“पत्रावळ्या” – भारतातून हद्दपार पण परदेशी सुपरहिट!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम

===

भारतीय संस्कृतीमध्ये निसर्गाला महत्त्वाचे स्थान आहे. एवढेच काय तर आपल्या दैनंदिन जीवनात देखील निसर्गाचा सहभाग आढळून येतो. पण एकीकडे हळूहळू आपण आधुनिकीकरण आत्मसात करतोय आणि निसर्ग आपल्या जीवनातून आणि संस्कृतीमधून हळूहळू दूर होत चालला आहे आणि दुसऱ्या संस्कुती त्याला आपलंस करत आहेत.

आपल्या संस्कृतीची ओळख असणाऱ्या अनेक गोष्टी आज पाश्चात्य संस्कृतीमध्ये सामावून घेतल्या जात आहेत. त्यापैकीच एक म्हणजे पत्रावळी!

 

patravali-marathipizza
http://www.globalmarathi.com

 

तुम्हाला आठवत असेल अगदी काही वर्षांपूर्वी एखाद्याच्या घरी पूजा असेल, लग्नसमारंभ असेल किंवा एखादे शुभ कार्य असेल तर पत्रावळीमधून जेवण वाढण्याची प्रथाच होती.

बरं या पत्रावळी कुठे मिळायच्या नाहीत तर रात्रभर जागून त्या घरातल्या लोकांना त्या तयार कराव्या लागायच्या…तेव्हा कुठे त्यांचा दुसऱ्या दिवशी भोजनात वापर व्हायचा. पण काळ बदलत गेला आणि लोकांना या जणू या पत्रावळी तयार करण्याचा कंटाळा येऊ लागला आणि त्यांच्या या आळसाला जोड मिळाली प्लास्टिकच्या ताटांची!

plastic patravali InMarathi

काही ठिकाणी पत्रावळी उद्योग सुरु करून ते विक्रीसही ठेवण्यात आले होते, पण त्यांना फारसा प्रतुसाद मिळत असल्याचे दिसून येत नाही. आता आपल्याला प्लास्टिकची ताटंच जवळची वाटतात.

 

patravali-plates-marathipizza
http://www.lakshmilaghuudyog.com

आजच्या घडीला गावाकडचे काही प्रदेश सोडले तर तुम्हाला पानांच्या पत्रावळी कुठे दिसणार नाही. गावांमध्ये देखील या प्लास्टिकरुपी पत्रावळींनी बऱ्यापैकी आपले पाय पसरले आहेत.

या पत्रावळ्यांमुळे जरी आपलं त्रास वाचत असला, आपली सोय होत असली तरी त्यांचे आपल्या संस्कृतीमधील महत्त्व मात्र आपण गमावत चाललो आहे. हीच गत आहे पानांच्या द्रोणांची.

मंदिरात प्रसाद देताना आता या वाट्या न दिसता तेथेही दिसतात आधुनिक जगातील प्लास्टिकचे द्रोण!

 

Silver-Laminated-Bowl-marathipizza
www.silverlaminatedpaperproducts.com/

आपण जरी यांना झिडकारत असलो तरी पाश्चिमात्य लोक मात्र या नैसर्गिक पत्रावळींच्या चांगलेच प्रेमात पडले आहेत.

जर्मनीतील काही तरुणांनी Leaf Republic नावाने एक कंपनी स्थापन केली आहे. या कंपनीमार्फत हे तरुण पत्रावळी आणि द्रोणांचे उत्पादन करतात आणि विश्वास ठेवा खरंच त्यांच्याकडे हा व्यवसाय चांगलाच प्रसिद्ध झाला आहे.

Green-leaf-plates InMarathi

मुख्य म्हणजे हे तरुण या पत्रावळी आणि द्रोण नव नवीन डिजाईन मध्ये सादर करण्याचा प्रयत्न करून त्याला एक हटके लुक देखील देत आहेत.

 

leaf-republic-marathipizza
www.kickstarter.com

या तरुणांच्या मते,

निसर्ग हा आपल्याला भरभरून देतो, त्याचा आपण वापर केला पाहिजे.

या पत्रावळ्या आणि द्रोण रोजच्या जीवनामध्ये वापरल्या तर कचरा आणि प्लास्टिकच्या प्रदूषणाला बऱ्यापैकी आळा बसेल. या मुळे अनेक लोकांना रोजगार मिळेल.

तसेच –

यांची विल्हेवाट लावणे देखील सोपे आहे. तसेच त्यांची विल्हेवाट लावताना त्यापासून खत बनवले तर जमीन देखील सुपीक होईल.

 

leaf-republic-marathipizza01
steemd.com

तरुणांच्या या स्तुत्य उपक्रमाला तेथील लोकांना देखील अभूतपूर्व प्रतिसाद दिला आहे. पर्यावरणप्रेमी तर जमेल तशी या उत्पादनाची जाहिरात करत आहेत.

 

leaf-republic-marathipizza02
www.kickstarter.com

त्यांच्या कंपनीबद्दल माहिती देणारा हा व्हिडियो नक्की पहा.

या तरुणांकडून आपण भारतीयांना देखील प्रेरणा घेत धरणी मातेसाठी धोका उत्पन्न करणाऱ्या प्लास्टिकला आपल्या जीवनातून दूर सारणे गरजेचे आहे!

यासाठी एखाद्या सामाजिक चळवळीची गरज नाही, प्रत्येकाने स्वत:हून या गोष्टीला सुरुवात केली तर पूर्वीसारखे पत्रावळी आणि द्रोणांचे दिवस यायला जास्त वेळ लागणार नाही.

===

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम Copyright © InMarathi.com | All rights reserved.

2 thoughts on ““पत्रावळ्या” – भारतातून हद्दपार पण परदेशी सुपरहिट!

 • May 8, 2019 at 12:26 pm
  Permalink

  पर्यावरण

  Reply
 • May 25, 2019 at 2:48 pm
  Permalink

  good effort to get rid from plastic garbage. we,Indians forgetting our tradition to use leaf plates whereas Western people going to accept the same

  Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?