' पुरुषांशी संबंध ठेऊन त्यांनाच संपवणा-या जगातील या क्रूर राणीची कथा तुमची झोप उडवेल...

पुरुषांशी संबंध ठेऊन त्यांनाच संपवणा-या जगातील या क्रूर राणीची कथा तुमची झोप उडवेल…

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम शेअरचॅट

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल 

===

काही दिवसांपुर्वी नेटफ्लिक्स वर बुलबुल नावाची फिल्म आलेली. नवऱ्याकडून झालेल्या जाचामुळे नंतर दीरा कडून झालेल्या दुष्कर्मामुळे तिचा मृत्यू होतो. त्यानंतर मात्र त्याच गावात वास करून ती गावात इतर स्त्रियांशी दुष्कर्म करणाऱ्या पुरुषांना ठार मारत असे.

तिच्यामुळे गावात तिची एवढी दहशत पसरते की गावात कोणताही पुरुष स्त्री सोबत वाईट कृत्य करायच्या आधी दहा वेळा विचार करत असे.

ही झाली फिल्मची कहाणी. जर तुम्हाला सांगितलं की या कथेच्या विरुद्ध अशी एक कथा आहे. ज्यामध्ये ती स्त्री तिच्याशी संबंध ठेवणाऱ्या प्रत्येक पुरुषाला स्वतः मारायची तर?

आताच्या आफ्रिकी देश अंगोलाची मध्ययुगीन राणी म्हणजे एनजिंगा एमबांदी! तिचा इतिहास बघितला तर युरोपातील वसाहतवादी राष्ट्रांशी लढा देण्यासाठी ती प्रसिद्ध आहे.

१७ व्या शतकात युरोपीय देशांच्या अक्षरशः नाकीनऊ आणले होते. पण काही इतिहासकार तिचा सत्तेसाठी हापापलेली स्त्री असा उल्लेख करतात. कारण सत्ता मिळवण्यासाठी तिने स्वतः च्या भावाची हत्या घडवून आणली होती.

 

nzinga inmarathi

 

काही इतिहासकार लिहितात की या राणीशी संबंध बनवणाऱ्या प्रत्येक पुरुषाला ती जिवंत जाळत असे.

राणी एनजिंगाच्या वागणुकीवर भलेही इतिहासकारांचे एकमत नसले तरीएनजिंगा आफ्रिकेतली एक लोकप्रिय महिला होती यावर इतिहासकार आपले एकमत दाखवतात.

तर बघूया आज या राणी बद्दल!

एमबांदु लोकांच नेतृत्व एनजिंगा ही दक्षिण पश्चिमी राष्ट्र एनदोंगो आणि मतांबाची या देशाची राणी होती. परंतु किमबांदु लोक राणीला एनगोला म्हणत असत. याच शब्दाने पोर्तुगीज लोक या भागाला ओळखत असत.

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

पुढे याच एनगोलाचा अपभ्रंश होऊन आजचा ‘अंगोला’ अस्तित्वात आला. तर, वासहतवादाच्या सुरवातीनंतर पोर्तुगीजांनी सोने-चांदी आणि इतर नगदी पिकांच्या हव्यासापोटी या भागावर हल्ला केला.

परंतू हाती काही न मिळाल्यामुळे त्यांनी आपली मोठी वसाहत ब्राझील मधून अंगोलामध्ये गुलामांचा व्यापार सुरू केला.

एनजिंगाचा जन्म याच पोर्तुगीजी हल्ल्याच्या आठ वर्षानंतर झाला. एनजिंगाने लहानपणापासूनच आपले वडील एमबांदी किलुंगी जे राजे होते त्यांच्यासोबत पोर्तुगीजाशी लढा देत होती.

१६१७ मध्ये राजाच्या मृत्यूनंतर त्याचा मुलगा एनगोला एमबांदीच्या हातात सत्ता आली. पण वडीलांसारखा पराक्रम आणि बहिणीसारखी बुद्धी त्याच्याकडे नव्हती.

राजा एनगोला ला संशय होता की त्याच्या बहिणीच्या सोबत असणारे काही त्याच्या विरोधात कट कारस्थान करत आहेत. या संशयावरून त्याने एनजिंगाच्या मुलाला मृत्युदंडाची शिक्षा दिली.

पण तोंडावर आलेल्या पोर्तुगीजी सेनेशी त्याचा लढा देण्याची कुवत नसल्याची गोष्ट त्याला माहित असल्याने त्याने एनजिंगाशी समजोता घडवून आणला आणि राज्य दोघांमध्ये वाटून घेतले.

 

portugese inmarathi

 

पुढे १६२४ च्या दरम्यान राजा एका छोट्या बेटावर जाऊन राहायला लागला. आणि इथेच त्याचा अचानक मृत्यू झाला. या मृत्यबद्दल अनेक मतांतरे आहेत.

काही सांगतात की मुलाच्या हत्येचा बदला म्हणून आणि पूर्ण राज्य आपल्याला मिळावे या साठी एनजिंगा ने त्याला विषप्रयोग करून मारले तर काही सांगतात की पोर्तुगीज आक्रमणाला कंटाळून त्याने आत्महत्या केली.

एनजिंगा ही पोर्तुगीज मिशनरी मधून राहून पोर्तुगीज भाषा शिकली होती आणि त्यांचे काम करण्याची पद्धत आत्मसात केली होती. तिच्या भावाला हे न जमल्यामुळे त्याचे आणि पोर्तुगीजांचे सतत खटके उडत असत.

म्हणतात की पोर्तुगीजांसोबत संबंध चांगले राहावे म्हणून एनजिंगाने ख्रिस्ती धर्म पण स्वीकारला होता. धर्मांतर नंतर तिचे नवीन नाव एना डे सुजा जे होते.

त्यावेळेस एनजिंगा ४० वर्षाची होती, पण पोर्तुगीज आणि एनजिंगा यामध्ये संबंध जास्तवेळ नाही टिकले आणि पुन्हा त्या दोहोंच्या मध्ये संघर्ष उभा राहिला.

पोर्तुगीजांच्या वसाहतवादी वृत्तीला आपल्या नेतृत्वाने टक्कर देऊन एनजिंगाने आपण सक्षम राणी असल्याचे सिद्ध केले होते.

अंगोलाच्या नॅशनल लायब्ररीचे निर्देशक जाओ लॉरेकॉ सांगतात, आफ्रिका खंडात युगांपासून चालत आलेल्या महिला शोषणाच्या विरोधात एनजिंगा एक मजबूत विरोधक म्हणून उभी राहिली.

एनजिंगा सारख्या महिलांनी दाखवून दिले की सत्तेच्या ढाच्यात एकदम फिट बसून त्यांनी आफ्रिका सारख्या मोठ्या खंडाच्या विकासात बहुमूल्य योगदान दिले आहे.

 

queen inmarathi

पोर्तुगाली लेखिका जोस आगुआलूसा म्हणतात, राणी एनजिंगा केवळ योद्धा किंवा प्रशासक नव्हत्या तर एक उत्तम राजनीती तज्ज्ञ सुद्धा होत्या.

पोर्तुगीज विरोधात लढण्यासाठी त्यांनी डचांची मदत घेतली. तर आपसी कबिल्यात झालेल्या युद्धात त्यांनी थेट पोर्तुगीजांची मदत घेतली.

आपलं राज्य टिकवण्यासाठी त्या आपल्या पदरात पडतील अशा वाटाघाटी करण्यात समर्थ होत्या.

राणी एनजिंगाच्या पराक्रमी आणि कुशल आयुष्याला डाग लावायचे काम करते ते फ्रेंच निर्देशक मारकीस दे सादे याचे ‘द फिलॉसॉफी ऑफ द ड्रेसिंग टेबल’.

हे पुस्तक त्याने आफ्रिकेत मिशनरी म्हणून काम केलेल्या गीओवनी कामेजी याच्या कथेवर आधारीत लिहिले आहे.

कावेजीने दावा केलेला की राणी एनजिंगा तिच्या सोबत संबंध ठेवणाऱ्या पुरुषाला जिवंत जाळत असे.

शिवाय तिने स्वतः चा हरम सुद्धा ठेवला होता. तिच्या हरमला ‘चिबदोस’ असे म्हणत असत. हरम मधल्या पुरुषांना महिलां सारखे कपडे घालायला दिले जात असे.

एवढेच नव्हे, हरम मधल्या पुरुषाची निवड ही आपसात मृत्यू होई पर्यंत चालणाऱ्या लढाईने होत असे. यात शेवटला जो पुरुष जिवंत राहील तो राणीशी संबंध ठेवण्यास निवडला जाई.

परंतु लढाई नंतर लढाई पेक्षा भयानक परिणाम त्या विजेत्या पुरुषाला भोगायला लागत असे. संबंधानंतर त्या पुरुषाला राणी समोरच जिवंत जाळले जात असे.

स्थानिक लोकांना याबाबत विचारले असता ते सांगतात की मिशनरी कावेजी याचे दावे हे इतर लोकांच्या सांगण्यावर आधारित होते. राणीने नक्की कोणाला मारले किंवा जाळले याची काहीही तथ्य असलेली कल्पना कोणाला नाही.

तर काही इतिहासकार सांगतात, राणीची पुरुषांना जाळण्याची कथा खरी नसली तरी ती पुरुषांना काही खास वागणूक द्यायची नाही. त्यामुळे त्या दंतकथेचा जन्म झाला असावा.

 

queen angola inmarathi

 

पराक्रमी आणि नावलौकिक मिळवणाऱ्याना बदनाम करायला एक अफवाच पुरेशी असते ज्यात काडीमात्र तथ्य नसते. राणी एनजिंगा च्या बाबतीत सुद्धा असेच दिसून येते.

बाकी कावेजीचा दावा दुर्लक्षित केला तर राणी एनजिंगा ही पराक्रमी आणि उत्तम शासक होती हे दिसून येते!

आमचं युट्यूब चॅनल आणि त्यावरचे व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला फॉलो करा :

 

===

व्हिडिओजसाठी फॉलो करा : इनमराठी युट्यूब चॅनल

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?