' भाज्या शिजवून खाणं फायदेशीर की भाज्यांचा ज्यूस हे जाणून घ्या! – InMarathi

भाज्या शिजवून खाणं फायदेशीर की भाज्यांचा ज्यूस हे जाणून घ्या!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आहारामध्ये भाज्यांचा समावेश असणे किती गरजेचे असते हे आपणा सर्वांनाच माहीत आहे.

भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात ज्यामुळे आपल्या पचनाची क्रिया नीट होते तसेच पोट साफ राहते, भाज्यांमध्ये तऱ्हेतऱ्हेचे विटामिनसुद्धा असतात जे आपल्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक असतात आणि भाज्या ह्या द्रव्यरहित असते ज्यामुळे आपल्या शरीराला हायड्रेट राहण्यासाठी मदत होते.

जर भाज्यांमधून आपल्याला एवढे सारे फायदे मिळत असतील तर आपण त्याचा आहारात समावेश का करू नये?

हल्ली सगळेच हेल्थ कॉन्शियस होत असल्याने फळांच्या ज्युस प्रमाणे भाज्यांचा ज्यूस पिण्याचा ट्रेंडही बघायला मिळतो.

 

vegetables juice inmarathi

 

मग आता तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असणार जर भाज्यांमधून आपल्याला शरीरासाठी इतके आवश्यक घटक मिळत असतील तर शिजवून खाल्लेल्या भाज्या अधिक फायदेशीर ठरतील की भाज्यांचा बनवलेला रस अधिक फायदेशीर ठरेल?

आज आम्ही तुमच्या या शंकेचं निरसन करणार आहोत.

सर्वप्रथम तुम्ही हे जाणून घ्या की तुम्ही भाज्या शिजवून खा अथवा त्यांचा रस प्या तुम्हाला त्यातील आवश्यक घटकांचा फायदा होणारच आहे. परंतु आपल्या शरीराला यांपैकी कोणत्या माध्यमातून आवश्यक घटक शोषून घेणे सोपे पडते यावरूनच आपल्या शरीराला होणारा फायदा अवलंबून आहे.

वर म्हटल्याप्रमाणे भाज्यांमध्ये मुबलक प्रमाणात फायबर असतात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी सुद्धा भाज्यांची मदत होते आणि भाज्यांमध्ये विटामिन्स असतात.

परंतु तुम्हीही जाणून घ्या की भाज्यांमधील हे विटामिन ऑक्सिजन आणि हवेच्या संपर्कात आल्याने कमी होतात.

जेव्हा आपण सलाड बनवण्यासाठी अथवा भाजी बनवण्यासाठी भाजी कापतो तेव्हा भाज्यांमधील उपस्थित पोषक घटके हवेच्या संपर्कात येतात आणि ऑक्सिडेशन प्रक्रियेमुळे त्यांतील विटामिनचे प्रमाण कमी होते.

 

salad inmarathi

 

तसेच भाज्या शिजवताना उष्णतेमुळे त्यातील काही विटामिन्स नष्ट होतात. तसेच भाज्या चावून खाल्ल्याने आपल्याला त्यातील विटामिन्स मिळतात परंतु हे विटामिन्स आणि मिनरल्स खूप मंदगतीने प्राप्त होत असतात.

जर तुम्ही भाज्यांचा रस बनवून त्यांचे सेवन केले तर भाज्यांमध्ये उपलब्ध असलेले विटामिन्स आणि मिनरल्स शरीराला शोषून घ्यायला सोपे पडतात आणि ते अधिक वेगाने शरीरापर्यंत पोहोचतात.

भाज्यांचा रस बनवून प्यायल्याने अजून एक फायदा असा की आपल्या नकळत आपण अधिक प्रमाणात त्यांचे सेवन करत असतो.

कारण एखादी भाजी शिजवून खाल्ली तर या दरम्यान आपण मूठभर भाजी खात असतो याऐवजी त्या भाजीचा रस बनवून प्यायल्याने आपण अधिक प्रमाणात त्या भाजीचे सेवन करत असतो.

याचाच अर्थ असा कॉन्टिटी आणि क्वालिटी या गोष्टी भाज्यांचा रस बनवून प्यायल्याने आपल्याला अधिक प्रमाणात प्राप्त होऊ शकतात. सर्वात महत्वाचे म्हणजे भाज्या शिजवून बनवण्यापेक्षा त्यांचा रस बनवणे हे वेळेच्या दृष्टिकोनातूनही सोयीस्कर आहे.

२०१६ साली झालेल्या एका अभ्यासानुसार असे कळले की बीट शिजवल्यानंतर खाल्ल्याने त्यातील न्यूट्रिशियन आणि महत्वाचे पोषक घटक कमी झाले याचाच अर्थ असा की बीटाच्या रसाचे सेवन केल्याने तुमच्या शरीराला अधिक प्रमाणात पोषक घटक मिळतात.

भाज्यांच्या रसाचे सेवन करण्याआधी तुम्हाला माहीत असाव्यात अशा आवश्यक गोष्टी :

ज्याप्रमाणे भाज्यांचे सेवन करणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे तसेच भाज्यांच्या रसाचे काही तोटे सुद्धा आहेत आणि ते सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजे.

जेव्हा भाज्यांचा रस बनवताना आपण त्यामध्ये साखर टाकतो तेव्हा हीच साखर भाजीच्या रसाची कॅलरी वाढवून तुमच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकते.

 

vegetable juice inmarathi

 

त्यामुळे भाज्यांचा रस बनवताना तुम्ही साखरेचे प्रमाण अत्यंत कमी ठेवा अथवा ज्युस मध्ये साखर टाकणे टाळा जेणेकरून तुम्ही पीत असणारा भाज्यांचा रस अधिक फायदेशीर असेल.

भाज्या ज्यूस बनवून पिण्याचा अजून एक तोटा म्हणजे त्यातून तुम्हाला फक्त द्रव्य मिळतात. भाज्यांमधील सगळ्यात महत्त्वाचा घटक जो पचनक्रियेत मदत करत असतो तो म्हणजे फायबर.

हा घटक ज्यूस बनवण्याच्या प्रक्रियेत नष्ट होतो. जेव्हा तुम्ही कच्चा भाज्या खाता तेव्हा तुम्हाला हे फायबर्स अधिक प्रमाणात मिळवता येतात.

या फायबर्स अजून एक फायदा असा असतो की यामुळे तुम्हाला पोट भरल्यासारखे वाटते ते जर तुम्ही फक्त ज्यूस पीत असाल तर तुमची भूक कमी होत नाही.

जर तुम्ही ही वजन कमी करण्याच्या विचारात असाल तर फायबर युक्त कच्चा भाज्या तुमच्यासाठी अधिक फायदेशीर ठरतील.

मेयो क्लिनिक अनुसार भाज्यांचा रस हे त्यातील पोषक घटके मिळवण्याचा सोपा मार्ग आहे परंतु तुम्ही भाज्या शिजवून खाण्याऐवजी फक्त ज्यूस बनवून सेवन करता कामा नये.

एका प्रौढ व्यक्तीने दोन ते दीड वाटी भाजीचे प्रत्येक दिवशी सेवन करणे गरजेचे आहे. एकंदर किती प्रमाणात भाज्यांचे सेवन दररोज केले पाहिजे हे तुमच्या वयावर, लिंगावर आणि तुमच्या शरीरयष्टीवर अवलंबून असते.

 

vegetables 3 inmarathi

 

तुम्ही भाज्या शिजवून खा, उकडवून खा किंवा कच्च्या खा तुम्हाला फायदाच होणार आहे. फक्त याची खात्री करून घ्या त्यामध्ये सोडियमचे म्हणजेच मीठाचे प्रमाण कमी असेल.

भले भाज्यांच्या रसामधून अधिक प्रमाणात विटामिन्स आणि मिनरल्स मिळत असतील तरी त्यातून फायबर्स खूप कमी प्रमाणात मिळतात आणि हे फायबर्स शरीराच्या पचनक्रियेसाठी अत्यंत आवश्यक असतात.

कॉन्स्टिपेशन, हृदयविकार, डायबिटीज यांसारख्या शारीरिक विकारांवर फायबर्स आळा घालण्याचे काम करत असतात.

थोडक्यात काय तर वरील माहितीवरून आपल्याला हे लक्षात येते कि भाज्यांचा रस आपल्या शरीरासाठी फायदेशीर असला तरी आपल्याला भाज्या शिजवून खाणे सुद्धा तितकेच गरजेचे आहे.

भाज्यांतून मिळणारे विटामिन्स आणि मिनरल्स अधिक प्रमाणात मिळवण्यासाठी आपल्याला भाज्या शिजवून खाण्याबरोबरच त्यांचा रस पिण्याने शरीराला फायदा होणार आहे.

===

महत्वाची सूचना: सदर लेखातील माहिती, विविध तज्ज्ञांच्या अभ्यास व मतांनुसार तसेच सर्वसामान्य मनुष्याच्या आरोग्यास अनुसरून देण्यात आलेली आहे. ही माहिती देण्यामागे, या विषयाची प्राथमिक ओळख होणे हा उद्देश आहे. वाचकांनी कोणताही निर्णय घेण्याआधी, आपल्या आरोग्याला अनुसरून, डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?