' एकमेकांसाठी वेळ नाहीये? भांडणं होतायत? हा आहे सुदृढ नात्याचा कानमंत्र! – InMarathi

एकमेकांसाठी वेळ नाहीये? भांडणं होतायत? हा आहे सुदृढ नात्याचा कानमंत्र!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

आपला जोडीदार आपल्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी असतो. आपल्या आयुष्यातील लहान-मोठे निर्णय, वाईट प्रसंग असो वा गोड आठवणी या सगळ्या गोष्टींमध्ये जोडीदार तुमच्यासोबत कायम असतो.

नाते टिकवायचे असेल, तर जोडीदाराला वेळ देणे गरजेचे आहे ज्यामुळे नाते चिरतरुण राहील. याचा अर्थ जोडीदाराबरोबर बाहेर जाणे, एकत्र जेवणे, एखादा मूव्ही बघणे एवढाच होत नाही, तर जोडीदाराचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व त्याला पटवून देणे गरजेचे आहे. तुमच्या वागण्या बोलण्यातील लहान लहान गोष्टी मधून जोडीदाराला याची जाणीव होऊ शकते, की तुमच्या आयुष्यात त्याचे अगम्य स्थान आहे.

या “वेळ देणे”चा नक्की अर्थ काय होतो? एखाद्याला कॉलिटी टाईम देणे म्हणजे त्याच्याबरोबर वेळ घालवताना अन्य सारी कामे बाजूला ठेवणे. त्यामुळे तुम्हाला जोडीदाराबरोबर उत्तम संवाद करता येईल आणि या झालेल्या संवादातून तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

 

 

तुम्ही तुमच्या जोडीदाराला योग्य वेळ देण्यासाठी नक्की कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ते पुढीलप्रमाणे : 

कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत?

जर तुम्हाला तुमचे नाते चिरकाल टिकवायचे असेल आणि जोडीदाराचे तुमच्या आयुष्यातील महत्त्व दर्शवायचे असेल तर सर्वप्रथम कोणत्या गोष्टी टाळल्या पाहिजेत हे कळणे गरजेचे आहे. यामध्ये काही खालील गोष्टींचा समावेश होतो:

जोडीदारासोबत बोलत असताना तुम्ही तुमच्या फोनकडे दुर्लक्ष करायला शिका. यातून तुमच्या जोडीदाराच्या हे निदर्शनास येईल, की तुम्हाला या क्षणी फक्त त्याला वेळ द्यायचा आहे.

तुमच्या जोडीदाराला ज्या गोष्टींची आवड असेल उदाहरणार्थ, मूव्ही बघणे, गाणी ऐकणे किंवा पर्यटन स्थळी जाणे यामध्ये तुम्हीसुद्धा रुची दाखवली पाहिजे.

 

couple watching movie

 

महत्त्वाच्या प्रसंगी म्हणजेच जर घरात एखादा कार्यक्रम असेल वा एखादा असा प्रसंग ज्या क्षणी तुमच्या जोडीदाराला तुमची गरज आहे अशावेळी तुम्ही त्याच्या बरोबर असणे गरजेचे आहे टाळाटाळ करता कामा नये.

बऱ्याचदा कामाच्या गडबडीत आपण आपल्या जोडीदाराला पुरेसा वेळ देत नाही. कुठेतरी बाहेर जाण्याचा डेट वर जाण्याचा प्लॅन करत नाही. असे करता कामा नये.

आपल्या कामाच्या ठिकाणी आलेल्या वाईट अनुभवांचा राग घरी आल्यावर वर आपल्या जोडीदारावर काढता कामा नये.

आता काय करावे हे पाहू :

नवनवीन गोष्टी एकत्रपणे करणे

 

indian-couple-marathipizza02

 

तुम्हाला गाण्याची किंवा एखादी नवीन वाद्य शिकण्याची इच्छा आहे का? किंवा तुम्हाला समुद्रकिनारी जाऊन स्कुबा डायव्हिंग करण्याची इच्छा आहे का? बऱ्याचदा तुमच्या मनात असे विचार आले असतीलच. तुम्ही अशा नवीन गोष्टी शिकत असताना त्यात तुमच्या जोडीदाराचा समावेश सुद्धा करू शकता.

आपल्या जोडीदारासोबत नवीन गोष्टी शिकताना तुमचे नाते अजून घट्ट होत जाते. या दरम्यान तुमची मैत्रीसुद्धा वाढेल. ती गोष्ट शिकत असताना दोघांना एकत्र आनंद अनुभवायला मिळेल ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होईल.

तुमचे काम बाजूला ठेवणे

 

indian couple feature InMarathi

 

ज्याप्रमाणे काम करताना आपल्या पर्सनल आयुष्यातील भांडण, वाईट प्रसंग बाजूला ठेवणे गरजेचे असते, त्याप्रमाणे आपल्या जोडीदाराला वेळ देताना कामाच्या काही गोष्टी काही वेळ दूर सारायला हव्यात.

जर तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या गोष्टीवर बोलत असाल, तर त्यावेळेस कामाचे फोन बाजूला ठेवले पाहिजेत. यावर एक साधा उपाय म्हणजे कोणत्याही महत्त्वाच्या संवादाआधी फोन सायलेंट करायला विसरू नका.

एकत्र व्यायाम करणे 

 

fitness couple inmarathi

 

आपल्या शरीराच्या सुदृढतेसाठी आपण व्यायाम करायलाच हवा, आपल्याला व्यायाम करताना कुणाची कंपनी मिळाली तर त्या व्यायामाचा कंटाळा येत नाही. अशावेळी तुम्ही व्यायाम करताना तुमच्या जोडीदाराला सामील करू शकता.

तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर जिमला जाऊ शकता, अथवा घरीच व्यायाम करू शकता, योग करू शकता, सायकलिंग सुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्हाला एक निरोगी सवय तर लागेलच, पण तुमचे नाते सुद्धा घट्ट होईल.

 

एकत्र जेवण बनवणे

 

cooking Inmarathi

 

भारतीय कुटुंबात नेहमी जेवण बनवणे हे बाईच्या वाट्याला असते. अगदी बोटावर मोजण्याइतकीच उदाहरणे असतील जिथे पुरुषही जेवण बनवण्यात मदत करतात.

जर तुम्हाला तुमच्या जोडीदाराला हे दाखवून द्यायचे असेल, की ती तुमच्या आयुष्यातील खूप महत्त्वाची व्यक्ती आहे, तर तुम्हीही कधीतरी तुमच्या पत्नीसोबत जेवण बनवू शकता.

डेटवर जाणे

 

sairaat couple inmarathi

आता आपल्या जोडीदाराबरोबर डेट वर जायला कुणाला आवडणार नाही. या डेटदरम्यान दिवसभराचा सारा थकवा दूर होतो. तुम्हाला आनंद मिळेल हे काही नव्याने सांगायची गरज नाही, परंतु तुम्ही तुमचे काम कधीतरी बाजूला ठेवून आठवड्यातून किमान एकदा तरी आपल्या जोडीदारासोबत डेटवर जाणे गरजेचे आहे.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?