' मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

मोबाईल स्लो झालाय? मनस्ताप करण्यापेक्षा हे घ्या फोनचा स्पीड वाढवण्याचे जबराट फंडे

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

चटपट कामे करण्याचा हा जमाना, त्यामुळे त्यातील उपकरणं देखील तशीच. मोबाईल – एका स्क्रीन वर बोटं फिरवून काही सेकंदात मोठाली कामं उरकण्याचं साधन. स्मार्ट फोन मुळातच आपलं काम सोपं करण्यासाठी डिझाईन केलेले असतात.

अँड्रॉईड फोन घेतो तेव्हा सुरुवातीला त्याचा स्पीड कमाल असतो, पण जसजसा आपण फोन वापरतो, त्यात डेटा जमा करत जातो, आपला फोन स्लो होतो. कधी कधी त्याची गती इतकी कमी होते आणि तो इतका हँग होतो, की आपल्याला ऐन घाईच्या वेळी फोन करायला ४-५ मिनिटे घेतो. तेव्हा आपला नुसता मनस्ताप होतो.

यावरही उपाय आहेत. आपल्या फोनला इतकं स्लो होऊ न देता आपण त्याची गती नेहमीच पूर्वीसारखी कशी राखू शकतो याचा काही टिप्स बघूया.

 

using mobile inmarathi

 

१) अॅप अनईनस्टॉल करा – आपल्याला एखाद्या अॅपची कधीतरी खूप गरज असते, पण नंतर ते अॅप आपल्या फोन मध्ये नुसतंच पडून असतं. ज्यामुळे आपल्या फोनची स्पेस आणि स्पीड दोन्ही कमी होते.

आपल्या फोन मध्ये असे कुठले वापरात नसणारे अॅप असतील, तर ते सगळ्यात आधी फोन मधून काढून टाका. याने स्पीड वाढेल, बॅटरी लवकर संपणार नाही आणि मोबाईल मध्ये जागा पण उरेल.

२) डेटा सेव्हर – आपल्या फोनचा डेटा सेव्हर मोड ऑन करा. या फिचरमुळे डेटा वाचवण्यासाठी आपला फोन इतर अॅपचा बॅकग्राऊंड डेटा बंद करतो. त्यामुळे ती प्रोसेस बंद झाली, की फोनचं चार्जिंग, स्पीड आणि स्पेस फार काळ टिकून राहते.

 

mobile data saver inmarathi

 

३) गुगल क्रोमचे डेटा सेव्हर – फोन व्यतिरिक्त क्रोममध्ये सुद्धा डेटा सेविंग मोड असतो. तो ऑन करा. यामुळे जेव्हा तुम्ही काही सर्च कराल तेव्हा गुगल आपसूकच तुम्हाला कॉम्प्रेस केलेले पेज दाखवेल. ज्यामुळे इंटरनेट डेटा कमी लागून ब्राऊसिंग स्पीड वाढेल.

हे करण्यासाठी, क्रोमच्या उजव्या बाजूस वरती दिलेल्या तीन डॉट्स वर क्लिक करा, त्यानंतर सेटिंग्ज मध्ये जाऊन डेटा सेव्हर सुरु करा.

४) बॅकग्राऊंड डेटा डिसेबल करा – आपल्या फोनमध्ये हवामान, अलार्म, वेळा, क्लीनर्स, असे अनेक ऍप बॅकग्राऊंडमध्ये सतत कार्य करत असतात. त्यामुळे आपला फोन स्लो होतो. सगळ्यात आधी हे बॅकग्राऊंड ऍप बंद करा.

यासाठी – ऍप्स मध्ये जाऊन, ज्या ऍपचा डेटा बंद करायचा आहे ते ऍप निवडा आणि तिथे दिलेल्या “बॅकग्राऊंड डेटा” वर क्लिक करून तो बंद करा.

५) कॅश (cache) क्लीअर करा – कॅश क्लीअर केल्याने फोनचा महत्वाचा डेटा अजिबात डिलीट होणार नाही. फक्त काही टेम्प्ररी फाईल्स आणि अनावश्यक कचरा डिलीट केला जाईल. त्यामुळे थोड्या थोड्या काळानंतर हे करणे आवश्यक आहे.

कॅश क्लीअर करण्यासाठी – अॅप इन्फो मध्ये जाऊन स्टोरेज वर क्लिक करा आता प्रत्येक अॅप ओपन करून “क्लीअर कॅश” वर क्लिक करा.

 

 

६) होम स्क्रीन क्लीअर करा – आपल्या फोनमध्ये लाईव्ह वॉलपेपर, ऑटो अपडेट होणारे अॅप ज्याप्रमाणे सिस्टम स्लो करतात त्याचप्रमाणे होम स्क्रीनवर एकापेक्षा अनेक विंडोज सुरु असल्या आपला फोन स्लो होतो. त्यामुळे प्रोसेसिंग मध्ये अडथळे निर्माण होतात. म्हणून होम स्क्रीन वर जास्त गजबज होऊ देऊ नका.

७) ऑटो -सिंक (auto-sync) बंद करा – हे सुरु असलं की बॅकग्राऊंडमध्ये सिंक्रोनायझेशनची कामे सुरू असतात. ज्यामुळे फोनच्या प्रोसेसिंगवर परिणाम होतो आणि फोन स्लो होतो आणि बॅटरी लवकर उतरते. म्हणून आपल्या सेटिंग्ज मध्ये जाऊन ऑटो सिंक डिसेबल करा.

८) कस्टम ROM – तुम्हाला जर अँड्रॉईड फोनची बऱ्यापैकी माहिती असेल आणि वरील उपाय करून सुद्धा फोन स्लो वाटत असेल तर कस्टम ROM इन्स्टॉल करून बघा. याने लेटेस्ट फीचर्स बरोबरच, तुमचं डिव्हाईस सपोर्ट करत नसलेले अँड्रॉईडचे व्हर्जन सुद्धा तुम्हाला वापरता येईल.

९) मेमरी कार्ड – तुमच्या फोनची इंटर्नल स्टोअरेज स्पेस कमी असेल, तर तुम्ही नक्कीच मेमरी कार्ड वापरत असाल. पण तुम्ही जास्त स्टोअरेज क्षमता असलेले मेमरी कार्ड वापरले तर अजून फायदा होईल.

 

memory card inmarathi

 

१०) फोन अपडेट्स – आपल्या सगळ्यांच्याच अँड्रॉईड फोनवर कंपनीकडूनच अपडेट्स येत असतात. फोनमध्ये असलेले बग्ज काढून सतत सुधारणा केल्या जातात, फिचर बदलले जातात, व्हर्जन अपडेट होते. म्हणून जेव्हा डिव्हाईस अपडेट करण्यासाठी नोटिफिकेशन येईल तेव्हा त्याकडे दुर्लक्ष न करता आपला फोन वेळीच अपडेट करूनघ्या.

११) फॅक्टरी रिसेट – वरील दिलेल्या पर्यायांपैकी एकही पर्याय उपयोगी पडत नसल्यास फोन एकदा रिसेट करून घ्या. याने फोन अगदी नव्या सारखा फास्ट होईल. पण हे करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची ती अशी, की आपल्या सगळ्या डेटाचं बॅकअप ठेवा. नंबर्स, फोटो, डॉक्युमेंट गुगल ड्राईव्हवर किंवा फोन क्लाऊडवर अपलोड करून घ्या किंवा सरळ एखाद्या पेन ड्राईव्ह मध्ये सेव्ह करून घ्या.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?