' भारतातून चोरीला गेलेली ती मौल्यवान मूर्ती पुन्हा भारतात आलीच, कशी ते वाचा! – InMarathi

भारतातून चोरीला गेलेली ती मौल्यवान मूर्ती पुन्हा भारतात आलीच, कशी ते वाचा!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोणतीही वस्तू ही कोणाच्या तरी मालकीची असते. कोणी तरी त्या वस्तूला तयार केलेलं असतं, त्याच्या घडणावळी वर त्या व्यक्तीचा अधिकार असतो. हीच बाब कोणत्याही कलाकृतीला सुद्धा लागू पडते.

ज्या व्यक्तीने ती कलाकृती साकारताना जीव ओतून काम केलेलं असतं. कलाकृती कोणतीही असू शकते जसं की, एखादं चित्र किंवा गाणं किंवा लिखाण किंवा मूर्ती.

कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या कलाकाराच्या कलेचं श्रेय घेऊ नये असं आपली संस्कृती सांगते. सोशल मीडिया चा वापर करतांना काही जणांना या गोष्टीचा सोयीस्कर रित्या विसर पडत असतो आणि त्यांना दुसऱ्याच्या कलेला आपल्या नावाने जगासमोर आणण्यास काहीच चूक वाटत नसते.

प्रत्येक कलाविष्कार उठून दिसण्यासाठी त्याला निर्माण करणाऱ्या व्यक्तीला खूप मेहनत ही घ्यावी लागत असते. कलाकाराच्या नजरेतून आपण कोणत्याही कलेकडे बघत असतो.

अद्वितीय कलाविष्कार असेल तर आपण नकळत त्यामध्ये गुंततो आणि त्याची तारीफ करायला लागतो, अधिक जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो.

‘दिव्या मेहरा’ या कॅनडा मध्ये स्थायिक असलेल्या एका कलाकाराला कॅनडा मध्ये ‘अन्नपूर्णा देवी’ ची मूर्ती बघून असंच कुतूहल वाटलं. ऐतिहासिक वस्तूंची माहिती काढणे आणि त्यांच्या मुळाशी जाणे ही दिव्या मेहरा यांच्या आवडीची गोष्ट आहे.

 

mackenzie art gallery inmarathi

 

विनीपेग या कॅनडा मधील शहरात राहणाऱ्या दिव्या मेहरा ने ‘करंट ली फॅशनेबल’ या ब्रँड नावाने २००९ मध्ये विनाईल पेंट द्वारे आपलं टॅलेंट पहिल्यांदा जगासमोर आणलं होतं.

एक दिवशी दिव्या मेहरा यांनी रेजिना या शहरात स्थित ‘मॅकेंझी आर्ट गॅलरीला’ भेट दिली होती. या आर्ट गॅलरी मध्ये जगभरातील मौल्यवान वस्तू रेजिना युनिव्हर्सिटी ने उपलब्ध करून दिल्या आहेत.

‘मॅकेंझी आर्ट गॅलरी’ मध्ये त्यांना ‘अन्नपूर्णा’ देवीची हातात पळी असलेली एक सुबक मूर्ती दिसली. ती मूर्ती बघताच दिव्या मेहरा यांना वाटलं की कोणीतरी अनाधिकृतपणे ही मूर्ती भारतातून कॅनडा मध्ये आणली असावी. त्यांनी या गोष्टीचा पाठपुरावा करायचं ठरवलं.

कोणत्याही वस्तूचा शोध घेताना वेगवेगळे मत हे समोर येतच असतात. हा शोध लागताना दिव्या मेहरा यांना असे काही उत्तरं मिळाले की,

“कदाचित ही मूर्ती मॅकेंझी ने १९१३ मध्ये भारतात गेल्यावर आणली असावी.”

एक मत असंही आलं की, “एखाद्या व्यक्तीला ही माहिती मिळाली असावी की ही मूर्ती इथे हवी आहे आणि त्याने ती मूर्ती वाराणसीच्या गंगेवरून चोरून आणली असावी आणि ती मूर्ती नंतर नॉर्मन मॅकेंझी ने १९३६ मध्ये या आर्ट गॅलरी मध्ये आणली असावी.”

अन्नपूर्णा देवी यांच्या मूर्ती बद्दलच्या या शोधात अजून एक गोष्ट समोर आली. डॉक्टर सिद्धार्थ शाह या भारतीय आणि साऊथ एशियन आर्ट या भारतीय वस्तूंच्या संचालक असणाऱ्या व्यक्तीने सुद्धा या अन्नपूर्णा देवी बद्दल शोध घेतला होता.

दिव्या मेहरा यांनी सुद्धा जेव्हा या मूर्तीबद्दल आवाज उठवला होता तेव्हा हे सर्वांच्या लक्षात आलं की या ‘अन्नपूर्णा देवी’ च्या मूर्ती इथे असण्यात नक्कीच काही तरी गडबड आहे.

 

annapurna devi inmarathi

 

रेजिना युनिव्हर्सिटी ने समोर आलेल्या तथ्यावर विचार केला आणि हे मान्य केलं की, ही मूर्ती नक्कीच १०० वर्षांपूर्वी भारतातून चोरून आणलेली आहे. ही चूक आपण सुधरवली पाहिजे हे त्यांच्या लक्षात आलं.

रेजिना युनिव्हर्सिटी च्या वाईस चान्सलर आणि प्रेसिडेंट थॉमस चेस ने मीडियाशी बोलतांना सांगितलं की,

“ही मूर्ती योग्य ठिकाणी पोहोचावी ही रेजिना विद्यापीठाची जवाबदारी आहे. शंभर वर्षांपूर्वी घडलेली ही चूक सुधरवण्याची हीच योग्य वेळ आहे. असं करून ही चूक सुधारली जाईल असं नाही. पण, त्या दिशेने एक पाऊल उचलण्यात आम्ही आता वेळ लावणार नाही.”

कॅनडा मधील भारतीय देशदूत श्री. अजय बिसारिया यांनी रेजिना युनिव्हर्सिटीच्या या कृतीचं स्वागत केलं आहे. प्रसार माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत अजयजी यांनी सांगितलं की,

“इतर देशातील अश्या ऐतिहासिक आणि अनमोल वस्तुंना स्वतःहून त्या देशाला परत करणं यातून भारत आणि कॅनडा यांच्यातील सौहार्दाचे आणि समंजस पणाचे दर्शन घडते.”

 

annapurna statue inmarathi

 

काही महिन्यांपूर्वी इंग्लंड ने १० व्या शतकातील शंकराची मूर्ती, श्री राम-लक्ष्मण-सीता यांच्या ३ मूर्ती स्वतःहून परत करून असाच मोठेपणा दाखवला होता.

कॅनडा मध्ये असलेली ‘अन्नपूर्णा देवी’ ची ही मूर्ती १८ व्या शतकातील आहे हे याबद्दल च्या अभ्यासात समोर आलं आहे. वाराणसी मध्ये तयार झालेल्या या मूर्ती बद्दल रेजिना युनिव्हर्सिटी ने काही दिवसांपूर्वी एका ऑनलाईन कार्यक्रमात माहिती दिली.

ग्लोबल अफेयर्स कॅनडा आणि कॅनडा बॉर्डर सर्विस एजन्सीच्या प्रतिनिधी सुद्धा कार्यक्रमास हजर होते. या कार्यक्रमा नंतर ही मूर्ती ओटावा येथे स्थित अजय बीसारिया यांना सुपूर्त करण्यात आली.

‘मॅकेंझी आर्ट गॅलरी’ ने अन्नपूर्णा देवी च्या मूर्तीबद्दल चर्चा सुरू झाल्यावर प्राथमिक प्रतिक्रिया ही दिली होती की, “ही मूर्ती संशयास्पद रीतीने इथे आल्याचं आढळून आले आहे. नैतिक रित्या ही गोष्ट योग्य नसल्याचं आम्ही मान्य करतो.” या गोष्टीवर ही संस्था, कॅनडा देश हा शेवटपर्यंत ठाम राहिला ही फार मोठी गोष्ट आहे.

अन्नपूर्णा देवी च्या प्रवासाचं ‘वर्तुळ’ पूर्ण झालं याबद्दल भारतीय लोकांना खूप आनंद झाला आहे. भारताचे पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी २९ नोव्हेंबर रोजी ‘मन की बात’ या कार्यक्रमात ही आनंदाची बातमी लोकांना दिली.

आपल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, “एक आंतरराष्ट्रीय टोळी अश्या मौल्यवान वस्तूंची भारतातून चोरी करून इतर देशात चढ्या किमतीत विकत होती. ‘अन्नपूर्णा देवी’ च्या मूर्ती सारख्या इतरही वस्तू भारतात परत आणण्यासाठी भारत सरकार प्रयत्नशील आहे.”

 

modi man ki baat inmarathi

 

वाराणसीच्या ग्रामस्थांनी ही बातमी ऐकून समाधान व्यक्त केलं आहे. वरिष्ठ मंडळींनी विशेष करून या बातमीचं स्वागत केलं आहे.

भारत सरकार ने इतर देशांना “मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा है” असं सांगितल्यावर गोष्टी भारतात परत येणं म्हणजे एक औचारिकता असते. लोक प्रतिनिधींच्या पुढाकाराने घडलेल्या या गोष्टीचं भारत सरकार ला विशेष कौतुक आहे.

अश्याच प्रकारे एके दिवशी भारतात तयार झालेला ‘कोहिनूर हिरा’ सुद्धा इंग्लंड मधून भारतात यावा अशी आशा करायला काय हरकत आहे. नाही का?

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?