' सोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी

सोलापूर जिल्हापरिषद शिक्षकांच्या ७ कोटी रुपयांच्या पारितोषिकामागची अतुल्य कहाणी

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

२०२० हे वर्ष एकंदरीत संपूर्ण जगासाठी भयंकर वाईट ठरलं. कोरोनाचं जागतिक पातळीवर ओढवलेलं संकट, बंद पडलेले उद्योग, कोरोनात बळी गेलेले कितीतरी लोक, स्वेच्छेनं स्विकारलेली घरातील कैद, मुलांचं शैक्षणिक नुकसान करेल असं वाटायला लावणारी ही परिस्थिती!

मुलं, शिक्षक, पालक सगळेच घरात बंद. महिन्या दोन महिन्यात लाॅक डाऊन संपेल, सारं काही आलबेल होईल अशी आशा बाळगून होते सारे पण लस शोधून काढायची प्रक्रिया ही वेळखाऊ असते, या रोगाचा इलाज माहिती नाही! सगळे अंधारात चाचपडत चालणारे प्रवासी.

शेवटी जगभरात ऑनलाइन शाळा सुरू झाल्या. शिक्षक मुलं घरातूनच वर्गात अभ्यास करु लागली. शिक्षक तास घेऊ लागले. कधी नेट कनेक्शन आहे नाही यावर मात करत करत वर्ग सुरू झाले.

 

online school inmarathi

 

मुलांच्या पण ही नवी शिक्षणपद्धती अंगवळणी पडली. याच दरम्यान कोडींग पद्धतीच्या शिक्षणाचा ट्रेंड येऊ लागला. फेसबुकवर, पेपरमध्ये जिथं जिथं शक्य होतं तिथून तिथून कोडींग क्लासेसची जाहिरात होऊ लागली.

कुठलाही ट्रेंड नवा असतो तेव्हा तो लोकांना पटवून देण्यापूर्वी त्याची भयंकर चेष्टा कुचेष्टा होती. या कोडींग पद्धतीच्या क्लासचीही तशीच गत होती. पण ही गोष्ट खूप कमी जणांना माहिती होती की, जागतिक पातळीवर या शिक्षण पद्धतीत नवे प्रयोग करायचं चालू आहे.

आणि अचानक भारतासाठी, आपल्या महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब असलेली बातमी काल जाहीर झाली.

कोडींग शिक्षण पद्धतीत आपल्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक श्री. रणजितसिंह डिसले यांना जागतिक कोडींग शिक्षणासाठी जगातील सर्वात मोठा पुरस्कार जाहीर झाला.

रक्कम आहे २ कोटी रुपये! ही आपल्या देशासाठी, राज्यासाठी आणि एकंदरीत आपणा सर्वांसाठी किती अभिमानाने मिरवावी अशीच बातमी..

 

disle sir inmarathi

 

जी कोडींग पद्धत, जिल्हा परिषदेच्या शाळा या सर्व गोष्टी शहरी भागातील लोक दुर्लक्ष करण्याच्या योग्य समजतात. रांगांच्या रांगा लावून, अवाच्या सव्वा फी भरुन खाजगी, इंटरनॅशनल शाळांमध्ये प्रवेश मिळावा म्हणून धडपडतात.

पण जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक पण आपल्या विद्यार्थ्यांना त्याच उत्तम दर्जाचे शिक्षण देऊ शकतात ही गोष्ट कुणालाही पटत नाही.

पण पुन्हा एकदा ही गोष्ट डिसले सरांनी जागतिक पातळीवर सिद्ध करुन दाखवली आहे की, जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक आणि शिक्षण पद्धती जागतिक स्तरावर असलेल्या शिक्षणाच्या तोडीस तोड आहेत.

या कोडींग पद्धतीच्या क्लासमधून संपूर्ण जगातील १४० देशातील १२ हजार शिक्षक या शिक्षण पद्धतीत शिकवण्याच्या स्पर्धेत सहभागी झाले होते.

या १४० शिक्षकांमधून डिसले सरांची प्रथम क्रमांकावर निवड करण्यात आली आहे. क्यू आर कोडींग पद्धतीत शिक्षण क्षेत्रातील अभिनव क्रांतीत देसले सरांनी आपल्या देशाचा माथा उंचावला आहे.

 

disale sir 2 inmarathi

 

यातही डिसले गुरुजींच्या मनाचा मोठेपणा..त्यांनी ही बक्षिसाची पन्नास टक्के रक्कम अंतिम फेरीत पात्र ठरलेल्या शिक्षकांमध्ये वाटून टाकली आहे.

ज्यामुळे ही शिक्षण पद्धती इतर देशांतील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणं शक्य होईल.

इतकंच नव्हे तर मिळालेल्या रकमेचा विनियोग डिसले सर इनोव्हेटिव्ह टिचर फंडासाठी वापरणार आहेत ज्यामुळे शिक्षकांना अशा प्रकारचे अभिनव उपक्रम राबवण्यास चालना मिळेल.

जगातील बहुतेक उपक्रम पैशाअभावी अडून राहतात. खूपदा पैसा असतो तिथं टॅलेंट नसतं आणि टॅलेंट असेल तिथं पैसा असेलच असं नाही.

हीच नस ओळखून डिसले सरांनी क्विक रिस्पॉन्स कोड म्हणजेच क्यू आर कोड पद्धतीतून मिळणारा पैसा सत्कारणी लावायचा केलेला निश्चय स्पृहणीय आहे.

म्हणजे हुशारी, पैसा यांचा समन्वय साधून चांगले विद्यार्थी, उत्तम अभिनव उपक्रम राबविणारे अजून काही शिक्षक सहज तयार होतील.

 

disale sir 3 inmarathi

 

हुशारी, सुस्वाभाव, सत्कृत्य यांची जागा आजही जगात वरच्या क्रमांकावर आहे हे त्यांनी दाखवून दिलं आहे.

रणजित डिसले यांनी जे घडवून आणलं, त्याची प्रेरणा इतरांनी घेतली तर भारतीय शिक्षण व्यवस्था कायमची बदलून जाईल!

आणि याच बरोबर जिल्हा परिषदेच्या शाळा, तिथं असणारे शिक्षक, शिकवलं जाणारं शिक्षण हे जगात कुठंही कमी नाही हे या उदाहरणावरून दिसून आले आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?