' एकर, गुंठा, हेक्टर, बिगा... जमीन मोजणीच्या युनिट्सबद्दल महत्वाच्या गोष्टी!

एकर, गुंठा, हेक्टर, बिगा… जमीन मोजणीच्या युनिट्सबद्दल महत्वाच्या गोष्टी!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

“एक ‘गुंठा’ म्हणजे किती रे भाऊ ?”

‘गुंठा’ सारखे कित्येक गणक असतात ज्यांना दुसऱ्या गणकात किती? असं विचारलं तर आपल्याला पटकन सांगताच येत नाही. १ मीटर म्हणजे किती इंच? २ फूट म्हणजे किती सेंटीमीटर?

अशा कित्येक प्रश्नांची उत्तरं आपण स्कॉलरशीपच्या परीक्षेत दिलेले असतात. पण, नंतर त्याचा वापर होत नसल्याने आपल्याला त्या गणिताचा विसर पडलेला असतो.

जमिनीचं मोजमाप करताना विशेषतः प्रत्येक राज्याची पद्धती ही वेगळी आहे हे लक्षात येईल.

आपण जर का महाराष्ट्रात आहात आणि तुम्हाला जर का तामिळनाडू मध्ये एखाद्या जमिनीची खरेदी करायची आहे. तेव्हा जमीन मोजणीसाठी त्या राज्याची वापरण्यात येणारी पद्धत ही आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे.

 

land business inmarathi

 

याचं कारण हे की, जमिनीच्या व्यवहारात त्या राज्यातील ठराविक प्रतिनिधी, वकील हे सहभागी असतील. त्यांच्या स्थानिक भाषेत बोलून ते किती जमिनीसाठी काय दर आकारत आहेत हे आपल्यालाच समजून घेणं गरजेचं आहे.

पूर्वीच्या काळात अश्या काही चुकांचे खटले न्यायालयात किती वर्ष चालतात हे आपल्याला माहीतच आहे. या लेखात हा विषय एकदाचा पूर्ण समजूनच घेऊया.

जमिनीची मोजणी करतांना हेक्टर, एकर्स, स्क्वेअर मीटर, स्क्वेअर यार्ड्स हे काही गणक भारतात प्रामुख्याने वापरले जातात. उत्तर भारतात ‘बिघा’ किंवा ‘मारला’ हे गणक जमिनीच्या मोजमाप करण्यासाठी ठरवले गेले आहेत.

दक्षिण आणि पश्चिम भारतात सेंट, गुंठा आणि ग्राऊंड असे काही नावं ठराविक अंतराला दिले गेले आहेत. याबद्दलचा विरोधाभास हा आहे की, नाव सारखे असले तरीही प्रत्येक राज्यात या जमिनीचे आकार वेगवेगळे असतात. ते कसे ते बघूया:

प्लॉट आणि ग्राऊंड मधील फरक :

जमिनीच्या एका तुकड्याला किंवा भागाला त्याची जागा कितीही लहान असेल तरीही ‘प्लॉट’ हे नाव देण्यात येतं. ‘ग्राऊंड’ हे नाव जमिनीच्या त्या भागाला दिलं जातं जे की किमान २४०० स्क्वेअर फ़ुट किंवा त्याहून अधिक आहे.

जमिनीचे कागदपत्र हे नेहमी वेगवेगळ्या नकाशा मध्ये विभागलेले असतात. या नकाशा मध्ये दिलेले जमिनीचे आकार हे ग्राऊंड किंवा स्क्वेअर फुट मध्येच दिलेले असतात.

जमिनीच्या मोजमापनासाठी प्रामुख्याने वापरल्या जाणाऱ्या या गणकांची माहिती खालील प्रकारे आहे :

 

plot calculation inmarathi

 

१. १ स्क्वेअर (चौरस) फुट म्हणजे – १४४ स्क्वेअर इंच (१ फुट म्हणजे १२ इंच )

२. १ स्क्वेअर सेंटीमीटर म्हणजे – ०.००१०७६३९ स्क्वेअर फुट.

३. १ स्क्वेअर इंच म्हणजे – ०.००६९४४४४ स्क्वेअर फुट.

४. १ स्क्वेअर किलोमीटर म्हणजे – २४७.१ एकर्स इतकं अंतर आहे.

५. १ स्क्वेअर मीटर हे १०.७६३९१०४२ स्क्वेअर फुट इतकं अंतर आहे.

६. १ स्क्वेअर माईल इतकी जमीन म्हणजे – ६४० एकर्स किंवा २५९ हेक्टर्स इतकी असते.

७. १ स्क्वेअर यार्ड इतकी जमीन ही ९ स्क्वेअर फुट इतकी असते.

८. १ एकर्स म्हणजे ४८४० स्क्वेअर यार्ड किंवा १००.०४ सेन्ट्स इतकी जागा असते.

९. १ हेक्टर म्हणजे – १०,००० स्क्वेअर मीटर किंवा २.४९ एकर्स इतकी जागा असते.

चौरस फूट आणि चौरस मीटर मध्ये काय फरक आहे?

स्क्वेअर मीटर म्हणजे जमिनीचा तो भाग जो की एका चौकोनाने चारही बाजूने कव्हर केला आहे. दोन्ही बाजू या कमीत कमी १ मीटरच्या असाव्यात.

घरगुती वापरासाठी नेमण्यात आलेली जागा (प्लॉट) हे स्क्वेअर फुट मध्ये मोजली जाते तर शेतीसाठी वापरण्यात येणारी जागा ही एकर्स मध्ये मोजली जाते.

शेतीसाठी जमीन विकताना किंवा खरेदी करतांना मात्र हेक्टर मध्ये सर्व सरकारी कागदपत्रांवर त्यांचा उल्लेख असतो.

तुमच्या प्रॉपर्टी चा एरिया कसा काढायचा?

जमीन ही प्लॉट मध्ये तेव्हाच विभागली जाते जेव्हा त्यावर आवश्यक त्या रोड, पार्क, शाळा, हॉस्पिटल, मार्केट आणि इतर सोयीचं नियोजन हे नकाशावर आखण्यात आलं आहे.

एका जमिनीच्या भागावर किती प्लॉट्स आहेत हे नकाशा वाचल्यावर लगेच लक्षात येते. तुम्ही एखादी वापरलेली वास्तू विकत घेणार आहात तर त्याच्या जागेची अचूक माहिती ही त्या जागेच्या ‘सेल डीड’ मध्ये दिलेली असते.

 

sale deed inmarathi

 

तो कागद कोणत्याही खरेदी करणाऱ्या व्यक्तीने अवश्य बघावा.

कोणताही फ्लॅट घेतांना त्याचा एरिया हा स्क्वेअर फुट मध्ये दिलेला असतो. हेच जेव्हा आपण जमीन खरेदी करत असतो तेव्हा ती जागा एकर्स मध्ये लिहिलेली असते.

जमिनीचा प्रत्यक्ष आकार काढण्यासाठी त्या जमिनीची लांबी आणि रुंदी यांचा गुणाकार केला जातो.

उत्तर भारतात जमिनीच्या मोजमापासाठी वापरण्यात येणाऱ्या गणकांची माहिती अशी आहे :

१. १ ‘बिघा-पक्का’ जमीन म्हणजे ३०२५ स्क्वेअर यार्ड इतकी जमीन. तर १ ‘पक्का’ जमीन म्हणजे १६५ फुट x १६५ फुट इतकी जमीन असते. ही नाव बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणा मध्ये प्रमुख्याने वापरली जातात.

२. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये १ बिघा म्हणजे ९६८ स्क्वेअर यार्ड हे गणक वापरण्यात येते.

३. बिघा-कच्चा म्हणजेच बिघा-पक्का च्या एक तृतीयांश इतकी जागा म्हणजेच १००८.३३ स्क्वेअर यार्ड इतकी जागा असते.

४. ‘बिसवा-पक्का’ हे गणक हे उत्तर प्रदेश च्या काही भागात वापरलं जातं. हे अंतर १५१.२५ स्क्वेअर यार्ड इतकं असतं.

५. हरियाणा आणि पंजाब मध्ये वापरण्यात येणारा ‘किल्ला’ हे गणक म्हणजे ४८४० स्क्वेअर यार्ड इतकी जमीन असते.

६. १ घुमाओ म्हणजे – ४८४० स्क्वेअर यार्ड

७. १ कॅनाल जे की जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश मध्ये वापरलं जातं ते अंतर हे ५४४५ स्क्वेअर फ़ुट इतकं असतं. तर ८ ,कॅनाल म्हणजे १ एकर इतकी जागा असते.

पश्चिम भारतात म्हणजेच आपल्या महाराष्ट्रात आणि दक्षिण जमिनीच्या मोजण्यासाठी वापरण्यात येणारे गणक असे आहेत :

 

land dealing inmarathi

 

१. १ गुंठा म्हणजे १०८९ स्क्वेअर फुट.

२. १ सेंट म्हणजे ४३५.६ स्क्वेअर फुट.

३. १ ग्राऊंड म्हणजे २४०० स्क्वेअर फ़ुट.

४. कर्नाटक आणि आंध्रप्रदेश मध्ये वापरण्यात येणारं गणक म्हणजे ‘अंकांणम’ हे ७२ स्क्वेअर फुट इतकं अंतर असतं आणि १ एकर म्हणजे ६०५ अंकाणम इतकी जागा असते.

५. बिहार, राजस्थान आणि गुजरात मध्ये ‘बिघा’ हेच गणक वापरलं जातं ज्याचं स्क्वेअर यार्ड मध्ये बिहार मध्ये ३०२५ इतकं अंतर बिहार, राजस्थान मध्ये असतं तर गुजरात मध्ये तेच अंतर १९३६ स्क्वेअर यार्ड इतकं असतं.

६. राजस्थान च्या काही भागात ‘बिसवा’ हे गणक वापरलं जातं जे की अंतर ९६.८ स्क्वेअर यार्ड इतकं असतं.

भारताच्या पूर्वेकडे म्हणजेच पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, त्रिपुरा मध्ये जर का तुम्हाला जमीन घ्यायची असेल तर या गणकांची माहिती असणे आवश्यक आहे :

१. १ चातक म्हणजे १८० स्क्वेअर फ़ुट जागा.

२. १ डेसिमल म्हणजे ४८.४ स्क्वेअर यार्ड जागा तर १०० डेसीमल्स म्हणजे १ एकर जागा असते.

३. १ ‘धर’ म्हणजे ६८.०६२५ स्क्वेअर फुट इतकी जागा असते. हेच त्रिपुरा मध्ये ३.६ स्क्वेअर फुट इतकं अंतर असतं.

४. १ ‘कथ्था’ हे आसाम मध्ये २८८० स्क्वेअर फुट इतकं असतं तर बंगाल मध्ये ७२० स्क्वेअर फुट इतकं असतं.

भारताच्या मध्यभागी म्हणजेच मध्य प्रदेश मध्ये ‘१ बिघा’ म्हणजे १३३३.३३ स्क्वेअर यार्ड इतकी जमीन असते. मध्य प्रदेश मध्येच ‘१ कथ्था’ हे सुद्धा वापरलं जातं जे की ६०० स्क्वेअर फुट इतकं अंतर असतं.

१ बिघा जमीन म्हणजे ‘२० कथ्था’ इतकी जागा असते.

ज्या व्यक्ती या क्षेत्रात काम करत नाहीत त्यांना हे लगेच समजणं थोडं कठीण आहे. त्यामुळे कोणतीही जागा, फ्लॅट, प्लॉट घेताना त्याचा ‘सेल डीड’ बघणं हे अत्यंत आवश्यक असतं.

ते कागदपत्र हे त्या जमिनीवर आजपर्यंत झालेल्या सर्व व्यवहारांचा पूर्ण लेखा जोखा असतो. मागील काही वर्षात भारतातील कोणत्याही भागातील जमिनीची माहिती ऑनलाईन मिळू शकते.

 

plot dealing inmarathi

 

पण, त्या नंतर ही ‘सेल डीड’ बघूनच व्यवहार करावा असं सरकारी निर्देश सुद्धा सांगतात. भारतातील या जमिनीच्या वेगवेगळ्या गणकांची माहिती घेतल्यावर आपल्या विविधतेचं परत एकदा दर्शन होतं.

ज्यांना असा काही आंतरराज्य जमिनीचा व्यवहार करायचा असेल तर त्यांनी हा लेख जपून ठेवावा आणि संबंधित वकिलांकडून सल्ला घेऊनच व्यवहार करावा.

काही वर्षांपूर्वी जसं भारताने १ देश १ टॅक्स ची अंमल बजावणी केली तसंच भारतातील जमिनीसाठी १ देश १ गणक याचा सुद्धा विचार केला जावा असं नक्कीच वाटतं.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?