' हा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”!

हा शास्त्रज्ञ म्हणतो, “जगातील प्रत्येक गोष्ट देवाची नाही विज्ञानाची किमया आहे”!

आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामशेअरचॅट

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

===

देव म्हणजे नेहमीच मनुष्याच्या भावनेशी निगडीत विषय राहिला आहे. म्हणूनच म्हणतात की देवावर विश्वास असणे किंवा नसणे हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे.

भारतातल्या नव्हे तर संपुर्ण जगभरातल्या कोणत्याही जातीधर्माच्या लोकांना देवाविषयी विचारलं तरी त्यातून भक्तीच दिसून येते.

अर्थात नास्तिक लोकं त्याला अपवाद आहेतच, पण तरिही आस्तिकांची संख्या मात्र मोठी आहे.

आपल्याला लहानपणापासून देवाभिमुख संस्कृतीची शिकवण देण्यात येते, म्हणूनच आपल्या जीवनात देवाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.

बालपणापासूनच आपल्यात रुजविण्यात आलेल्या या संस्कारांमुळे मोठेपणीही आपण आपसुकच देवाबद्दल मनाचत श्रद्धा बाळगून असतो.

आता हेच उदाहरण घ्या ना, समजा एखादा साधा माणूस मग तो हिंदू असो मुस्लीम असो किंवा ख्रिश्चन असो, तो जर रस्त्याने जात असेल आणि त्याला आपल्या देवाचे प्रार्थनाघर दिसले की तो आपसूकच नतमस्तक होतो.

अर्थात ही आपल्याला मिळालेली शिकवण आहे, तो आपल्या मनातील देवाविषयीचा आदरयुक्त भाव आहे.

 

creation-science-marathipizza
http://littleguyintheeye.com

 

देवाने ही दुनिया निर्माण केली यावर सामान्यजणांचा ठाम विश्वास. पण विज्ञान मात्र पहिल्यापासूनच ही गोष्ट नाकारत आलं आहे.

आजवर अनेक संशोधनांतून शास्त्रज्ञांनी ही गोष्ट सिद्ध करून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

याच पठडीतल्या एका शास्त्रज्ञाने याच संबंधित काहीसे वादग्रस्त विधान (धर्माच्या दृष्टीने) केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

 

Jeremy_England-marathipizza
www.quantamagazine.org

 

Jeremy England नावाचा हा शास्त्रज्ञ ठामपणे म्हणतो की,

देव वगैरे काही नाही, ही सारी विज्ञानाची किमया आहे

Jeremy England गेल्या अनेक वर्षांपासून चार्ल्स डार्विनच्या सिद्धांतांवर संशोधन करीत आहे. या संशोधनातून त्यांनी ही गोष्ट मांडली आहे की,

चार्ल्स डार्विन चा क्रम- विकास सिद्धांत हा फक्त सजीवांवरच नाही तर निर्जीव गोष्टींवर देखील लागू होतो आणि जगातील कोणत्याही वस्तूच्या निर्मितीमध्ये देवाचे कोणतेही योगदान नाही यावर माझा ठाम विश्वास आहे. ही निरंतर विकासाची प्रक्रिया आहे. जी अनंत काळापासून चालत आलेली आहे.

charles-darwin-marathipizza
sites.google.com/

 

आपल्या या दाव्याला त्यांनी थेरी ऑफ थर्मोडायनामिक्सची जोड दिली आणि म्हटले की,

प्रत्येक अॅटॉम मध्ये एनर्जीचा स्रोत असतो जो स्वत:ला वेगवेगळ्या स्ट्रक्चरमध्ये विभागून त्यातून नवीन स्ट्रक्चर निर्माण करतो.

 

god-vs-science-marathipizza
http://www.yougotlife.com

 

त्यांच्या या शोधाची दखल सुप्रसिद्ध वैज्ञानिक Richard Dawkins यांनी देखील घेत आपल्या वेबसाईटवर  ‘God is on the ropes: The brilliant new science that has creationists and the Christian right terrified’  या शीर्षकाखाली ब्लॉग प्रसिद्ध केला आहे.

जिज्ञासुंनी हा ब्लॉग जरुर वाचावा.

===

इनमराठीच्या अपडेट्स शेअरचॅटवर मिळवण्यासाठी क्लिक करा: इनमराठी शेअरचॅट ग्रुप

आता इनमराठीच्या लेखाच्या अपडेट्स मिळवा टेलिग्रामवर! जॉईन करा टेलिग्राम चॅनल: https://t.me/InMarathi

आमचे इतर लेख वाचण्यासाठी क्लिक करा: InMarathi.com | आमचे सर्व लेख मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम  | टेलिग्रामशेअरचॅट | Copyright © InMarathi.com | All rights reserved.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: चोरी करणं अनैतिक आहे. असं कृत्य का करताय?