'ख्रिसमस ट्रीचा कोणाला फारसा माहीत नसलेला रोचक इतिहास तुम्ही वाचायलाच हवा!

ख्रिसमस ट्रीचा कोणाला फारसा माहीत नसलेला रोचक इतिहास तुम्ही वाचायलाच हवा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

ख्रिसमस जवळ आला की दरवर्षी दुकानं ‘ख्रिसमस ट्रीच्या’ सजावटीने अजूनच उठून दिसतात. सध्या लोकप्रिय झालेल्या ‘मॉल्स’ मध्ये ख्रिसमस साठी होणारी सजावट ही खरंच बघण्यासारखी असते.

मॉल मध्ये असलेली प्रकाशयोजना, झगमगाट यामुळे कित्येक लोक आपल्याला तिथे सेल्फी काढताना नक्की दिसतील. ख्रिसमस नंतर लगेचच येणारं नवीन वर्ष हे या सणाचा उत्साह अजूनच वाढवणारं असतं.

‘मेरी ख्रिसमस अँड हॅप्पी न्यू इयर’ या शुभेच्छांनी दरवर्षीचा शेवटचा आठवडा हा आनंदात जात असतो.

 

xmas inmarathi

 

ऑफिस असो किंवा घर प्रत्येक ठिकाणी ख्रिसमस साठी ‘ख्रिसमस ट्री’ आणण्यासाठी लगबग सुरू असते. मागील काही वर्षात कॉन्व्हेंट शाळेच्या वाढलेल्या प्रमाणामुळे ख्रिसमसला मिळणाऱ्या सुट्ट्या सुद्धा जास्त दिवस असतात.

त्यामुळेच या दरम्यान कित्येक लोक बाहेर फिरायचा सुद्धा प्लॅन करताना दिसतात. घरातच जास्त वेळ गेलेलं हे वर्ष ख्रिसमस येईपर्यंत बरंच नॉर्मल होत आहे हे एक समाधान आहे.

भारतात एक गोष्ट फार छान आहे की, कोणताच सण हा फक्त त्या धर्मातील लोकांपुरता नसतो. तो सण प्रत्येकाचा असतो. स्माईलचा आकार कमी जास्त असेल.

पण, प्रत्येक जण या दिवसात एका वेगळ्याच आनंदात वावरत असतो. वैश्विक झालेल्या या सणाच्या एका महत्वाच्या पैलू बद्दल जाणून घेऊयात.

ख्रिसमस ट्रीचं काय महत्व आहे?

ख्रिश्चन हा वेगळा धर्म म्हणून उदयास यायच्या आधीपासून वर्षभर हिरवेगार राहणाऱ्या झाडांचं लोकांना आकर्षण होतं. हिवाळ्यात कित्येक लोक हे आपलं घराच्या भिंती, दरवाजे, खिडक्यांची सजावट करायचे.

काही देशांमध्ये वर्षभर हिरवं राहणारं झाड हे भूत, पिशाच्च आणि आजारपण यांना दूर नेतं अशी मान्यता होती. २१ किंवा २२ डिसेंबर यापैकी हा सर्वात छोटा दिवस असतो हे आपल्याला माहीतच आहे.

सूर्य उत्तरायणात गेल्याने हा बदल होतो आणि अतिप्राचीन मान्यतेनुसार या वेळी सूर्याचा प्रभाव कमी होतो आणि त्याची काळजी घेण्यासाठी हिवाळा येतो.

इजिप्त लोकांच्या मान्यतेनुसार, त्यांच्या ‘Ra’ या देवतेच्या संक्रांती नंतरच्या आजारपणातून झालेल्या मुक्ती नंतर इजिप्तचे लोक हे त्यांचं घर हिरव्यागार झाडांनी सजवायचे.

Ra या देवाने ही मृत्यूवर केलेली मात होती ज्यासाठी ही सजावट या काळात केली जायची. रोमन लोक त्यांनी मान्य केलेल्या Saturnalia ज्याला की ते ‘कृषी देवता’ मानतात तिच्या स्वागतासाठी घर हे हिरव्यागार झाडाने सजवलं जायचं.

हीच प्रथा उत्तर युरोप मध्ये सुद्धा Celts या देवतेच्या स्वागतासाठी घर हिरव्या झाडांनी सजवायचे असा इतिहास आहे.

‘ख्रिसमस ट्री’ ला सजवण्याची सुरुवात झाली ती १६ व्या शतकातील मार्टिन ल्युथर यांच्यापासून. त्यांनी सर्वात पहिल्यांदा एका झाडावर मेणबत्त्या लावून त्याला प्रकाशमान केलं.

 

martin luther inmarathi

 

हिवाळ्यातील संध्याकाळी प्रार्थना स्थळी जाताना त्यांना हिरव्यागार झाडांमधून ताऱ्यांचा प्रकाश आल्याचं मनमोहक दृश्य दिसलं. त्यांना ते त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा दाखवायचं होतं.

त्यासाठी त्यांनी घरात एक झाड आणलं आणि त्याच्या फांदीवरून मेणबत्ती लावल्या आणि ते मनमोहक दृश्य पुन्हा उभं केलं. ही ‘ख्रिसमस ट्री’ ला घरात आणण्याची ही खरी सुरुवात समजली जाते.

जर्मन लोकांनी सुरू केलेली ही प्रथा अमेरिकन लोकांना मान्य करण्यास जवळपास २०० वर्ष लागली. १७४७ मध्ये अमेरिकेत स्थायिक झालेल्या काही जर्मन लोकांनी ही प्रथा सुरू केली होती.

पण, ही प्रथा अमेरिकन लोकांनी १८४० मध्ये मान्य केली. फक्त ‘ख्रिसमस ट्री’ नाही तर ख्रिसमस बद्दलच्या कित्येक प्रथा या अमेरिकन लोकांनी खूप उशिरा मान्य केल्याची नोंद आहे.

कित्येक जर्मन लोकांना अमेरिकेत या काळात विनापरवानगी सजावट करण्यासाठी शिक्षा झाल्याची सुद्धा नोंद आहे.

इंग्लंड मधील लोकांनी सुद्धा ‘ख्रिसमस ट्री’ घरात लावण्याची पद्धत ही १८४६ पासून आमलात आणली आहे. व्हिक्टोरिया राणी आणि त्यांनी लग्न केलेल्या जर्मन राजकुमार यांच्या लग्नानंतर ही प्रथा इंग्लंड मध्ये सुरू झाली.

‘लंडन न्यूज’ मध्ये या परिवाराचा आलेला फोटो हा आजही संग्रही ठेवण्यात आला आहे. या फोटो नंतर ‘ख्रिसमस ट्री’ हे इंग्लंड आणि अमेरिका मध्ये सुद्धा लोकप्रिय झालं.

१८९० पर्यंत ख्रिसमस साठी वेगवेगळे दागिने सुद्धा जर्मनी मध्ये तयार होऊ लागले आणि अमेरिकेत विकायला येऊ लागले.

ख्रिसमस ट्रीच्या उंचीवरून सुद्धा त्या काळात स्पर्धा असायची. युरोपियन लोकांना कमी उंचीचे झाड चांगले वाटायचे तर अमेरिकन लोकांना छतापर्यंत उंचीचे ख्रिसमस ट्री आवडायचे.

 

xmas tree in america inmarathi

 

२० व्या शतकापासून संपूर्ण जगात ख्रिसमस ट्रीला दागिने किंवा लाईट्स ने सजावट करायची पद्धत सुरू झाली आणि त्यांना एक वेगळीच चकाकी आली.

हळूहळू हे ख्रिसमस ट्री सर्व इंग्लिश देशांच्या रस्त्यावर सुद्धा दिसू लागले आणि त्याच्या प्रकाशात तिथे स्थायिक झालेले भारतीय सुद्धा न्हाऊन निघू लागले.

१९७९ हे फक्त असं एक वर्ष होतं जेव्हा अमेरिकेच्या नॅशनल ख्रिसमस ट्रीला लायटिंग लावण्यात नव्हत आलं त्याचं कारण हे होतं की त्यावर्षी अमेरिकेतील काही नागरिकांना इराण मध्ये कैद करून ठेवण्यात आलं होतं.

वॉशिंग्टन मधील वूडीनविले येथे जगातील सर्वात उंच म्हणजे १२२ फुट उंचीचं आणि ९१ वर्ष जुनं ख्रिसमस ट्री असल्याची नोंद आहे. १९२३ मध्ये ‘व्हाईट हाऊस’ मध्ये सर्वात पहिल्यांदा ख्रिसमस ट्री प्रकाशमान करण्यात आल्याची नोंद आहे.

प्रत्येक देशात नॅशनल ख्रिसमस ट्री असोसिएशनची स्थापना करण्यात आली. ख्रिसमसच्या कित्येक महिन्यांआधीच ही कमिटी या नियोजनाचं काम सुरू करायची.

ख्रिसमस ट्रीला मोठं होण्यासाठी साधारणपणे ६ वर्षांचा काळ द्यावा लागतो. जगभरातील ५० राज्यातील शेतात ख्रिसमस ट्रीला वाढवलं जातं आणि नोव्हेंबर महिन्यात त्यांना व्यवस्थित कट करून रिटेल आऊटलेट्स पर्यंत पोहोचवलं जातं.

 

xmas tree 2 inmarathi

 

एक एकर जागेत जवळपास १००० ख्रिसमस ट्री लागू शकतात. देवदार या वृक्षापासून तयार होणारं ख्रिसमस ट्री हे काही ठिकाणी त्याच्या नैसर्गिक स्वरूपात कट करून वापरलं जातं तर काही ठिकाणी त्याची हुबेहूब प्रतिकृती तयार केली जाते.

आज कित्येक घरात ख्रिसमस ट्रीच्या आसपास भेटवस्तू ठेवल्या जातात ज्या त्या घरातील लहान मुलं ख्रिसम च्या दिवशी उघडत असतात. २४ डिसेंबर ला हे सर्वसाधारणपणे घरात प्रकाशमान केलं जातं जो की सर्वात ऍडम आणि इव्ह यांचा ‘फिस्ट डे’ म्हणून सुद्धा साजरा केला जातो.

काही वर्षांपूर्वी ‘ख्रिसमस ट्री’ आणि ‘ख्रिसमस पिरॅमिड’ या दोन वेगवेगळ्या गोष्टी ख्रिश्चन परिवारात सजवल्या जायच्या. आता या दोन्ही गोष्ट एकत्र येऊन फक्त ख्रिसमस ट्रीला सजवलं जातं.

आशिया मध्ये ख्रिसमस ट्रीचं आगमन हे २० व्या शतकात झाल्याची नोंद आहे. चीन, जपान मधून सुरुवात झालेल्या प्रथेला सुरुवातीला विविध प्रकारच्या पेपर्स ने सजवलं जायचं आणि नंतर त्यामध्ये बदल होत गेले.

१९३० मध्ये सर्वात पहिल्यांदा ख्रिसमस ट्रीचं कृत्रिम स्वरूप अमेरिकेतून जगासमोर आलं. त्यानंतर १९६० मध्ये एल्युमिनियम आणि PVC प्लास्टिक ने तयार करण्यात आलेले ख्रिसमस ट्रीसुद्धा बाजारात उपलब्ध होऊ लागले.

वाहतूक करण्यासाठी सोपे असल्याने कृत्रिम झाडांना जगभरात खूप लोकप्रियता मिळाली.

ज्या देशात नैसर्गिक रित्या देवदार झाड हे लागू शकत नाही त्यांना कृत्रिम पद्धतीच्या या झाडाने आपला आनंद साजरा करायला सुरुवात केली.

ख्रिसमस ट्रीमुळे घराचं बदलून जाणारं स्वरूप हे आपणही परत यावर्षी अनुभवण्यासाठी आपण सज्ज होऊया. लहान मुलांच्या आनंदात आपणही सहभागी होऊया.

 

santaclaus inmarathi

 

ही कामना करूया की, यावर्षी ‘सँटा’ त्याच्यासोबत कोरोनाचा समूळ नाश होण्यासाठी आपल्या वैज्ञानिकांना देण्यासाठी योग्य तो फॉर्म्युला घेऊन येईल आणि सर्वांना पुन्हा निखळ हसवेल.

आमच्या टीम कडून ख्रिसमसच्या अडव्हान्स मध्येच सर्वांना शुभेच्छा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?