' माणसाच्या राक्षसी स्वभाव दाखवणारी “एका बैलाची” गोष्ट म्हणजे “जलीकट्टू”! – InMarathi

माणसाच्या राक्षसी स्वभाव दाखवणारी “एका बैलाची” गोष्ट म्हणजे “जलीकट्टू”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

===

मनातली कथा लिहिणे आणि मनातील व्यथा मांडणे हे प्रत्येक लेखकाला खूप आवडत असतं. प्रत्येक लेखकाने लिहितांना फक्त स्वतःच्या आनंदासाठीच लिहावं असं सगळे अनुभवी लेखक वारंवार सांगत असतात.

‘वाचकांना आवडेल असं’ जेव्हा लेखक लिहायचा प्रयत्न करतात तेव्हा काही वेळेस मूळ लेखन किंवा कथा ही बाजूला राहत असते.

वाचकांना गुंतवून ठेवणारी कथा, त्यामागचे लॉजिक आणि योग्य मांडणी हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा ती कलाकृती अतीव सुंदर दिसत असते.

अश्या वेळी या कथेचा लेखक कोण आहे? हे जाणून घेण्याची इच्छा लोकांमध्ये निर्माण होत असते. आजचे चित्रपट हे सुद्धा कोणत्याही हिरोच्या स्टाईल मुळे नाही तर त्या सिनेमाच्या कथेमुळेच लोकांना आवडत असतात.

एस हरीश हे लेखक सध्या त्यांनी लिहिलेल्या एका लघुकथेमुळे चर्चेत आहेत. कारणही तसंच आहे. Maoist या नावाने त्यांनी एक कथा लिहिली होती. त्या कथेवरून प्रेरित होऊन ‘जलीकट्टू’ हा सिनेमा लिहिण्यात आला आणि हा सिनेमा लोकांना खूप आवडला.

 

hareesh inmarathi

 

इतकंच नाही तर हा सिनेमा २०२१ च्या ऑस्कर अवॉर्ड साठी भरताची ऑफिशियल एन्ट्री म्हणून निवडण्यात आला आहे.

एस हरीश हे केरळ जिल्ह्यातील निंदुर या गावाचे व्हिलेज ऑफिसर या पदावरील सरकारी कर्मचारी . पण, त्यांच्या या लिखाणानंतर ते आता एक ‘सेलेब्रिटी लेखक’ झाले आहेत असं नक्कीच म्हणता येईल.

आपण लिहिलेल्या कथेवरील सिनेमा हा ऑस्करवारी ला जाणार हे कळल्यावर याचं श्रेय एस हरीश यांनी सिनेमाच्या दिगदर्शक लिजो जोस पेलीसेरी आणि निर्मात्यांना सुद्धा दिलं आहे.

या सोबतच या यशात त्यांनी त्याचे सह लेखक आर जयकुमार, हिरो चेंबन जोस, सिनेमॅटोग्राफर गिरीश गंगाधरन आणि एडिटर दिपू जोसेफ यांचा सुद्धा तितकाच मोठा वाटा आहे हे मान्य केलं आहे.

यावरूनच एस हरीश हे एक चांगले व्यक्ती आणि मोठे कलाकार आहेत याचा प्रत्यय येतो.

‘जलीकट्टू’ चा विषय काय आहे?

‘जलीकट्टू’ हे केरळ मध्ये वर्षानुवर्षे होणाऱ्या बैलांच्या शर्यतीचं नाव आहे. तेच नाव घेऊन २०१९ मध्ये रिलीज झालेल्या ‘जलीकट्टू’ या सिनेमाची कथा ही एका बैलाच्या आयुष्या भोवती फिरते.

हा बैल कत्तलखान्यातून पळ काढतो आणि त्याला पकडण्यासाठी दूर गावातील ग्रामस्थ एकत्र येतात आणि त्याची शिकार करता यावी यासाठी किती प्रयत्न करतात अशी ही कथा आहे.

 

movie scene inmarathi

 

पूर्ण कथेमध्ये विनोद आहे, ड्रामा आहे आणि भावना सुद्धा आहेत.

‘जलीकट्टू’ हा प्राणीमात्रांवर नेहमीच होणाऱ्या हिंसेबद्दल तर भाष्य करतोच, शिवाय हे सुद्धा दाखवतो की, माणसं किती स्वार्थी असतात आणि स्वसंरक्षणासाठी ते कोणत्या थराला जाऊ शकतात.

‘जलीकट्टू’ चं चित्रीकरण झालेलं गाव हे लेखक एस हरीश यांच्या गावासारखंच लहान आहे. लहानपणी त्यांच्या गावात असं नेहमीच व्हायचं की एखादा बैल हा पळून जायचा, रागात असायचा आणि त्यामुळे पोलीस हे सर्वांना घरातच राहण्याचे आवाहन करायचे.

आपल्या शॉर्ट स्टोरी ‘माओइस्ट’ मध्ये त्यांनी हीच कथा खूप रंजक पद्धतीने सादर केली आहे. ‘जलीकट्टू’ मध्ये सुद्धा त्याच पद्धतीने गोष्टी समोर येतात आणि प्रेक्षकांना खेळवून ठेवतात.

‘जलीकट्टू’ या सिनेमाला या आधी ९३ व्या अकेडमी अवॉर्ड साठी सुद्धा पाठवण्यात आले होते. १४ सदस्य असलेल्या कमिटीने हा निर्णय घेतला होता.

२६ चित्रपटांमधून ‘जलीकट्टू’ ची ही निवड झाली होती. या आधी २ मल्याळम सिनेमांची निवड ही अकेडमी अवॉर्डला पाठवण्यासाठी झाली होती.

एस हरीश यांना ऑस्कर च्या स्पर्धेची पूर्ण जाणीव आहे. २०१८ मध्ये त्यांनी लिहिलेल्या ३ कथांना एकत्र करून Aedam हा सिनेमा तयार करण्यात आला होता.

हा सिनेमा बघितल्यावर त्यांना लिजो जोस यांनी फोन करून अजून एका अश्या सिनेमावर एकत्र काम करण्यासाठी बोलावलं होतं.

लिजो जोस या दिगदर्शक आणि एस हरीश यांच्यात चांगली मैत्री झाली. ते कथा, पटकथा यावर चर्चा करू लागले. काही दिवसांनी त्यांच्यासोबत आर जयकुमार हे लेखक सुद्धा एकत्र आले आणि मग सिनेमाच्या ‘स्क्रिप्ट’ तयार होऊ लागल्या.

लघुकथेचं रूपांतर पटकथेत होण्यात एस हरीश यांना ही गोष्ट आवडली की लेखकाला ते जुने प्रसंग परत जगण्याची संधी मिळत असते.

पटकथा स्वतः लिहिलेली असली तरीही तयार झालेला सिनेमा बघताना एस हरीश हे खूप भारावून गेले होते.

 

s hareesh inmarathi

 

“आपल्या कथेवर इतका सिनेमा इतका चांगला बनू शकतो हे मला नव्हतं वाटलं. कदाचित यालाच सिनेमाची जादू म्हणतात ज्यामध्ये प्रत्येक जण आपल्या कल्पना सुचवत असतो आणि एक जादू तयार होत असते.”

लघुकथा पटकथा कशी बनते?

आपली कथा ही दिगदर्शकाला देतांना आपण त्यात आवश्यक ते बदल करण्यासाठी दिगदर्शकाला मुभा दिली पाहिजे असं लेखक सांगतात. कारण, सिनेमा हा आपण दिगदर्शकाच्या नजरेतून बघत असतो.

कथा ही लेखकाच्या नजरेतून वाचत असतो. त्यामुळेच मूळ कथेत असलेली एक म्हैस आणि बैल यांची जोडी न घेता फक्त एका बैलाची कथा सिनेमात दाखवावी हे लेखकाने लगेच मान्य केलं.

त्या सोबतच ‘माओइस्ट’ मध्ये पूर्ण लक्ष हे प्राण्यांवर होतं तर ‘जलीकट्टू’ मध्ये ते लक्ष लोकांवर ठेवलेलं बघायला मिळतं.

‘जलीकट्टू’ चे दिगदर्शक लिजो जोस यांच्या दिगदर्शनाचं कौतुक हे त्यांनी या आधी दिगदर्शीत केलेल्या आणि २०१७ च्या Angamaly Diaries साठी सुद्धा झालं होतं.

नवोदित लेखकांना एस हरीश हे एकच सल्ला देतात की, “लिहितांना प्रामाणिकपणे लिहा. लिखाण हे कोणीच कोणाला शिकवू शकत नाही. प्रत्येक जण आपली एक शैली घेऊन या जगात आलेला असतो, ती जोपासली पाहिजे.”

 

hareesh 2 inmarathi

 

२२ व्या वर्षी लिखाण सुरू करणाऱ्या एस हरीश यांच्यासाठी हा क्षण अर्थातच खूप आनंदाचा आहे. लिखाणाच्या सर्व प्रकारात कादंबरी लिहिणं हे त्यांना सर्वात आवडतं असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.

सध्या ते चुरुली या सिनेमाच्या कथेवर लिजो जोस यांच्यासोबत काम करत आहेत. बऱ्याच वेळेस हुलकावणी देणारा ऑस्कर पुरस्कार हा या सिनेमाला मिळावा आणि पूर्ण टीम च्या मेहनतीचं सार्थक व्हावं अशी आशा करूयात.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?