' रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी! – InMarathi

रग्गड पगाराची नोकरी सोडून त्यांनी उभा केला फूडट्रक, आज कमावतायत १.५ कोटी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आताची तरुण पिढी नोकरी मागे धावताना दिसते आहे. पैसा हेच दैवत असल्याने आठ आठ तास काम करुन मिळेल ते दान पदरात पाडून घेणे हेच या तरूणांचे ध्येय दिसते.

सर्वच तरूण या विचारांचे नसतात. स्वतंत्र व्यवसाय थाटावा, नवीन कल्पना प्रत्यक्षात आणाव्यात, आपण राबावे, इतरांना काम द्यावे, आपल्या बरोबरच चार लोकांचे भले व्हावे अशा विचार सरणीने भारावलेले बरेच तरूण, कर्तबगार दिसतात.

लोकांच्या कार्यालयात नोकर होण्यापेक्षा स्वतः मालक होणे हे केव्हाही उत्तम! मोठा नोकर होण्यापेक्षा छोटा मालक होणं कधीही उत्तमच नाही का? व्यवसाय ही गोष्ट जशी रक्तात असावी लागते, तशी ती डोक्यात असावी लागते. हा विचार प्रत्येक भारतीयानी केला तर कामगारशाही, नोकरशाही कमी होऊ शकेल.

आपण व्यावसायिक नाही, आपण ११ ते५ नोकरीच करू शकतो ही गोष्ट आपण खोटी करून दाखवली आहे. म्हणूनच टाटा, बिर्ला, अंबानी, बजाज, किर्लोस्कर इत्यादी नावे जगाच्या इतिहासात व्यवसायासाठी अभिमानाने घेतली जातात. आता यात छोटे मोठे व्यावसायिक सामील झाले आहेत व स्वतःचा व्यवसाय ते नेटाने चालवताना दिसतात.

 

 

नोकरी करत स्वतःचा व्यवसाय वाढवणारे कितीतरी लोक आपल्याला दिसतात आणि मग ते साहेब बनतात.

यात अभिमानाने घेण्यासारखी नावे म्हणजे ज्योती गणपती व तिचे यजमान सत्या कोनीकी हे होय. हे दोघेही आधी नोकरी करत होते. ज्योतीने अमेरिकेत नाॅक्स काॅलेज मध्ये ह्यूमन रिसोर्सेस मध्ये मास्टर्स डिग्री घेऊन ती वडिलांच्या लाॅजिस्टिक व सप्लाय कंपनीमध्ये नोकरी करीत होती. सत्याने टेलीकम्युनिकेशन मध्ये मास्टर्स डिग्री करुन तोही बंगलोर मध्ये कार्यरत होता.

नोकरी करताना कार्पोरेट क्षेत्रात ज्या काही बऱ्या वाईट गोष्टी अनुभवलेल्या. त्यामुळे नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरु करायचं त्यानी ठरवलं, पण कोणता व्यवसाय करायचा हा प्रश्न कोणालाही पडतो? एखादा व्यवसाय सुरु करताना किंवा करण्यापूर्वी त्याची चाचपणी करणं आवश्यक असतंच. ते गरजेचंही असतं. अन्यथा नुकसान आहेच.

कार्पोरेट क्षेत्रात या जोडीने काही वर्षे काम केल्यानंतर त्यांनी एका गोष्टीचा अभ्यास केला, काही व्यवसाय सुरु करायचा असेल तर खाद्यपदार्थांचा व्यवसाय सुरु करावा. कारण हा व्यवसाय असा आहे ज्याला मरण नाही. नोकरीपेक्षा ह्या दोघांचा ओढा खाद्यपदार्थ तयार करण्याकडे होता. हा विचार त्यांना स्वस्थ बसू देत नव्हता.

 

 

२०१२ साली या गोष्टीचा त्यांनी सखोल अभ्यास केला. भव्य रेस्टारंट सुरु करणे हे खूप खर्चिक ,धोक्याचे होते. कोणताही व्यवसाय सुरु करताना सुरुवातीला कमी भांडवल उभारणी करुन करावा. नंतर जम बसला, की तो वाढवावा हे सामान्य धोरण आहे. मग आता काय आणि कसं करावं? हा प्रश्न होताच.

ज्योतीला लहानपणी पाहिलेला फूड ट्रक आठवला. जिथं डोसा, उत्ताप्पा मिळायचा. फूड ट्रक ही संकल्पना इथे नवीन होती. सुरवातीला टेम्पो traveller खरेदी केली, पण वाहन जड, गर्दीचे रस्ते, स्वयंपाकाची भांडी हे अवघड व अवजड होते. म्हणून त्यांनी पर्यावरणपूरक टाटाची गाडी खरेदी केली.

आता वाहन परमिट, लायसेन्स, विना हरकत प्रमाणपत्र, अन्नसुरक्षा प्रमाणपत्र ही कागदपत्रांची पूर्तता करावी लागत होती. वाहतूकीचे सर्व नियम पाळून गाडी रस्त्यावर आणायची होती. हे सगळं करायचं यासाठी दहा लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांनी.

 

 

मग त्यांनी दाक्षिणात्य खाद्यपदार्थ विकण्यास सुरुवात केली. खाद्यपदार्थांची तोंडओळख लोकांना होईपर्यंत एक काळजी असते… हे जमेल ना? हे होईल ना? पण जर तुमच्या पदार्थांना दर्जा असेल, चव असेल तर लोक कुठूनही तुमचे पदार्थ मागवतात.

या दोघांनी आपल्या फूड ट्रकचं मार्केटिंग करण्यासाठी पाम्प्लेट्सचा आधार घेतला आणि नंतर व्हाॅटस्अप वर या फूड ट्रकची जोरदार जाहिरात केली. ट्रक छान सजवला. तिथं स्वच्छतेचे निकष पाळून बनवले जाणारे पदार्थ यांची माहिती त्यांनी व्हाॅटस्अपवर पाठवली. १६ लोकांचा स्टाफ या फूड ट्रकवर किचन कॅप आणि हँडग्लोव्ह्ज् वापरुनच पदार्थ बनवतो.

डोसा सेंटरचा फूड truck व्यवसायासाठी कटिबद्ध झाला .आता वेगवेगळ्या सोसायटीमध्ये, कार्यालयासमोर, इमारतीसमोर हा truck उभा राहून खाद्यपदार्थ विक्री करु लागला. घरपोच वस्तूची मागणी होऊ लागली.

 

 

शाळेत जाऊन मार्केटिंग केले. सोशल मिडीयाचा वापर मार्केटिंग मध्ये केला. व्हाॅट्सअप वर, सोसायटीच्या नोटीस बोर्डावर पदार्थांची यादी लावण्यात आली. सहा महीन्यात ८०० कुटुंबं त्यांची कायमची गिऱ्हाईकं झाली.

आज या पदार्थांना प्रचंड प्रमाणात मागणी आहे. याचे नाव डोसा सेंटर (dosa inc)असे आहे. येथे रवा डोसा, टोमॅटो कांदा उत्ताप्पा, मेदू वडा, फिल्टर काॅफी, मलबार पराठा, नारळ लाडू, बर्फी इत्यादी घरगुती चवीचे चविष्ट पदार्थ मिळतात.

गिऱ्हाईकाची वाट पहात रहाण्यापेक्षा हा फूड ट्रक लोकांकडे जातो. ग्राहक आवडीने पदार्थ खरेदी करतात. ‘ग्राहक देवो भव’ हेच इथे सत्य वाटते.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता,मागणी व पुरवठा यामुळेच त्यांना खूप प्रसिद्धी मिळाली. आज दिल्ली, गुरगाव, नाॅयडा येथे ५० हजारापेक्षा जास्त ग्राहक दाक्षिणात्य पदार्थांचा आस्वाद घेत आहेत आणि कमाई आहे १.५ कोटी रुपये!

उद्योगाचे घरी देवता लक्ष्मी पाणी भरी हे पटतंय ना?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved. 

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?