते. संध्याकाळी ५:३० वाजता जनरल डायरने या बागेचा एकमेव बाहेर जाण्याचा रस्ता बंद केला आणि बागेमध्ये जमलेल्या निष्पाप जीवांवर त्याने बेछुट गोळीबार करण्याचा आदेश दिला.

त्यादिवशी तब्बल १५०० लोकांचा नरसंहार झाला. त्यात वृद्ध, लहान मुले आणि स्त्रिया देखील होत्या.

 

jaliyanwala-baugh-marathipizza

 

याच नरसंहारामध्ये उधम सिंग नावाचा एक २० वर्षीय अनाथ तरुण देखील होता. जो कसाबसा स्वत:चा बचाव करत या हत्याकांडातून जिवंत बाहेर पडला. पण त्याच दिवशी त्या मुलाच्या मनात बदल्याचा वणवा पेटला. आपल्याच बांधवांची रक्ताने माखलेली शरीरं पाहून त्याच्या अंगाचा थरकाप उडाला होता. त्याच दिवशी त्याने ठरवले,

“या कृत्याचा बदला घ्यायचा, मग त्यासाठी जीव गेला तरी बेहत्तर”

उधम सिंगांचा जन्म २६ डिसेंबर १८९९ रोजी पटियाला मधील सुनम येथे झाला. त्यांचे जन्म नाव शेर सिंग असे होते. त्यांना एक मोठा भाऊ देखील होता. अवघ्या ७ वर्षांचे असताना त्यांच्या डोक्यावरून आई बापाचे छत्र हरवले. त्यानंतरचे जीवन त्यांनी केंद्रीय खालसा अनाथालयामध्ये व्यतीत केले.

येथेच त्यांना नवीन नाव मिळाले ते म्हणजे ‘उधम सिंह’! १९१७ साली त्यांच्या वडील भावाचे देखील निधन झाले आणि उधम सिंग पूर्णपणे एकाकी पडले.

पुढे दोन वर्षांनी त्यांनी जालियानवाला बागेतील नरसंहार अनुभवला. त्याचा बदला घेणे हेच त्यांच्या जीवनाचे उद्दिष्ट ठरले आणि येथूनच एक क्रांतिकारी म्हणून त्यांची वाटचाल सुरु झाली. पुढे अमेरिकेत जाऊन त्यांनी गदर पार्टीमध्ये प्रवेश घेतला. तेथील क्रांतिकारी वातावरणात त्यांना अधिकच स्फुरण चढले. तेथे त्यांनी कार्यकर्ता म्हणून अनेक लढयांमध्ये भाग घेतला.

 

udham-singh-marathipizza

हे ही वाचा – इंग्रजांच्या अपमानामुळे खुन्नस खात जगाने तोंडात बोट घालावं असे “ताज”महाल बांधले!

१९२७ साली भगत सिंहानी त्यांना भारतात बोलावून घेतले. त्यांची आज्ञा शिरसावंद्य मानत २५ अन्य सहकाऱ्यांसोबत काही पिस्तुल घेऊन त्यांनी भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्याच वेळी अनधिकृतपणे शस्त्रे भारतात आणल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आणि सुमारे ५ वर्षांसाठी त्यांना तुरुंगात डांबले.

याच काळात जालियानवाला बागेत नरसंहार घडवून आणणारा जनरल डायर स्वर्गवासी झाला. जणू जनरल डायरची हत्या दैवाने उधम सिंगांच्या हातून होईल असे लिहिलेच नव्हते. तुरुंगातून सुटल्यावर ते सुनम या आपल्या मूळगावी परत आले. पण तेथे ब्रिटीश पोलीस त्यांना त्रास देऊ लागले.

शेवटी कंटाळून ते अमृतसर येथे आले आणि तेथे ‘राम मोहम्मद सिंग आझाद’ हे नाव धारण करून राहू लागले.

 

udham-singh-marathipizza01

 

दिवसांमागून दिवस जात होते आणि क्रांती लंडचे विचार उधम सिंगाना स्वस्थ बसू देत नव्हते. पुढे ते काश्मीर आणि तेथून १९३० च्या सुमारास इंग्लंड मध्ये गेले. अत्याचाऱ्यांच्या देशात जाऊनच आपला बदला पुर्ण करण्याचे त्यांनी मनोमन ठरवले होते. जालियनवाला बागेतील ती घटना रोज त्यांच्या डोळ्यासमोर तरळायची आणि ते दु:खी कष्टी व्हायचे. आपल्या बांधवांच्या हत्येचा बदला घेण्याची संधी ते शोधत होते.

अखेर १३ मार्च १९४० रोजी ती संधी चालून आली.

त्या दिवशी लंडनमधील कॅस्टॉन हॉल  येथे इस्ट इंडिया कंपनीची एक सभा होती. त्यावेळी मायकल ओ डॉयर उपस्थित राहणार होता. जनरल डायर तर मेला होता, पण त्याच्या जागी मायकल ओ डॉयरला यमसदनी पाठवून त्या रक्तरंजित कृत्याची परतफेड करायची असे उधम सिंहानी ठरवले.

कारण १९१९ साली म्हणजे जेव्हा जालियनवाला बाग हत्याकांड झाले तेव्हा मायकल ओ डॉयर पंजाबचा जनरल होता. त्याने देखील जनरल डायरला पाठींबा दिला होता. म्हणजेच जनरल डायर प्रमाणे तो देखील या नरसंहाराला कारणीभूत होता.

 

michle-o'dwyer-marathipizza

 

कॅस्टन हॉलमध्ये मायकल ओ डॉयर सभेला संबोधित करण्यासाठी उभा राहिला आणि सभेमध्ये बसलेल्या उधम सिंहानी आपल्या जॅकेटमधून शिताफीने पिस्तुल काढीत, सलग ५-६ गोळ्या मायकल ओ डॉयरवर झाडल्या आणि आपल्या बांधवांच्या नरसंहाराचा बदला घेतला.

हे कृत्य करून ते पळाले नाहीत. उलट हसत हसत त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या हवाली केले, कारण त्यांच्या आयुष्याचे ध्येय आता पूर्ण झाले होते.

ज्या गोष्टीसाठी गेली कित्येक वर्षे ते आसुसलेले होते, त्या गोष्टीची त्यांनी स्वत:च्या हस्ते पूर्तता केली होती.

 

udham-singh-marathipizza02
r3dd.it

 

३१ जुलै १९४० रोजी इंग्लंडच्या Pentonville तुरुंगामध्ये क्रांतीकारी उधम सिंह यांना फाशी देण्यात आली आणि भारतीय स्वातंत्र्यलढ्यात वेगळ्या पद्धतीने योगदान देणाऱ्या या क्रांतीकारकाचे नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदवले गेले.

 

udham-singh-marathipizza03

हे ही वाचा – चाफेकर बंधूंचे नाव इंग्रजांना सांगणाऱ्या २ फितुरांचा ‘असा’ धाडसी बदला घेण्यात आला होता..

भारताच्या इतिहासातील एका अत्यंत दुर्दैवी घटनेच्या नराधमांना शिक्षा देण्यासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणारा हा थोर क्रांतिकारी पंजाब प्रांत वगळता देशाच्या इतर जनतेसाठी अजूनही ‘अज्ञात’ आहे याची खंत वाटते.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?