' केसांना तेल लावणं गरजेचं आहे, पण ते लावताना या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत!

केसांना तेल लावणं गरजेचं आहे, पण ते लावताना या गोष्टी कटाक्षाने पाळल्या पाहिजेत!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

केसांची नीट काळजी घ्यायची असेल तर भारतीय संस्कृतीने संपूर्ण जगाला दिलेला उपाय म्हणजे केसांना तेल लावणे. ज्याप्रमाणे शरीराच्या अथवा चेहऱ्याच्या त्वचेला पोषण मिळणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे सुदृढ आणि आकर्षक केसांसाठी त्यांना पोषण मिळणे गरजेचे आहे. म्हणूनच केसांना पोषण पुरवण्यासाठी तेल लावणे गरजेचे आहे.

तेल लावल्यानंतर केस चिकट होतात त्यामुळे केसांना तेल न लावणे हा बऱ्याच लोकांसाठी नापसंतीचा विषय असेल परंतु या महामारीच्या दरम्यान मिळालेल्या वेळेचा फायदा आपण केसांना तेल लावण्यासाठी नक्कीच करू शकतो.

पर्यावरणातील बदल, व्यक्तिगत ताण-तणाव या सर्वांमुळे केसांना नुकसान पोहोचत असते त्यामुळे; केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

 

oil inmarathi

 

त्यामुळे केस धुऊन झाल्यानंतर अथवा धुण्याआधी तुम्ही नॅचरल ऑइल वापरून तुमच्या केसांची काळजी घेतली पाहिजे.

सर्वप्रथम केसांना तेल लावल्यामुळे असंख्य फायदे होतात हे तुम्ही जाणून घेतले पाहिजे परंतु या बरोबरच बऱ्याच चुकीच्या समजुती सुद्धा अस्तित्वात आहेत ज्यामुळे केसांना नुकसान होऊ शकते.

ही मिथके आपल्या घरगुती एक्सपर्ट असणाऱ्या आईलासुद्धा माहित नसणार परंतु; तुम्हाला याची काळजी करण्याची अजिबात गरज नाही कारण आम्ही आज याच चुकीच्या समजुती आणि मिथकांची बद्दल बोलणार आहोत.

जेणेकरून केसांना पोषण पुरवण्याचा योग्य उपाय तुमच्यापर्यंत पोहोचेल.

दररोज केसांना तेल लावल्यामुळे घाण साचून केसाची त्वचा बंद होणे :

आपण केसांवर तेल किती प्रमाणात लावले पाहिजे हे प्रत्येकाच्या केसांच्या त्वचेनुसार, हवामानानुसार वातावरणातील, आद्रतेनुसार, तुम्ही किती वेळा तुमचे केस धुता, तुमचा शांपू कोणत्या प्रकारचा आहे, तुमचा आहार यावर अवलंबून आहे.

या सर्व प्रकारांवर तेल लावण्याचे प्रमाण अवलंबून असल्यामुळे कधीतरी आपल्याकडून चूक होऊ शकते. त्याबरोबरच धूळ, प्रदूषण यामुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहोचते हे आपल्या सर्वांनीच ऐकले असेल आणि हे चुकीचे नाही.

वातावरणाशी संपर्कात येणारा प्रत्येक शरीराच्या भागाला धूळ आणि प्रदूषणामुळे नुकसान पोहोचत असते यामध्ये प्रामुख्याने चेहऱ्याच्या आणि केसाच्या त्वचेचा समावेश होतो.

आपल्याला ब्युटी कंपनीकडून दरवेळेला असे सांगितले जाते की प्रदूषण आणि धुळीपासून चेहर्‍याच्या त्वचेचा होणारा र्‍हास टाळण्यासाठी चेहऱ्याला मॉइश्चरायझिंग क्रीम लावणे अथवा संस क्रीम लावणे गरजेचे आहे ज्यामुळे प्रदूषणापासून होणारे नुकसान टाळता येईल.

 

cream inmarathi

 

मॉइश्चरायझिंग क्रीम सुद्धा तेलासारख्याच चिकट असतात मग या ब्युटी कंपनीचा तेलाच्या बाबतीत दुजाभाव बघितल्यावर मनात नक्की शंका उमटते.

केसांना तेल का लावले पाहिजे? आणि कशा पद्धतीत लावले पाहिजे? हे आयुर्वेदाने केशअभ्यंग मध्ये सांगितले आहे. केशअभ्यंग म्हणजेच केसांना तेल लावण्याची क्रिया. यामुळे दोन प्रकारे फायदे होत असतात.

सर्वप्रथम केसांतील त्वचेमध्ये रक्त संचलन वाढते आणि ज्यामुळे आपल्या स्काल्पला न्यूट्रिएंट्स मिळण्यात मदत होते याबरोबरच केसांच्या तळाला साचलेली घाण यादरम्यान वर येते. ही घाण शाम्पू करताना सहज निघून जाते ज्यामुळे स्काल्प स्वच्छ राहतात.

केसांना तेल लावल्यामुळे कोंडा वाढतो :

या मिथकावर बोलण्याआधी आपणास सर्वप्रथम कोंड्याचे प्रकार समजून घेतले पाहिजे. कोंडा हा दोन प्रकारचा असतो एक म्हणजे कोरडा कोंडा आणि दुसरा म्हणजे तेलयुक्त कोंडा.

सामान्यतः बऱ्याच लोकांना कोरडा कोंडा होतो जवळजवळ ७५% लोकांना कोरडा कोंडा असतो. हा कोंडा सफेद, कोरडा, लहान आकाराच्या पपडी सारखा असतो.

हा कोंडा होण्याची प्रामुख्याने तीन कारणे आहेत : अतिरिक्त शाम्पू करणे, कमी प्रमाणात तेल लावणे आणि तिसरे म्हणजे स्काल्प इरिटेशन. हे एस. एल. एस आणि एस. एल.एसयुक्त शाम्पू मुळे होते.

या डॅन्डरफ वर इलाज म्हणजे दररोज केसांना तेल लावणे, कमी वेळा शाम्पू करणे आणि एस एल एस आणि एस एल युक्त शाम्पू केसांना लावणे टाळले पाहिजे.

तेलयुक्त कोंडा :

दुसऱ्या प्रकारचा कोंडा म्हणजे तेलयुक्त कोंडा जो खूप कमी प्रमाणात आढळतो. तेलयुक्त कोंडा होण्याची मुख्य कारणे म्हणजे मेलेसेजिया नावाचा फंगल ऑरगॅनिझम आहे.

हा कोंडा चिकट पिवळ्या रंगाच्या पापडी सारखा असतो. जर तुम्हालाही तेलयुक्त कोंडा झाला असेल तर केसांची काळजी घेताना तुम्हाला तीन गोष्टी ध्यानात ठेवला पाहिजे.

 

dandruff inmarathi

 

सर्वप्रथम केसातील मेलेसेजिया मायक्रोऑरगॅनिझमची वाढ कशी होणार नाही याची काळजी घेणे तसेच केसातील नैसर्गिक तेलाचे प्रमाण संतुलित कसे राहील आणि स्काल्प ची घनता कमी कशी होईल यावर लक्ष देणे.

गोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे या ऑरगॅनिझमची वाढ होते म्हणून; गोड पदार्थ प्रमाणात खाल्ले पाहिजे. खोबरेल तेल किंवा बदामाच्या तेलाने केसांची मालिश करणे टाळायला हवे कारण हेच हे तेल ऑरगॅनिझम च्या वाढीसाठी पूरक आहे.

केसात तयार झालेला हा फंगल ऑरगॅनिझम समूळ नष्ट करण्यासाठी आयुर्वेदाने काही कडू औषध सुचवलेली आहेत. यामध्ये नीली, निंबा, ईद्रावल्ली इत्यादी वनस्पतींचा समावेश असलेले तेल वापरले पाहिजे.

यांमध्ये या फंगल ऑरगॅनिझम नष्ट करण्याची क्षमता आहे आणि अगदी दोन ते तीन महिन्याच्या सतत वापरामुळे तुमच्या डोक्यातील कोंडा नष्ट होईल.

तेल लावल्यानंतर घट्ट केस बांधणे टाळा :

प्रत्येक गोष्ट कधी ना कधी कमकुवत होतेच. केसांच्या बाबतीत पण हेच होते जेव्हा आपण केसांना तेल लावतो तेव्हा आपले केस तेलामुळे मऊ होतात म्हणूनच ते लावल्यानंतर आपण केस घट्ट बांधले तर केसांमध्ये गाठी तयार होऊ शकतात ज्या सोडवणे किती अवघड आणि त्रासदायक आहे हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.

याबरोबरच कोणतीही हेअर स्टाईल ज्यांमध्ये केस घट्ट बांधले जातात यामुळे केसांची मुळे कमकुवत होतात. ज्यामुळे केसांना नुकसान पोहोचू शकते.

म्हणून तेल लावल्यानंतर केस आधीच कमकुवत अवस्थेत असताना ते घट्ट बांधणे टाळले पाहिजे.

ओल्या केसांवर तेल लावू नये :

ओल्या केसांवर कोमट तेलाने मालीश केल्यानंतर आपणा सर्वांनाच आराम मिळतो परंतु; फक्त या अमिषापोटी आपण ओल्या केसांवर तेल लावणे टाळले पाहिजे.

 

hair massage inmarathi

 

कारण केस धुतल्यानंतर ते मऊ होतात आणि तेल लावल्यानंतर या मऊपणात भर पडते. अशावेळी जर आपण केसांची मालिश केली तर ते तुटण्याची शक्यता अधिक असते त्यामुळे ओल्या केसांवर कधीही तेल लावता कामा नये.

कमी तेलाचा वापर करावा :

काहीजण केसांना अधिकाधिक पोषण पुरवण्यासाठी खूप तेल वापरून मालिश करतात आणि यामागे त्यांचा समज असतो की त्यांचे केस इतरांपेक्षा अधिक सुदृढ होतील परंतु असे मुळीच होत नाही.

जेव्हा आपण केसांवर अधिक प्रमाणात तेल लावतो त्यावेळेला ते तेल काढण्यासाठी आपल्याला शाम्पूचाही अधिक वापर करावा लागतो. ज्यामुळे आपल्या केसांच्या त्वचेतून स्त्रवले जाणारे नैसर्गिक तेल सुद्धा निघून जाते.

परिणामी, फायद्यासाठी लावत असलेल्या तेलाचे रूपांतर तोट्यात होते. म्हणून ही तोट्याची शक्यता टाळायची असेल तर तुम्ही कमी तेलाचा वापर केला पाहिजे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?