' कोविड नंतर, खचून न जाता, यशस्वी होण्यासाठी या ६ गोष्टी आत्मसात कराव्यात! – InMarathi

कोविड नंतर, खचून न जाता, यशस्वी होण्यासाठी या ६ गोष्टी आत्मसात कराव्यात!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

कोरोना आता शेवटच्या टप्प्यात आला आहे असं म्हणता येईल. २०२० हे पूर्ण वर्ष कोरोना च्या नावाने ओळखलं जाईल. या वर्षाला जर का चार भागात विभागलं तर आपल्याला असं काहीसं चित्र दिसेल:

१. जानेवारी ते मार्च मध्ये आपण चीन मधून सुरुवात झालेल्या व्हायरस चा प्रवास कसा जगातील विविध देशातून होत आहे ते बघत होतो.

२. एप्रिल ते जून मध्ये आपण ‘लॉकडाऊन’ च्या रूपाने एक नवीनच आयुष्य जगायला शिकलो. एक असं आयुष्य ज्यामध्ये फक्त आवश्यक त्या गोष्टी आपल्याला मिळतील आणि त्या गरजा जितक्या कमी करता येतील याकडे आपण लक्ष देत होतो.

आपल्या ‘खऱ्या’ गरजा किती कमी आहेत आणि आपण ‘वाढवलेल्या’ गरजा किती आहेत हे या काळाने आपल्याला शिकवलं.

डॉक्टर आणि पोलीस हे आपल्यासाठी किती अविरत काम करतात हे आपण या दिवसात बघितलं आणि आपण त्यांचे वेळोवेळी आभार सुद्धा मानले.

 

covid warriors inmarathi

 

३. जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांत आपण ‘न्यू नॉर्मल’ मध्ये स्वतःला मोल्ड करायला शिकलो. आपल्या युनिफॉर्म मध्ये ‘मास्क’ हा एक आवश्यक घटक आता समाविष्ट झालेला होता. ऑनलाईन शाळा, क्लासेस, मिटिंग्ज या काळात सर्वांसाठी अगदी सहज गोष्टी झाल्या.

४. ऑक्टोबर ते डिसेंबर या काळात आपली कोरोनाची भीती निघून गेलेली आहे. आपल्या सणांना सुद्धा आपण गर्दी कमी केली. पण, दिवाळी च्या वेळी मात्र आपण बाजारात होणाऱ्या गर्दीला रोखू नाही शकलो.

याचं कारण, म्हणजे बऱ्याच देशांच्या कोरोना लस आता शेवटच्या टप्प्यात आहेत हे सर्वांना कळलं आहे आणि त्यामुळे एक निर्धास्तसपणा आला आहे.

एखाद्या आकाश पाळण्यात बसल्या सारखं आपण हे वर्ष जगलो आहोत. व्यक्तिगत आयुष्य कितीतरी पटीने बदललेलं आपण बघितलं. या सर्वातून बाहेर पडतांना आपल्याला व्यावसायिक आयुष्यात सुद्धा काही बदल करणं अपेक्षित आहे.

आर्थिक पडझड, नोकऱ्यांमध्ये झालेल्या कपात, सक्तीच्या रजा यामुळे नोकरी टिकवणे हे सुद्धा एक आव्हान झालं आहे.

एक गोष्ट नक्की झाली आहे की, कोणत्याही कंपनीत इथून पुढे ‘ज्याच्याकडून काही फायदा आहे’ तीच व्यक्ती नोकरीत टिकणार हे नक्की.

आपली जागा पक्की करून ठेवण्यासाठी आपण या गोष्टी आत्मसात करायला पाहिजे :

 

१. नेतृत्व :

 

leadership inmarathi

 

कोरोना मुळे आपले सहकारी आपल्याला प्रत्यक्ष भेटणं बंद झालं आहे. तुम्ही जर का टीम लीडर वगैरे असाल तर तुम्हाला आता टीम च्या लोकांना दूर असूनही एकसंघ करून ठेवणं हे शिकणं अत्यंत आवश्यक आहे.

डिसेंबर अखेरपर्यंत सगळेच ऑफिस ऑनलाईन असणार आहेत आणि त्यावेळी परिस्थिती कशी असेल हे आता कोणीच सांगू शकत नाहीये.

त्यासाठी आपण ‘हे अंतर कमीच आहे’ हे आधी मान्य करायला हवं आणि कंपनीला अपेक्षित ते रिझल्ट्स मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील असावं.

 

२. भावनिक सुद्धा विचार करण्याची सवय :

 

emotional intelligence inmarathi

 

२०२० मध्ये आपण सगळेच जण कमी अधिक प्रमाणात भावनिक झालो आहोत. आजबाजूला सतत घडणाऱ्या घटनांमुळे हतबल झालो आहोत.

अश्या वेळी एक चांगला व्यवस्थापक हा केवळ आपल्या अपेक्षा समोरच्या व्यक्तीवर न लादता समोरच्या व्यक्तीला समजून घेऊन त्याच्याकडून काम करवून घेणारा असावा.

Emotional intelligence ही टर्म सध्या लोकप्रिय आहे ज्याचा अर्थ असा की, समोरच्या व्यक्तीच्या भावना समजून घ्यायच्या आणि स्वतःच्या भावना योग्य रीतीने समोरच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवायच्या.

एक चांगला प्रशासक हा या काळातच तयार होत असतो आणि ओळखू येत असतो. ज्याला हे कळलं त्या व्यक्ती सोबत काम करायला सगळेच जण आतुर असतात.

 

३. टेक्नॉलॉजी चा स्वीकार करणे :

 

technology inmarathi

 

“मला हे येत नाही” हे वाक्य आपल्यापैकी सर्वांनी इथून पुढे वापरणं सोडलं पाहिजे. मला हे शिकता कसं येईल? हे जो म्हणेल आणि पुढे चालत राहील तोच इथून पुढे कंपनीला हवा असेल. निवड तुमची आहे.

झूम वरून युट्युब कसं कनेक्ट करावं? मीटिंग ची रेकॉर्डिंग करून ती कमी साईझची करून सर्वांना कशी पाठवावी? हे सर्व शिकून घेणं आता अपरिहार्य आहे.

जो रोज काही तरी नवीन गोष्ट शिकेल तोच कामात टिकेल अशी सध्याची परिस्थिती आहे.

 

४. बदल स्वीकार करण्याची वृत्ती :

 

work from home inmarathi

 

‘लॉकडाऊन’ मुळे आपलं आयुष्य आधीच खूप बदललं आहे. कोरोनाचा समूळ नाश झाल्यानंतर अजून किती बदलांना आपल्यला सामोरं जावं लागणार आहे हे कोणीच सांगू शकत नाही.

‘वर्क फ्रॉम होम’ हे बिजनेस मॉडेल कित्येक कंपनीला बिजनेसला लागणारा खर्च कमी करणारा पर्याय वाटत आहे. घरातून काम करणं कितीही अवघड असलं तरीही ते कसं साध्य करायचं याकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

इथून पुढे फक्त काम महत्वाचं असेल; कामाची जागा नाही हे मान्य करणं गरजेचं झालं आहे.

 

५. डेटा चं महत्व :

 

big-data-analyst-marathipizza

 

कोरोना नंतर चा काही काळ हा त्वरित निर्णय घेणाऱ्या व्यक्तींचा असेल. निर्णय घेण्यासाठी योग्य माहिती ही अपेक्षित स्वरूपात सादर करणं अत्यंत आवश्यक झालं आहे.

त्यासाठी आपली माहिती संकलन आणि सादरीकरणाची पद्धत योग्य ही ‘सर्व प्रश्नांची कमी वेळात उत्तरं’ देणारी असावी. रोज बदलणाऱ्या ट्रेंड्सची माहिती आपल्याला असणं आणि ती समोरच्या पर्यंत पोहोचवणं हे शिकणं अत्यंत आवश्यक आहे.

 

६. डिजिटल कोडिंग, मार्केटिंग :

 

coding inmarathi

 

प्रत्येक कंपनी ही आता डिजिटल साक्षर झाली आहे. आपण कोडिंग, वेबसाईट डेव्हलपमेंट सारख्या कामात कंपनीचे पैसे कसे वाचवता याकडे आपण सुद्धा बघावं.

मार्केटिंग चे सगळे निकष डिजिटल मार्केटिंग मुळे आता बदलले आहेत. सोशल मीडिया हा आता महत्वाचा फॅक्टर झाला आहे. हे ज्ञान आपण जितकं वाढवू तितकं आपण कंपनीच्या कोअर टीम मध्ये असू.

कोअर टीममध्ये असणं म्हणजे आपल्या कामाबद्दल विचारणा, कौतुक किंवा नाराजी ही जरी व्यक्त झाली तरिही त्यांच्या कंपनीत असण्यावर कोणी साशंक नसतो.

या सर्व टिप्स आपण लक्षात ठेवुयात आणि येणाऱ्या काळातील आव्हानांचा सामना करण्यासाठी स्वतःला तयार करूया आणि आपली ध्येयपूर्ती करूया. येणारा काळ चांगला असेलच, नसेल तर त्याला चांगला करण्यासाठी प्रयत्नशील होऊया.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्राम शेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?