' MIM खासदार म्हणाले “६ डिसेंबर विसरणार नाही”, लोक म्हणाले “काशी मथुरा बाकी हैं!” – InMarathi

MIM खासदार म्हणाले “६ डिसेंबर विसरणार नाही”, लोक म्हणाले “काशी मथुरा बाकी हैं!”

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

राम मंदिर विरुद्ध बाबरी मशीद या वादावर अखेर पडदा पडलाय. कोर्टाचा निकाल मंदिराच्या बाजूने लागला आणि मंदिर उभारलं जाणार हे निश्चित झालं. कोरोनाचं संकट असताना सुद्धा, मोठ्या तामझामात यंदा राममंदिराचं भूमिपूजन सुद्धा पार पडलं. पण, अजूनही राम मंदिर आणि बाबरी मशिदीच्या विषयावर पूर्णतः पडदा पडला असल्याचं पाहायला मिळत नाहीये.

सोशल मीडिया आणि तत्सम माध्यमांमधून ‘कोल्ड वॉर’ सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय.

६ डिसेंबर १९९२ रोजी बाबरी मशीद पाडण्यात आली. हा दिवस काळा दिवस आहे, असं म्हणत आजही या विषयावर चर्चा घडावी असा प्रयत्न झालेला दिसतोय.

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील, यांनी एका फेसबुक पोस्टच्या माध्यमातून ६ डिसेंबर हा दिवस आम्ही कायम लक्षात ठेऊ असं म्हटलंय.

 

imtiaz-jalil-fb-post-inmarathi

 

त्यांची फेसबुक पोस्ट आणि त्यावर कमेंट्सच्या माध्यमातून रंगलेलं हे शाब्दिक युद्ध, आता सोशल मीडियावर सुरु आहे. या शाब्दिक युद्धात अगदी थेट धार्मिक वाद पुकारण्यापासून, ते कोपरखळ्या मारण्यापर्यंत सगळंच पाहायला मिळतंय. या ‘सोशल मीडिया वॉर’ला नेमका कसा रंग चढलाय, ते बघाच!

मंदिर पाडून मशीद बांधली होती त्याचं काय?

मंदिराच्या जागीच मशीद बांधली गेली होती, याचा जलील यांना विसर पडला असल्याचं म्हणणं असणाऱ्या काही कमेंट्स या पोस्टवर दिसतायत.

 

jalil-post-comment1-inmarathi

 

राम मंदिर तोडून बाबरने मशीद बनवली, याचं तुला दुःख झालं नाही, आणि आता बाबरी तोडून मंदिर उभं राहतंय याचं दुःख होतंय. हे असं दुटप्पी वागणं कसं जमतं, असा थेट सवाल जलील यांना केला असल्याचं या कमेंटमध्ये दिसतंय.

 

jalil-post-comment2-inmarathi

 

या कमेंटमधून मारण्यात आलेली कोपरखळी, अगदी चपखल आहे असं म्हणायला हरकत नाही.

‘एका माथेफिरूने रामजन्मभूमीच्या जागेवर, मंदिर पाडून मशीद उभारली होती, हे नक्कीच लक्षात ठेवलं जाईल.’ असं राजेश यांनी म्हटलं आहे. ‘ही मशीद वाचवण्यासाठी ज्या मूर्खांनी प्रयत्न केले आहेत, त्यांना सुद्धा हा दिवस कायमचा स्मरणात ठेवतील. ते अजिबात विसरणार नाहीत’ असंही त्यांचं म्हणणं आहे.

नावाचा आधार घेऊन कोटी

या पठ्ठ्याने तर थेट ‘जलील’ या नावाचा वापर करूनच त्यांची थट्टा केल्याचं पाहायला मिळतंय.

 

jalil-post-comment3-inmarathi

 

क्या मिलता हैं इतना ‘जलील’ हो के? असा सवाल करत, शब्दाची कोटी इथे केली आहे. जलील या शब्दाचा ‘अपमानित होणे’ हा अर्थ वापरून, इथे इम्तियाज यांची खिल्ली उडवली गेली आहे.

 

 

तुम्ही इतके अपमानित झालाय, की कुठेही तोंड दाखवण्याच्या लायक उतरला नाहीत. आणखी एका कमेंटमध्ये ‘जलील’ शब्दाचा ‘अपमानित’ हा अर्थ बरोबर वापरलेला पाहायला मिळतोय.

काशी-मथुरा झालं की मग रडा…

‘अयोध्या तो झांकी हैं, काशी-मथुरा बाकी हैं’ या घोषणा तुम्ही अनेकवेळा ऐकल्या असतील. याचाच आधार घेऊन ही कमेंट केलेली पाहायला मिळतेय.

 

jalil-post-comment4-inmarathi

 

‘तुझे अश्रू काशी आणि मथुरासाठी बाकी ठेव. तुला अजून अपमानित व्हायचं आहे.’ अशी कमेंट करताना ‘जलील’ या शब्दाची कोटी इथेही केलेली आहे.

 

jalil-post-comment5-inmarathi

 

थेट काशी-मथुरा बाकी हैं, असं सुद्धा कमेंट्समधून म्हटलं गेलंय.

कमेंटमध्ये मिम्स सुद्धा

सोशल मीडिया वॉर म्हटलं, की मिम्स शिवाय मजा नाहीच. या पोस्टवर कमेंट करताना, अशा काही मिम्सचा वापर सुद्धा केलेला पाहायला मिळतोय.

 

jalil-post-meme1-inmarathi

 

वयाचा मान ठेऊन गप्प बसतोय, अशा साध्या वाक्यासाठी, इथे थेट मिम वापरलं गेलंय. टोमणा, राग आणि इतर भावना या मिममधून व्यक्त केल्या आहेत.

 

jalil-post-meme2-inmarathi

 

राजकीय पोस्टवर कमेंटचा पाऊस पडतोय आणि हा फोटो पाहायला मिळाला नाही, हे घडणं अशक्यच! या पोस्टवर सुद्धा लालू यांचा फोटो वापरून जलील यांची खिल्ली उडवली गेली आहे.

आम्ही काहीच करू शकलो नाही

 

jalil-post-comment7-inmarathi

 

एमआयएमचे अध्यक्ष ओवेसी यांची थट्टा करण्याची संधी सुद्धा सोडण्यात आलेली नाही. ‘बाबरी पाडून राममंदिर उभारलं आहे, हे मी माझ्या मुलांना नक्की सांगेन’ हे त्यांनी म्हटलेलं वाक्य तसंच तसं उचलून, ‘आणि मी काही करू सुद्धा शकलो नाही’ हेदेखील सांगा असं म्हटलं जातंय.

 

jalil-post-comment8-inmarathi

 

‘हिंदूंनी मशीद पाडली, मोदींनी मंदिर बांधलं आणि योगी यांनी नावं बदलली, तरी आम्ही काहीही करू शकलो नाही’ हे तुमच्या मुलांना सांगायला विसरू नका; अशी विनोदी ढंगात जलील यांच्यावर केलेली सुद्धा या कमेंट्सच्या महापूरात पाहायला मिळतेय.

थोडक्यात काय, तर ६ डिसेंबर हा दिवस आम्ही लक्षात ठेऊ, असं म्हणणं जलील यांना फारच महागात पडलंय असं म्हणायला हरकत नाही.

कारण, अयोध्येचं राममंदिर हे केवळ एक उदाहरण होतं, आणि काशी-मथुरा अजून सुद्धा बाकी आहेत, असाच एकंदर सूर पाहायला मिळतोय.

 

jalil-post-comment9-inmarathi

 

मथुरा आणि काशी इथे सुद्धा इतिहास घडवून येऊया असं म्हणणारी ही कमेंट सुद्धा हेच दर्शवतेय…

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?